Put a clove of garlic inside the toilet | टॉयलेट साठी Perfect उपाय

Put a clove of garlic inside the toilet for this brilliant reason

टॉयलेट साफ करणे हा आमच्या आवडत्या कामांपैकी एक असा बिल्कुल नाही. तरीही, आपले शौचालय साफ करणे हे तितकेच महत्वाचे आहे. तुम्हाला माहीत आहे का, की शौचालय हे तुमच्या घरातील सर्वात अस्वच्छ ठिकाणांपैकी एक आहे?
उदाहरणार्थ, तुमच्या टॉयलेटमध्ये हजारो जीवाणू, विषाणू आणि बुरशी वाढत असतात. साफ-सफाई न केल्याने बॅक्टेरिया वाढतात, लवकर पसरतात. हे थांबवण्या साठी एक उपाय आहे, मला माहित आहे, हे तुम्हाला वेडेपणाचे वाटेल, परंतु लसणाची एक पाकळी तुम्हाला मदत करू शकते!

चला पाहू काय आहे हा प्रकार आणि काय होऊ शकते लसणाच्या पाकळीने !

आपल्या शौचालयात लसूण का टाकावे ?

Clove of garlic inside the toilet:

तुमच्या शौचालयात लसणाची एक पाकळी का ठेवावी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. बरं, लसूण हा एक नैसर्गिक आणि रामबाण उपाय आहे, जो उत्तम जंतुनाशक आणि दाहक विरोधी अधिक प्रभावी आहे. शौचालय स्वच्छ आणि साफ करण्यासाठी, लोक खूप वेगवेगळी आणि भयंकर रसायने वापरतात. हि रासायने ठिकाण स्वच्छ करत, असले तरी ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. म्हणूनच हे अधिक नैसर्गिक पद्धतीने करण्यासाठी, आपण लसूण वापरून आपले शौचालय स्वच्छ ठेवू शकतो.

लसणात अ‍ॅलिसिन नावाचा पदार्थ असतो. हे बॅक्टेरियापासून आपले संरक्षण करते आणि बुरशीपासून बचाव करते. हे शौचालया सारख्या ठिकाणीही ते अनेकदा वाढतात, त्याचा खातमा करण्यासाठी हा एक साधा सोपा आणि सहज करता येणारा उपाय आहे.

>> 300+ List of Forts in Maharashtra | किल्ल्यांची नावे – Read more

हे कसे काम करते:

ही युक्ती अगदी सोपी आहे: तुमच्या टॉयलेटमध्ये फक्त सोललेली लसणाची एक पाकळी ठेवा. हि अशा वेळी ठेवा जेव्हा तुम्ही शौचालयाचा कमी वेळा वापर करता तेंव्हा. रात्री ही युक्ती करणे सर्वात चांगले. कारण मग लसूण रात्रभर साफसफाईची जादू करू शकतो. सकाळी तुम्ही फक्त टॉयलेट फ्लश करा. शौचालय पूर्णपणे जंतू-मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी आठवड्यातून दोनदा हे करा.

शौचालयात पिवळे डाग असल्यास काय करावे ?

तुम्हाला टॉयलेटमध्ये पिवळ्या डागांचा त्रास होतो का? घाबरू नका, तुमचे शौचालय पुन्हा चमकण्यासाठी तुम्ही लसणाची एक पाकळी वपटून हे डाग दूर करू शकता. या डागांपासून सहज सुटका करण्यासाठी लसूण चहा तयार करा. तो कसा करायचा याची कृती पुढे पाहू. Clove of garlic inside the toilet कसे काम करते ते पाहू.

लसूण चहा तयार करण्याची कृती :

सुमारे एक लिटर पाणी उकळवा. दरम्यान, लसणाच्या तीन पाकळ्या बारीक चिरून घ्या किंवा लसूण हाताने दाबून, बारीक तुकडे करा. नंतर उकडलेल्या पाण्यात लसूण घाला. साधारण २० मिनिटे ते तसेच भिजत ठेवा. यानंतर, आपण हे मिश्रण शौचालयात ओता. शक्यतो हे रात्री करा, जेणेकरून लसूण मिश्रण त्याचे काम व्यवस्थित करू शकेल. तसेच जेथे पिवळे डाग असतील तेथे ह्या मिश्रणाने चांगले घासून घ्या.

तुम्हाला फरक नक्की जाणवेल. करून पहा. यामुळे तुमच्या शौचालयाला कोणताही वेगळा रासायनिक परिणाम जाणवणार नाही. उलट ते अधिक सुरक्षित आणि जंतू विरहित होईल. ज्याचा फायदा घरातील सर्व सदस्यांना होईल. नक्की करून पहा. Clove of garlic inside the toilet ठेवल्याने काय होऊ शकतो हे लक्ष्यात येईल.

>> Know more : World Most 7 No Fly Zone Places | नो फ्लाय झोनची ठिकाणे

आम्हाला आशा आहे की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ, वाचनासाठी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !  Clove of garlic inside the toilet ठेवल्याने काय होऊ शकतो हे लक्ष्यात येईल.

अधिक माहिती:

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :

➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x