Best Marathi Poem | Lek Aamchi Ladachi | लेक आमची लाडाची
Lek Aamchi Ladachi | लेक आमची लाडाची
Hello Friends, one more Marathi Poem on Family:
या मार्मिक कौटुंबिक कवितेत, वधू, लग्नाच्या उंबरठ्यावर खूप आनंददायी आणि प्रिय आठवणींसह, आपल्या प्रियजनांना मागे सोडून, पतीच्या घरी प्रवासाला निघते. या कवितेत, मुलीच्या पालकांच्या, नातेवाईकांच्या आणि स्वतः वधूच्या भावनांना कोमलतेने हाताळण्याचा प्रयन्त केला आहे. वियोगाचे कटू-गोड क्षण, तिच्या कुटुंबाने तिच्यावर केलेले प्रेम, आशीर्वाद रूपाने मुली सोबत देतानाचे क्षण अनुभवले आहेत.
तिच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची होणारी सुरुवात येथे व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. नववधू तिची रजा घेते तेंव्हा तिचे हृदय कृतज्ञता, आणि आपुलकीच्या खोल भावनेने भरून जाते. या भावना मी शब्दांत मांडण्यात किती यशस्वी झाले हे कविता वाचूनच ठरावा. आशा आहे तुम्हाला आवडेल.
Lek Aamchi Ladachi | लेक आमची लाडाची :
लेक आमची लाडाची
सडा संमार्जन अन रांगोळी अंगणी,
केळीचे खांब अन तोरणे दारी.
लग्नसोहळा पहा रंगला घरी
लाडकी बहिण निघाली सासरी |
मांडव सजला सप्तरंग गगनी,
कौतुकाने जमले सर्व मंडपी.
साजणाची आली स्वारी अन,
लाजून लाल आमची नवरी ।
नऊवारी शालू अन् पैठणी,
नानाविध दागिन्यांनी नटली.
नवरी आमची दिसते देखणी,
खाण सौंदर्याची मराठमोळी ।
साखरपुडा संगीत अन् मेहंदी,
पाहता-पाहता हळदही लागली.
लग्नघटिका जवळ आली,
धडधड उरीची का ग वाढली ।
जाण्याची वेळ जवळी येता,
पाऊल पदोपदी का ग अडते.
माणसं ओळखीची खरंतर,
तरी वाट का अनोळखी वाटते ।
लेक जाते सासरी अन्,
काळजात खोल दुखत.
ती जाण्याचं दुःख मात्र,
आई बापाला खरं कळतं ।
येतजात राहीन म्हणते ती खरी,
पण रमते जाऊन स्वतःच्या घरी.
रिकाम्या सुन्या या घरीदारी,
डोळे त्या परतीच्या वाटेवरी ।
आई बाबा भाऊ बहिणीची,
कुपीच ही त्यांच्या काळजाची.
ठेवा जपून जावईबापू,
लेक ही आमची लाडाची ।
– लेक ही आमची लाडाची ।
Lek Aamchi Ladachi | लेक आमची लाडाची:
इतर माहिती :
For Credit Card Apply here:
अधिक आकर्षक लेखांसाठी आमचे अनुसरण करा आणि जग एक्सप्लोर करण्यासाठी कनेक्ट रहा मराठी रंग सोबत. चला संवाद आणि समजूतदार पणाची शक्ती स्वीकारूया.
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.
➥ Learn What is credit card – Infolips.
- Best Marathi Poem | Lek Aamchi Ladachi | लेक आमची लाडाची - March 12, 2024
- My Family Poem in Marathi | Mhatarpan | म्हातारपण - February 28, 2024
- Marathi Kavita Prem | Prem Kavita - December 14, 2023