Heart Touching Love Poem in Marathi | प्रेम कविता

Heart Touching Love Poem in Marathi | Marathi Prem Kavita प्रेम कविता

Heart Touching Love Poem in Marathi | Marathi Prem Kavita प्रेम कविता

तुझी-माझी भेट

-: तुझी-माझी भेट :-

तुझी-माझी भेट झाली ज्या दिवशी,
जग सारे बदलले त्या दिवशी,
पाहुनी तुझा तो चेहरा हौशी,
मन माझे राहिले ना माझ्या पाशी

सदा नि कदा तुझाच विचार
जग तुझ्यातच घेरलं सारं
कोठून आलं प्रेमाचं हे वारं
गेलं उघडून मनाचं दार
उघड्या मनाच्या दारा पाशी
कसा खेळू लागलो माझ्या मनाशी
पाहुनी तुझा तो चेहरा हौशी,
मन माझे राहिले ना माझ्या पाशी ।।१।।

आधी कधी असं ना घडलं
मन एका विचारी ना रमलं
बेधुंद फिरणारं पाखरू का
तुझ्याच भवती फिरू लागलं

झेप घेण्यासाठी या आकाशी
कसा झुंजू लागलो त्या वाऱ्याशी
पाहुनी तुझा तो चेहरा हौशी,
मन माझे राहिले ना माझ्या पाशी।।२।।

Heart Touching Love Poem in Marathi | Marathi Prem Kavita प्रेम कविता

अधिक कविता:

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

आवश्यक लिंक्स :
शैक्षणिक माहितीसाठी : येथे क्लीक करा.
खेळांविषयी च्या माहितीसाठी : येथे क्लीक करा.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

4 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x