Cricket World Cup Winners List | विश्वचषक विजेत्यांची यादी

Cricket World Cup Winners List | क्रिकेट विश्वचषक विजेत्यांची यादी सादर

नमस्कार मित्रांनो, या लेखात आम्ही तुम्हाला ODI आणि T20 साठी Cricket World Cup Winners List (क्रिकेट विश्वचषक विजेत्यांची यादी) सादर करत आहोत.

क्रिकेट म्हटलं की सर्व भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय, येथील खेळाडूंमुळे हा खेळ सर्वात जास्त लोकप्रिय झालाय. त्यात सुनील गावस्कर आणि सर्वात मोठे नाव म्हणजे क्रिकेटचा देव समाजाला जाणारा सचिन तेंडुलकर.
हीच लोकप्रियता समजून घेऊन मराठी रंग आपल्यासाठी देत आहेत आत्तापर्यंत झालेल्या सर्व Cricket World Cup Winners List 50 Overs (यादी).

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक:

सर्व प्रथम ICC एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 1975 मध्ये इंग्लंड येथे खेळवण्यात आला.

त्यावेळी हे सामने ६० षटकांच्या असायचे. ६० षटकांच्या या मालिकेस, एकदिवसीय सामन्यांची मालिका म्हणून ओळख मिळाली.

1987 मध्ये प्रथमच इंग्लंडच्या बाहेर क्रिकेट विश्वचषक चे सामने भरविण्यात आले. ते भारत आणि पाकिस्तानमध्ये, यांच्या संयोजनाने, आयोजन करण्यात आले होते.
याच 1987 च्या स्पर्धेमध्ये प्रत्येकसामान्यांच्या षटकांची संख्या ५० पर्यंत कमी करण्यात आली.
या वर्षी ही प्रतियोगिता, म्हणजेच ICC पुरुषांचा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक (ICC Men One-Day Cricket World Cup) ५ ऑक्टोबर २०२३ रोजी सुरू झाली.
अंतिम सामना १९ नोव्हेंबर २०२३ रोजी खेळवला जाईल.


सर्व क्रिकेट प्रेमींना विश्वचषक स्पर्धेच्या सुरुवातीपासून, या वर्षीच्या सर्व विजेत्यांचे तपशील जाणून घ्यायचे आहेत. म्हणून लेखात, आम्ही १९७५ ते २०२३ पर्यंत सर्व एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक विजेत्यांची यादी समाविष्ट करत आहोत. नक्की वाचा.

क्रिकेट विश्वचषक विजेत्यांची यादी:

ICC पुरुष विश्वचषक 2023 भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर 2023 दरम्यान होत आहे. आजवर एकूण १२ विश्वचषक स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आहेत. यातील पाच विश्वचषक जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा सर्वात सफल देश आहे.

२००७ मध्ये सलग तीन विश्वचषक स्पर्धा जिंकणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ ठरला होता. भारत आणि वेस्ट इंडिज हे दोनच देश आहेत ज्यांनी प्रत्येकी २ वेळा विश्वचषक जिंकला आहे.

भारताने पहिला १९८३ आणि २०११ मध्ये विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. तसेच वेस्ट इंडिजने १९७५ आणि १९७९ मध्ये सलग दोनदा, विश्वचषक जिंकले आहेत.

2019 मध्ये झालेला मागचा 50 षटकांचा विश्वचषक इंग्लंडने जिंकला होता.

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक विजेत्यांची यादी खालील प्रमाणे आहे.

1975 ते 2023 मधील पुरुष 50 षटकांच्या ODI क्रिकेट विश्वचषक विजेत्यांची यादी येथे देत आहोत. विजेते, उपविजेते, यजमान देश, एकूण धावसंख्या आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) आणि त्यांचा अंतिम निकाल, या सर्वांचे विवरण येथे केले आहे.

क्रिकेट विश्वचषक विजेत्यांची यादी: Cricket World Cup Winners List

ODI World Cup Winners List:

क्र.वर्षआयोजक देशविजेता संघधावसंख्याधावपटूधावसंख्यापरिणाम
11975इंग्लंडवेस्ट इंडिज291-8ऑस्ट्रेलिया274वेस्ट इंडिज 17 धावांनी विजयी
21979इंग्लंडवेस्ट इंडिज286-9इंग्लंड194वेस्ट इंडिज 92 धावांनी विजयी
31983इंग्लंडभारत183वेस्ट इंडिज140भारताने 43 धावांनी विजय मिळवला
41987भारत आणि पाकिस्तानऑस्ट्रेलिया253–5इंग्लंड246–8ऑस्ट्रेलिया 7 धावांनी विजयी
51992ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडपाकिस्तान249-6इंग्लंड227पाकिस्तानने 22 धावांनी विजय मिळवला
61996पाकिस्तान आणि भारतश्रीलंका245–3ऑस्ट्रेलिया241श्रीलंका 7 विकेटने विजयी
71999इंग्लंडऑस्ट्रेलिया133-2पाकिस्तान132ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्सने विजयी
82003दक्षिण आफ्रिकाऑस्ट्रेलिया359-2भारत234ऑस्ट्रेलियाने 125 धावांनी विजय मिळवला
92007वेस्ट इंडिजऑस्ट्रेलिया281–4श्रीलंका215–8ऑस्ट्रेलियाने 53 धावांनी विजय मिळवला
102011भारत आणि बांगलादेशभारत277–4श्रीलंका274–6भारत 6 गडी राखून जिंकला
112015ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडऑस्ट्रेलिया186-3न्युझीलँड183ऑस्ट्रेलिया 7 विकेट्सने जिंकला
122019इंग्लंड आणि वेल्सइंग्लंड241न्युझीलँड241–8सुपर ओव्हरनंतर सामना बरोबरीत;
इंग्लंड ला चौकार संख्याच्या निकषावर
विजयी घोषित केलं.
132023भारत आणि ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया241-4भारत240ऑस्ट्रेलिया 6 विकेट्सने जिंकला

ICC World Cup Winners List : Other Information

क्रिकेट विश्वचषक विजेत्यांची यादी: प्रत्येक देशानुसार निकाल

⧪ ऑस्ट्रेलिया हा आयसीसी एकदिवसीय विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ आहे.
⧪ ऑस्ट्रेलियाने आता पर्यंत 5 वेळा विश्वचषक जिंकला आहे आणि 2 वेळा उपविजेता ठरला आहे.
⧪ त्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिजने 2 वेळा विश्वचषक जिंकला.
⧪ मागील ICC एकदिवसीय पुरुष विश्वचषक 2019 इंग्लंड आणि वेल्स येथे आयोजित करण्यात आला होता आणि हा विश्वचषक प्रथमच यजमान देश इंग्लंडने जिंकला होता.

ODI क्रिकेट विश्वचषक विजेत्यांची देशानुसार यादी खाली देत आहोत. ICC World Cup Champion List:

संघअंतिंफेरीचे एकूण
सामने
विजेते पदाची
संख्या
वर्षेउपविजेते पदाची
संख्या
वर्षे
ऑस्ट्रेलिया861987, 1999, 2003,
2007, 2015, 2023
21975, 1996
इंग्लंड41201931979, 1987, 1992
भारत421983, 201122003, 2023
न्युझीलँड2022015, 2019
पाकिस्तान21199211999
श्रीलंका31199622007, 2011
वेस्ट इंडिज321975, 197911983

क्रिकेट विश्वचषक विजेत्यांची यादी (T-20)

क्रिकेट विश्वचषक विजेत्यांच्या यादीत आम्ही T-20 विश्वचषक विजेत्यांना समाविष्ट केले नाही तर ते अन्यायकारक ठरेल. तुम्ही खालील लिंकवरून T20 क्रिकेट विश्वचषक विजेत्यांची यादी पाहू शकता:

T20 cricket world cup winners list 2023

T20 world cup winners list, T20 world cup winners,

Asia cup winners list, Asia cup cricket winners list

Women’s cricket world cup winners list T20

Blind cricket world cup winners list

Cricket World Cup Winners List- FAQs

प्र.1- क्रिकेट विश्वचषक २०२३ चे आयोजन कोण करत आहे?

उत्तर: क्रिकेट विश्वचषक २०२३ चे आयोजन भारत करत आहे.

प्र.2- आतापर्यंत किती क्रिकेट विश्वचषक झाले आहेत?

उत्तर: आतापर्यंत एकूण १२ क्रिकेट विश्वचषक झाले आहेत.

प्र.४- कोणत्या विश्वचषकात डाव 60 वरून 50 षटकांचा करण्यात आला?

उत्तर: १९८७ च्या चौथ्या विश्वचषकात डाव 60 वरून 50 षटकांचा करण्यात आला.

प्र.५- भारताने किती वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकला?

उत्तर: १९८३ आणि २०११ असे दोन वेळा भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे.

प्र.६- क्रिकेट विश्वचषक २०२३ चे आयोजन कोण करणार?

उत्तर: क्रिकेट विश्वचषक २०२३ चे आयोजन भारत करत आहे.

प्र.७- 2027 च्या क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन कोण करणार?

उत्तर: 2027 च्या क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे (सह-यजमान) करणार आहेत.

प्र.८. T-20 विश्वचषक कधी सुरू झाला?

उत्तर: T-20 विश्वचषकाची सुरुवात २००७ ला झाली.

इतर माहिती :


मराठी चारोळ्या
Poem on Maharashtra
मराठी कविता
Diwali Mahiti In Marathi
भारतीय सण

For Credit Card Apply here:

अधिक आकर्षक लेखांसाठी आमचे अनुसरण करा आणि जग एक्सप्लोर करण्यासाठी कनेक्ट रहा मराठी रंग सोबत. चला संवाद आणि समजूतदारपणाची शक्ती स्वीकारूया.

1. Perfect World Travel Guide
2. 9 Most Popular EV Cars in the USA 
3. 9 Best Things About Apple TV 4K – Third Generation
4. Think before You Renew Amazon Prime
5. Jimmy Carter: A Great Legacy
6. Memorial Day: Honoring the Sacrifice, Celebrating Freedom

School Site :
For English grammar and lot more : Smart School Infolips

Marathi Poems: Marathi Rang

marathi poem

Marathi Poems

Smart School

English Grammar

online shopping

Online Shopping

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x