Pollution-Free Best 6 Electric Cars Under 25 Lakh:

Pollution-Free Best 6 Electric Cars Under 25 Lakh | २५ लाखाच्या आत उपलब्ध असलेले इलेक्ट्रिक कार्सचे पर्याय.

नमस्कार मित्रांनो, आज आपण marathirang.com च्या “EV Car” या सदराखाली भारतात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक कार्स चे पर्याय कोणते आहेत ते दिलेले आहे. जे तुम्हाला २५ लाखाच्या आत उपलब्ध असतील. त्यांचे फीचर्स, वैशिष्टय काय त्यांची माहिती देणार आहोत. ज्याचा उपयोग तुमचे निर्णय घेण्यास आपल्याला मदत करेल. चला तर वाचूया.

दिवाळी 2022: भारतात 25 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक कार खरेदी – Tata, MG, आणि बरेच काही

आत्ताच हिवाळा सुरु होत आहे आणि दिवाळीचा सण सुरू झाल्याने बाजारात खरेदीचे छान वातावरण आहे. सारे लोक आपापल्या घरात नवीन वस्तू खरेदी करण्याचा, घर जास्त सुशोभित करण्याचं प्रयत्न करतात. यातच जर तुम्ही नवी कार विकत घेणार असाल तर हा लेख नक्की वाचा. तुमचा निर्णय घेण्यासाठी कदाचित याची मदत होत. वाढणाऱ्या वायू प्रदूषणामुळे पर्यावरणप्रेमींच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी, आपले सरकार अनेक उपाय करत आहे. नव्या योजना आणत आहे, ज्यामुळे समस्या वाढण्यापासून रोखता येईल. पण हे केवळ सरकारचेच काम आहे का, तर नाही आपणही या साठी प्रयत्न केले पाहिजेत.

तुम्ही म्हणाल मला कार घ्यायची आहे आणि प्रदूषणाच्या समस्येसाठी मी काय योगदान करू शकतो. तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे इलेकट्रीक कार. होय जर कार घेतच आहात तर का नाही एक इलेकट्रीक कार. आज बाजारात खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत. या लेखा मध्ये आम्ही प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक वाहनांची यादी बनविली आहे जी तुम्ही तुम्हाला 25 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत असलेल्या कार्सची नावे आहेत. यादीत टाटा टियागो ईव्ही, एमजी झेडएस ईव्ही आणि इतर वेगळ्या ब्रँड्सच्या नावांचा समावेश आहे.

टाटा टियागो ईव्ही :

Tata Tiago EV: (6 Electric Cars Under 25)
Tata Tiago EV ही भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजारात नव्याने दाखल झालेले नवीन मॉडेल आहे. ह्या कारची किंमत ₹ 8.49 लाख (एक्स-शोरूम) आहे. कमी किमतीत सर्वाना सहज परवडणारी EV कार उपलब्ध आहे. ही कार भारतीय ऑटोमेकर Tata Tigor EV आणि Tata Nexon EV च्या मॉडेल्स प्रमाणेच आहे, त्यांच्याच पॅटर्नला फॉलो करत आलेले छोटे सेगमेंट आहे. टाटा कार सध्या सुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण भरलेल्या आहेत. त्यामुळे ही कारही सुरक्षा वैशिष्ट्यांसह भरलेली, आणि चमकदार रंग छटा असलेली कार आहे. एका चार्जवर साधारण 315 किमीची रेंज देते.

5 Electric Cars Under 25
Tata Tiago EV : 5 Electric Cars Under 25 Lakh

टाटा टिगोर इ.व्ही:

Tata Tigor EV: (6 Electric Cars Under 25)
टाटांचे दुसरे ओपशन, जरी टाटा टिगोर ईव्हीचे तियागो मुळे सर्वात परवडणारी ईव्ही चा टायटल गेलेला असला तरीही, ते सर्वात स्वस्त पैकी एक असण्याच्या कारच्या यादीत आजही अबाधीत आहे. या कारची किंमत 10 लाख रुपयांच्या जवळपास आहे. कार अगदी Tiago EV सारखीच श्रेणी प्रदान करते. सारखेच सुरक्षा वैशिट्ये रंग आणि स्टाईल. एका चार्जवर 312 किमी पर्यंत चालते. ईव्ही अपीलसाठी कारला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टील ब्लूसारखे आकर्षक रंग मिळतात.

Tata Tigor EV: 5 Electric Cars Under 25 Lakh

टाटा नेक्सॉन इ.व्ही प्राइम:

Tata Nexon EV Prime: (6 Electric Cars Under 25)
टाटा नेक्सॉन इ.व्ही हे जगातील पहिले हाय-व्होल्टेज भारतीय इलेक्ट्रिक वाहन आहे. त्यामुळे आजच्या क्षणाला टाटा नेक्सॉन ईव्ही हे प्राइम मॉडेल म्हणून विकले जात आहे. आपल्या देशातील हे सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक वाहन देखील आहे. ह्या मॉडेलची सुरुवातीची किंमत ₹ 14.99 लाख आणि कमाल किंमत ₹ 17.50 लाख इतकी आहे.
Nexon EV Prime मॉडेल ची खासियत सांगायची झाल्यास त्याचे 30.2 kWh बॅटरी पॅकला उर्जा देणारा, कायम चुंबकीय सिंक्रोनस मोटर 129 PS आणि 245 Nm चे पीक आउटपुट देते. त्यामुळे Nexon EV प्राइमची रेंज 312 किमी पर्यंत मिळते. आणि ही कार 10 सेकंदांपेक्षा कमी वेळेत ताशी 0 ते 100 किमीचा वेग हासील करते. इतकी जबरदस्त इंजिन पॉवर, Tata Nexon ला इतरांपेक्षा वेगळं बनवते.

6 Electric Cars Under 25
Tata Nexon EV Prime: (6 Electric Cars Under 25 Lakh)

एम.जी झेड एस इ.व्ही:

MG ZS EV : (6 Electric Cars Under 25)
सध्या भारतात, MG ZS EV आता त्याच्या फेसलिफ्ट फॉर्ममध्ये खरेदीसाठी सज्ज झाली आहे. ह्या कारची किंमती ₹ 21.99 लाख रुपयांपासून सुरू होते. ही मॉडेल 44.5 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे. ही कार आपल्याला एका चार्ज मध्ये 419 किलो मीटर चालते. आता पर्यंत पाहिलेल्या सर्व कार पेक्षा सर्वात जास्त मायलेज देणारे हे मॉडेल आहे. सध्या बाजारात फक्त दोन प्रकारात उपलब्ध आहेत: एक्साइट आणि एक्सक्लुझिव्ह. MG ZS EV ची पॉवरट्रेन 143 ph आणि 350 Nm कमाल टॉर्क निर्माण करते. त्यामुळे हे मॉडेल ताशी 0 ते 100 किलोमीटर वेग गाठण्यासाठी केवळ 8.5 सेकंद घेते, जे टाटा नेक्सॉन पेक्षाही जास्त दमदार आहे.

MG ZS EV : (6 Electric Cars Under 25 Lakh)

टाटा नेक्क्सन इ. व्ही. मॅक्स:

Tata Nexon EV Max: (6 Electric Cars Under 25 Lakh)
टाटा मोटरच्या वैयक्तिक इलेक्ट्रिक मोबिलिटी कारच्या लाइनअपमध्ये एक नवीन वाहन समाविष्ट करण्यात आले आहे. टाटा ब्रँडने Tata Nexon EV Max ₹ १८ ते २१ लाख मध्ये मध्ये सादर केली आहे.
टाटा ने अलीकडेच नेक्सॉन EV कॉम्पॅक्ट SUV ची लांब-ड्रायव्हिंग रेंज आवृत्ती भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली होती. आता यात आणखी एक नवीन प्रकार Tata Nexon EV Max हे तयार झाले आहे. हे मॉडेल तंत्रज्ञान दृष्ट्या अधिक सक्षम, अधिक आरामदायी, जास्त वैशिष्ट्ये आणि मोठा बॅटरी पॅक देते. Nexon EV Max मोठ्या 40.5kWh बॅटरी पॅकसह रस्त्यावर धावायला सज्ज झाली आहे. जी 250 Nm च्या पीक टॉर्कसह 141 bhp पॉवर जनरेट करतो. Nexon EV Max ची ARAI-प्रमाणित ड्रायव्हिंग रेंज आता वाढली आहे आणि ती 437 किमीपर्यंत टिकून आहे. त्यामुळे मॅक्स नावा प्रमाणे सगळंच मॅक्स आहे.

Tata Nexon EV Max: (6 Electric Cars Under 25 Lakh)

ह्युंडाई कोना इ.व्ही:

Hyundai Kona EV : (6 Electric Cars Under 25 Lakh)
ह्युंडाई ची भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार, ₹ 23.79 लाख सुरुवातीच्या किमतीसह बाजारात दाखल झाली. आजही Hyundai Kona Electric हे कंपनीचे एकमेव इलेक्ट्रिक वाहन आहे जे भारतातील या किमतीच्या विभागात येते. 39.2 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक, कोना इलेक्ट्रिकच्या नावा खाली उपलब्ध आहे. हे मॉडेल एका चार्ज मध्ये 452 किलो मीटर रेंज देते.

5 Electric Cars Under 25 Lakh
Hyundai Kona EV : (6 Electric Cars Under 25 Lakh)

अधिक माहिती:

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x