Debit-Credit Cards New Rules | डेबिट-क्रेडिट कार्डचे नवे नियम
Debit-Credit Cards New Rules | डेबिट-क्रेडिट कार्डचे नवे नियम : १ जानेवारी २०२२२ पासून डेबिट कार्ड – क्रेडिट कार्डचे नवे नियम लागू होणार आहेत. ते काय आहेत तुम्हाला ते माहित असणे आवश्यक आहे म्हणून हा लेख लिहत आहे.क्रेडिट-डेबिट कार्डचे नवे नियम
Debit-Credit Cards New Rules to into force from 1 January 2022.
सध्या डेबिट/क्रेडिट कार्ड जवळ पास सर्वच जण वापरात आहे, सर्वजण त्याचा ऑनलाइन-ऑफ लाईन उपयोगही करतात. हेच ऑनलाइन पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्डची सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने हे नवीन नियम लागू केले आहेत.
ऑनलाइन व्यापारी आणि पेमेंट गेटवे यांना ग्राहकांचा जमा केलेली संवेदनशील माहित (सेन्सेटिव्ह डेटा) जमा करण्यास सांगितले आहे. येत्या १ जानेवारी २0२२ पासून हे नवे नियम लागू होणार आहेत. ह्या नवीन नियमांनुसार, जाणून घेऊया हे नवीन नियम.
व्यापाऱ्यांना व्यवहार करण्यासाठी एनक्रिप्टेड टोकन वापरावे लागतील. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, ग्राहकांनी प्रत्येक वेळी ऑनलाइन व्यवहार करताना त्यांचे क्रेडिट किंवा डेबिट कार्डचे तपशील प्रविष्ट केले पाहिजेत किंवा ते टोकनायझेशन ची निवड करू शकतात. नियम लागू करण्याची तारीख जवळ आल्याने, बँकांनी त्यांच्या ग्राहकांना आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांबद्दल, मोबाईल मेसे द्वारे सूचित करण्यास सुरुवात केली आहे.
बदललेले नवीन नियम :
➢ २०२० च्या मार्च मध्ये, आरबीआयने ग्राहकांसाठी डेटा सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.
➣ त्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, व्यापार्यांना त्यांच्या वेबसाइटवर क्रेडिट किंवा डेबिट कार्ड माहिती जतन करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले होते. म्हणजेच ते ग्राहकांच्या कार्ड्सची माहिती (details) जतन/सेव्ह करून ठेऊ शकत नाहीत.
➣२०२१ च्या सप्टेंबरमध्ये, नियामक संस्थेने एक नवीन नोटीस जारी केली होती. त्या सुनावणी द्वारे भारतातील सर्व कंपन्यांना मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचे आदेश दिले.
➢ १ जानेवारी २0२२ पासून त्यांच्या सिस्टममधून जतन केलेला डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहित काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
➣ RBI ने कंपन्यांना ऑनलाइन व्यवहार टोकन द्वारे करण्याचा पर्याय देखील सुचविला आहे.
टोकनीकरण म्हणजे काय ?
टोकनीकरण म्हणजे ते समजून घेऊ.
जेव्हा डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी केला जातो, तेव्हा त्या व्यवहाराची अंमलबजावणी करताना १६-अंकी कार्ड क्रमांक. त्याचा, CVV नंबर आणि कार्डची कालबाह्यता तारीख, त्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला वन टाइम पासवर्ड (OTP) या सर्व माहितीवर आधारित असतो. म्हणजेच ऑनलाइन व्यवहार यशस्वी व्यवहारासाठी आपल्याला वर नमूद केलेली सर्व माहिती योग्यरित्या प्रविष्ट करणे अनिवार्य असते. दिलेली माहित जर जर बरोबर असेल तरच आपला व्यवहार पूर्ण होतो.
इथपर्यंतची माहिती आपल्याला होतीच. या पुढे टोकणीकरण काम करत.
टोकनायझेशनमध्ये कार्डचे वास्तविक तपशीलच ‘टोकन’ म्हणून ओळखल्या जाणार्या अद्वितीय (Unique) पर्यायी कोडने बदलले जातात. म्हणजे जेंव्हा आपण एखादा ऑनलाईन व्यवहार करत असतो तेंव्हा, त्या व्यवहाराची माहिती आपल्या कार्ड ची माहित आणि आपण दिलेली माहित या सर्व मिळून, सिस्टिम द्वारे प्रत्येक संयोजनासाठी एक नवीन नंबर बनविले (जनरेट) जाते. या युनिक नंबरलाच टोकन म्हटले जाते. या टोकनायझेशनच्या प्रक्रियेमुळे ग्राहकाच्या कार्डचे तपशील सुरक्षितपणे ठेवले जातील, व्यापाऱ्यांना वापरकर्त्याच्या संपूर्ण खात्याच्या तपशीलांची माहिती राखीव ठिवली जाते.
चला तर पाहू नवीन नियम कोणते असतील.
जेंव्हा आपण कोणत्याही व्यापाऱ्यासोबत पहिले पेमेंट करतो तेंव्हा तेव्हा ग्राहकांना प्रमाणीकरणाच्या अतिरिक्त घटकासह (AFA) आपल्या संमतीने कार्ड्सची माहित स्टोर केली जाते. केल्यानंतर जेव्हापण दुसरे व्यवहार करतो, तेंव्हा ग्राहक त्यांच्या कार्डचा CVV आणि OTP नंबर टाकून पेमेंट करू शकतात. जे आता नाही होणार. प्रत्येक वेळेस कार्डची संपूर्ण माहिती देणे अनिवार्य असेल.
Working process of Tokenisation | टोकनीकरणाचे कार्य खालील प्रमाणे असेल.
➩ जेव्हा तुम्ही व्यापार्याकडून खरेदी सुरू करता, तेव्हा व्यापारी त्यांच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डला टोकनाइज करण्यासाठी ग्राहकाच्या संमतीची विनंती करूनच टोकनीकरण सुरू करतो.
➪ ग्राहकाच्या मंजुरी असेल तरच, व्यापारी कार्ड नेटवर्कला टोकनीकरण करण्याची विनंती पाठउ शकतो.
➩ कार्ड नेटवर्क कंपनी विशिष्ट कार्ड नंबरसाठी १६-अंकी टोकन तयार करते आणि ते नंतर व्यापाऱ्याला परत पाठवते
➪ व्यापारी भविष्यातील व्यवहारांसाठी हे टोकन जतन करतो.
➩ ग्राहकाने त्या नंतर CVV आणि OPT क्रमांकासह हा व्यवहारा मान्यता करू शकतो.
➩ वेगवेगळ्या व्यापार्यांना पेमेंट करण्यासाठी किंवा वेगळ्या कार्डवरून पेमेंट करण्यासाठी ग्राहकांना हि संपूर्ण प्रक्रिया पुन्हा करावी लागेल.
या प्रक्रियेमुळे तुमचे कार्ड खूप प्रमाणात सुरक्षित रहित, कारण तुमच्या कार्डची खरी माहिती लपून राहील व सिस्टिम जेनरेटेड टोकन नंबर त्यांच्या कडे सेव्ह राहील.
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपण या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
| Education Related : Everything about education|
- Gudi Padwa Wishes in Marathi 2023 - March 21, 2023
- World Most 7 No Fly Zone Places | नो फ्लाय झोनची ठिकाणे - December 25, 2022
- What Commerce Students can do after 12| Best Options - December 24, 2022