Desh Bhakti Poem| Swatantra Vir Savarkar

Desh Bhakti Poem in Marathi :

देशभक्ती कविता:

देशभक्ती ही प्रेत्यकाची, त्याच्या विचारानुसार देशाशी जोडलेली एक भावना आहे. तिची अनेक रूपे असू शकतात, ती अनेक प्रकारे व्यक्त करू शकतात. काही लोक त्यांची देशभक्ती सेवा, कार्य या द्वारे व्यक्त करतात, तर काही लोक राष्ट्रीय धोरणांना किंवा राजकीय नेत्यांच्या समर्थन करून व्यक्त करतात. तर काही जण समाज प्रबोधनातून करतात. तर काही जण आपल्या लिखाणातून करतात. देशभक्ती ही एक एकत्रित शक्ती आहे, जी लोकांना एकत्र आणते आणि आपलेपणा आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना वाढवते.

आज आपल्या कवयत्री प्रियांका रोठे यांनी देखील अशाच भावनां शब्दांत गुंफले आहेत. देश स्वतंत्र करण्यासाठी ज्यांनी आपले प्राण सहज देऊ केले, ते ही कसलीच अपेक्षा न ठेवता. अशाच एका थोर क्रांतिकार श्री विनायक दामोदर सावरकर. नाही समजले का? स्वतंत्रवीर सावरकर, ज्यांच्या अमर आणि अफाट कार्याला आजही खरा न्याय मिळालाच नाही. त्यांच्या विषयीची तळमळ, त्यांची व्यथा येथे व्यक्त केली आहे, वाचा तुम्हाला नक्की आवडेल. (Desh Bhakti Poem)

Desh Bhakti Poem| Swatantra Vir Savarkar

स्वातंत्र्यवीर सावरकर

थोर ती माऊली जिने वीर जन्मा घातले
मायभुमिसाठी ज्याने कण कण वेचले

थरथरला तो काळ अन मृत्यूही ओशाळले
यातना ज्या सोसल्या केली त्याची शब्दफुले

कवी मनाचा क्रांतिकारी तत्वज्ञानी जाहले
वीर सावरकर नाव तयाचे भूतलावर कोरले

वेदना नी दुःख ही, चांदण्यांचा गारवा भासले
वीर दिनरात जेव्हा स्वतंत्र मातृभूमी स्मरले

निःश्वास कित्येक अन् कित्येक लांछने झेलले
खरे सावरकर का कधी आम्हांस उमगले

अर्पिले प्राण अन् आयुष्य अखंड वाहिले
गालबोट कार्यास त्यांच्या का तरीही लागले

खरे सावरकर शोधताना खूप दुवे पाहिले
आपल्याच माणसांनी असे पक्षपात का केले

दोन पुत्र, वीर दोन, भारतभूवर जन्मले
नशिबी एकाच्या कायम उपहासच लाभले

कुलूपाआडून कधी जेव्हा सत्य समक्ष येईल
सच्चा वीरास त्या, ती खरी श्रद्धांजली होईल

दडवलेले जे जे, ते ते तसेच मज भेटता
हर्षूनी नाचेल अखंड महाराष्ट्राची जनता

माझ्या मराठी भूमीवरी एक रत्न जे उपजले
शिवरायांच्या मावळ्यासम भाग्य ज्यास लाभले

—- प्रियांका रोठे

Desh Bhakti Poem : Swatantravir Sawarkar.

|Related: What Commerce Students can do after 12| Best Options … Read more

List of Desh Bhakti Poem:

1. Patriotic Poems in Marathi | देशभक्तिपर कविता मराठी-२०२१
2. Desh Bhakti Kavita in Marathi | जय भारत – मराठी कविता
3. Marathi Kavita | स्त्री – मराठी कविता

अधिक कविता:

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.
➥ Learn What is credit card – Infolips.

More about Desh Bhakti Poem, we have right

प्रियांका रोठे

About प्रियांका रोठे

नमस्कार, मी प्रियंका रोठे, महाराष्ट्र, ठाणे. मी यशस्वीरित्या माझ्यातील लेखनाचे प्रेम जपले आहे. पुस्तकांबद्दल माझे प्रेम बालपणातच विकसित झाले. मी शाळेच्या ग्रंथालयातून पुष्कळ पुस्तके वाचत होते. तेथून मला लेखनाची आवड आणि सवयही लागली. मला माझे विचार मातृभाषा, मराठीतुन लेखणीच्या साह्याने स्पष्ट करायला आवडतात. मला आशा आहे की तुम्हीही याचा आनंद घ्याल. धन्यवाद !

Check Also

Ekati Rahu De Mala

Ekati Rahu De Mala | एकटी राहू दे आज मला | Best Marathi Poem

Ekati Rahu De Mala | एकटी राहू दे आज मला एकटी राहू दे आज मला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!