ITR Filing – One common ITR form for all | सर्वांसाठी एकच फॉर्म

ITR filing: One common ITR form for all taxpayers on the anvil; details here:

ITR Filing: One common ITR form for all

आयकर विभागाने आयटीआर-7 वगळता इतर सर्व चालू उत्पन्नाच्या रिटर्नचे फॉर्म विलीन करून सर्व करदात्यांसाठी एकच समान आयटीआर फॉर्म सादर करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. हे करण्याचा उद्देश, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाद्वारे आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या आहे. सर्वांना सहज पद्धतीने आपला कर भरता यावा ह्या एकमेव उद्धेशाने ही प्रक्रिया सुरु केली आहे.

नमस्कार मित्रांनो, आज आपण marathirang.com च्या “सरकारी योजना” या सदराखाली “ITR Common Form” या विषयीची माहिती करून घेणार आहोत. आपले कर कसे भरावे, त्यासाठी काय प्रक्रिया करावी याविषयीची माहिती आपल्याला असावी म्हणून हा लेख लिहत आहोत.

ITR फॉर्म चा नवा रूप :

भारत सरकारने नवीन इंटिग्रेटेड इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाइलिंग फॉर्म सादर करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, ज्याचा मसुदा CBDT ने नुकताच सादर केला आहे. सध्याचा उपलब्द असलेले ITR 1 आणि ITR 4 हे फॉर्म सुरू राहीतील. आयकरदात्यांना त्यांचे कर रिटर्न भरताना कोणता फॉर्म हवा आहे ते निवडण्याचा पर्याय मिळेल. प्रस्तावित सामान्य ITR फॉर्म किंवा विद्यमान फॉर्म (ITR 1 किंवा ITR 4), 1 नोव्हेंबर 2022 रोजी CBDT च्या मसुद्याच्या प्रस्तावानुसार. CBDT ने म्हटल्या प्रमाणे एकत्रित फॉर्म स्मार्ट डिझाइन, योग्य प्रवाह आणि फिलिंग अगओदरची वाढीव व्याप्ती यावर लक्ष केंद्रित करते. आयटीआरमध्ये नोंदवल्या जाणार्‍या डेटाच्या तुलनेत प्राप्तिकर विभागाकडे उपलब्ध असलेल्या तृतीय-पक्ष डेटाचा ताळमेळ साधणे देखील हे सुलभ करेल, करदात्यांच्या टॅक्स फाईल भार कमी करण्यासाठी मदत करेल (it will help for ITR Filing).

नव्या योजनेचे कारण:

सध्या, करदात्याचे कायदेशीर वर्गीकरण आणि उत्पन्नाचे स्वरूप यावर अवलंबून, करदात्यांनी त्यांचे आयकर विवरणपत्र ITR 1 ते ITR 7 या स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये बऱ्याच जणांचा संभ्रम होतो की, आपण नेमकी कोणता फॉर्म भरावा.

“सध्याचे उपलब्ध असलेल्या ITR फॉर्म मध्ये करदात्याला सर्व वेळापत्रकांमधून जाणे अनिवार्य आहे, ते विशिष्ट वेळापत्रक लागू आहे की नाही याची पर्वा न करता, ते पाळावेच लागते. यामुळे ITR दाखल करण्यासाठी लागणारा वेळ वाढतो आणि त्या बदल्यात, करदात्यांना टाळता येण्याजोग्या अडचणी निर्माण होऊ शकतात,”

उत्पन्न आणि कॉर्पोरेट टॅक्सच्या बाबतीत सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था, CBDT ने असे स्पष्ट केले आहे, “करदात्यांना त्यांच्यासाठी लागू नसलेली वेळापत्रके/ चार्ट्स पाहण्याची आवश्यकता नाही.” (You have to check it while ITR Filing)

कॉमन आयटीआरची योजना:

प्रस्तावित कॉमन आयटीआरची योजना खालीलप्रमाणे आहे: (ITR Filing new scheme)

“प्रस्तावित मसुदा आयटीआर आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतींच्या अनुषंगाने रिटर्न फाइलिंग सिस्टमवर फेरविचार करतो,” असे CBDT म्हटले आहे. त्याचे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
(a) मूलभूत माहिती (भाग A ते E चा समावेश आहे), एकूण उत्पन्नाच्या गणनेचे वेळापत्रक (शेड्यूल TI), कराच्या गणनेचे वेळापत्रक (शेड्यूल TTI), बँक खात्यांचे तपशील आणि कर भरण्याचे वेळापत्रक (शेड्यूल TXP) हे मुद्दे, सर्व करदात्यांना अनिवार्य असतील.
(b) आयटीआर करदात्यांनी उत्तरे दिलेल्या काही प्रश्नांवर आधारित लागू वेळापत्रकांसह करदात्यांसाठी अनुकूल होईल असे केले आहे (विझार्ड प्रश्न).

(c) प्रश्नांची रचना अशा पद्धतीने आणि क्रमाने केली गेली आहे की कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असल्यास, या प्रश्नाशी संबंधित इतर कोणतीही माहिती दाखवली जाणार नाही, त्यामुळे ती माहिती भरण्याची गरज उरणार नाही.
(d) लागू होणार्‍या वेळापत्रकांबाबत निर्देश असलेले विवरणपत्र भरण्यात मदत करण्यासाठी सूचना जोडल्या गेल्या आहेत. यामुळे फॉर्म अचूक भरण्यास मदत होईल.
(e) प्रस्तावित ITR अशा प्रकारे डिझाइन केले गेले आहे की प्रत्येक पंक्तीमध्ये फक्त एक वेगळे मूल्य आहे. यामुळे रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होईल. त्यामुळे, करदात्यांना फक्त त्यांना लागू होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील आणि ज्या प्रश्नांची उत्तरे ‘होय’ म्हणून दिली गेली असतील त्या प्रश्नांशी जोडलेले वेळापत्रक भरावे लागेल. (Ensure when ITR Filing)

नवीन प्रस्तावित फॉर्ममुळे करदात्यांच्या वेळेची आणि कामाची बचत होईल, असे अनुमान CBDT ने वातविला आहे. पाहूया आता हा प्रस्ताव कधी मंजूर होतो आणि कधी पर्यंत अमलात आणतात.

So this is the perfect option for ITR Filing, if this will approve and implimented.

अधिक कविता :

➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!