कोविड-१९ लसीकरण नोंदणी |Covid vaccine registration apps

येत्या १ मे पासून संपूर्ण भारतभर कोविड लस दिली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात हि लस १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी दिली जाणार आहे. कृपया सर्वानी लस घ्यावी व कोविडचा वाढणारा प्रादुर्भाव टाळावा आणि स्वतःला तसेच आपल्या कुटुंबाला सुरक्षित करावे. संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया. Covid vaccine registration apps in India.

कोविड लस घेण्यासाठी कशी नोंदणी करायची, नोंदणी कुठे करावी, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, केंद्र कसे निवडावे, कोविड लस घेतल्याचे प्रमाणपत्र कसे मिळवावे करा या सर्व प्रश्नांची उत्तरे येथे पाहूया : [कोविड लस नोंदणी] [18++ साठी भारत, कोवीन, आरोग्य सेतु, उमंग ,प, कागदपत्रे, नोंदणी कशी करावी हिंदी)

Covid vaccine registration app in India

दि २८ एप्रिल २०२१, दुपारी ४ वा. पासून भारतात 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लोकांना कोरोना लस घेण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या लेखात आपल्याला लसीकरण नोंदणीच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल सांगितले आहे. तर, कृपया आपण हा लेख शेवटपर्यंत वाचवा, जेणेकरुन आपल्याला त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळू शकेल.

लसीकरणासाठी नोंदणी आवश्यक आहे : (Registration is required for vaccination)

जर आपणास 1८ वर्षे पूर्ण असतील आणि आपणास कोरोना लस घ्यावयाची असेल तर त्यासाठी प्रथम आपण नोंदणी करणे आवश्यक आहे. कोरोना लससाठी नोंदणी प्रक्रिया अगदी सोपी आहे. आपण घरी बसून देखील यासाठीची नोंदणी करू शकता आणि जवळच्या लसीकरण केंद्रास भेट देऊन देखील लसीकरणासाठी नोंदणी करू शकता.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे : (Required documents for vaccine registration)

कोरोना लसीकरण नोंदणी करीता आपल्याला मुख्यत: त्याकरिता दोन गोष्टींची आवश्यकता असते. -आधारकार्ड (Adhaar Card/ Driving License/ PAN Card/ Passport/ Pension Passbook/ NPR Smart Card/ Voter ID यापैकी काहीही एक), २-मोबाईल नंबर, ज्यावर तुम्हाला लसीच्या वेळी संदेश पाठवून किंवा कॉल करून योग्यती माहिती दिली जाते.

कोरोना लसीसाठी नोंदणी प्रक्रिया : (Covid vaccine regitration apps in India 🙂
आपल्याला काही सोप्या २ प्रक्रियेबद्दल सांगितले गेले आहे. तसे बरेच अँप्सही आहेत पण तेही खालील प्रक्रयेने आपण सहज करू शकतो. जितके पर्याय तितका जास्त गोंधळ करण्यापेक्षा, १-२ गोष्टीच नीट समजून घेऊ या :

१) आरोग्य सेतु द्वारे नोंदणी (Covid vaccine registration through Arogya Setu App)

Covid vaccine registration app in India
  • स्टेप-१ : सर्वप्रथम, आरोग्य सेतु हा अँप आपल्या फोनमध्ये स्थापित करा. कदाचित तो असेलच कारण भारत सरकारने तो खूप दिवसापासून स्थापित करावयास सांगितलं होतं. जर असेल तर तो गुगल “प्ले स्टोअर” किंवा “अप्पल स्टोअरमधून” स्थापित करा.
  • स्टेप-२ : अ‍ॅप डाउनलोड होताच प्रथम आपापल्या मोबाईल नंबरने, अ‍ॅप ची नोंदणी करा. नोंदणी होताच तुम्ही अ‍ॅप च्या मुख्यपृष्ठावर “Vaccination” नावाचे एक बटण दिसेल, तो पर्याय निवडा.
  • स्टेप-३ : या लसीकरण पृष्ठावर आल्यानंतर, पुन्हा आपला मोबाइल नंबर विचारला जाईल, ज्याद्वारे आपण नोंदणी करू इच्छित आहात.
  • स्टेप-४ : त्यानंतर आपल्याला ओटीपीच्या मदतीने हा नंबर सत्यापित करावा लागेल.
  • स्टेप-५ : त्यानंतर “Photo id card” साठी आपल्याला आधार कार्ड, [(Adhaar Card/ Driving License/ PAN Card/ Passport/ Pension Passbook/ NPR Smart Card/ Voter ID यापैकी काहीही एक)] या पैकी कोणताही एक पर्याय निवडा, त्याच नंबर लिहा, नाव, लिंग, जन्म तारीख वर्ष हि माहिती देऊन फॉर्म सबमिट (Submit) करा.
Covid vaccine registration app in India
  • स्टेप-६ : आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आपण आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना देखील यात जोडू शकता (जास्तीत जास्त ४ सभासद).
  • या संपूर्ण प्रक्रियेनंतर आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते.

२. कोविन द्वारे नोंदणी (Covid vaccine registration app through CoWIN website)

कोविन चा पर्याय आता आरोग्य सेतू या अँप वर हि उपलब्ध आहे आपण तेथे जाऊनही नोंदणी करू शकता किंवा कोविन (https://www.cowin.gov.in/) वेबसाइटवर ही नोंदणी करू शकता. त्याची प्रक्रिया आपल्याला पुढे स्पष्ट केली आहे, जी खालीलप्रमाणे आहे.

Covid vaccine registration app in India
  • स्टेप-१ : या वेबसाइटद्वारे नोंदणी करण्यासाठी, आपण प्रथम या वेबसाइटला भेट द्या.
  • स्टेप-२ : या पृष्ठास भेट दिल्यानंतर, आपल्याला एक “Register/ Sign In yourself” पर्याय दिसेल जिथे आपल्याला नोंदणी करण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगितले जाईल.
  • स्टेप-३ : या वेबसाइटला भेट दिल्यानंतर आपणास आपला मोबाइल नंबर, ज्या मोबाइल नंबरवरून आपण नोंदणी करू इच्छित आहात असे विचारले जाईल.
  • स्टेप-४ : ओटीपी नंबर ने आपला मोबाइल नंबर सत्यापित करा.
  • स्टेप-५ : त्यानंतर पुढील चरणात आपल्याला आपली माहिती आपल्या आधार क्रमांकासह भरावी लागेल, जसे आपले नाव, वडिलांचे नाव इत्यादी (वरील प्रमाणे) सर्व माहिती भारताचं आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
  • स्टेप-६ : आपण आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांची नावेही त्यात जोडू शकता.
  • स्टेप-७ : या वेबसाइटवर आपण चार पेक्षा जास्त सभासदांची नोंदणी करू शकता.
  • स्टेप-८ : संपूर्ण प्रक्रियेनंतर आपली नोंदणी पूर्ण होते. लसीकारणाच्या दिवशी आपणास संदेश किंवा कॉल केले जाईल.

लसीकरणासाठी ऑफलाइन नोंदणी कशी कराल ?

जर आपल्याला ऑनलाईन रजिस्टर करायचे नसेल, किंवा काही कारणास्तव करता आले नाही, तर आपण ऑफलाइनही नोंदणी करू शकता. त्यासाठी आपल्याला जवळच्या लसीकरण केंद्रावर जावे. जाताना आपले आधार कार्ड सोबत घेऊन जावे, ज्यामुळे आपली ओळख पटेल आणि आपली नोंदणी करणे शक्य होईल.

लसीकरणासाठी कधी जावे ?

आपण नोंदणी केल्या नंतर, आपल्या स्थानिक लसीकरण केंद्राकडून लसीकरणची तारीख सांगितली जाईल. आपण त्या तारखेला जाऊन लसीकरण करवून घ्यावे. ती आपापली जबादारी आहे. लसीकरणा नंतर आपण आपल्या प्रमाणपत्र हे शकयतो त्या-त्या लसीकरण केंद्राकडून आपल्याला दिले जाते. जर तसे न मिळाल्यास उमंग अँप वर जाऊन स्वतःचे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.

सामान्य प्रश्न (FAQ) :

प्र. काय लस (वैक्सीन) विना मूल्य आहे का ?
उत्तर : होय ! सर्व सरकारी दवाखान्यात, लसीकरण सेंटर येथे, लस विना मूल्य आहे .

प्र. काय लस सुरक्षित आहे?
उत्तर : होय! लस संपूर्णतः सुरक्षित आहे.

प्र. काय लस स्वदेशी आहे?
उत्तर : होय ! सर्व सरकारी दवाखान्यात दिली जाणारी लस भारताचीच आहे आणि भारतच बनलेली आहे.

प्र. नोंदणी नकरता लस घेता येईल का?.
उत्तर : होय ! काही लसीकरण सेंटर येथे अशी सोय उपलब्ध आहे, आपली नोंदणी प्रक्रिया ते स्वतः पूर्ण करतात. पण नोंदणी आवश्यक आहे.

प्र. कोविड लस (वैक्सीन) प्रमाण पत्रे डाउनलोड करू शकतात.
उत्तर : कोविड लस प्रमाण पत्र आपण उमंग ऐप मधू डाउनलोड करू शकता.

काही अधिक वाचण्यासाठी :

  1. माय मराठीशी माझे नाते
  2. किल्ले महिमानगड

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x