Marathi Kavita On Life | आठवणींचा खजिना

Marathi Kavita On Life | आठवणींचा खजिना : कवियित्रीच्या मनात, अचानक उभ्या राहिलेल्या ह्या जुन्या आठवणी. त्यातील काही खास होत्या आणि त्या आठवणीच जेंव्हा आपल्या कवियित्रीशी संवाद साधतात, त्यांच्याशी बोलतात, तेंव्हा बनते एक कविता. त्यांच्या बोलण्यातले शब्द आणि त्यातून निघालेला, जीवन जगण्याचा नवा अर्थ. वाचा तुम्हालाही आवडेल. धन्यवाद !

Marathi kavita on imagination

Marathi Kavita On Life | आठवणींचा खजिना :

आठवणींचा खजिना

आठवणींचा खजिना पुन्हा
उघडून पाहिला हिशोबाखातर
जमाबाकी जुळलीच नाही
एक आठवण होती कोऱ्या पानावर

दूर एकटीच उभी होती
म्हणे येऊ कशी मी आत
चौकटीत न बसणारी
अशी एक मी सुप्त आठवण

म्हंटल बाई ग तु एक आठवण
मग का लपावं तू इतरांपासून
म्हणाली माझ्या अंगभर आहेत
अपराधीपणाचे पाश चहुवर

मला पाहता दुःखच व्हावे
असे माझे प्राक्तन असावे
आठवताच मीही तुम्हाला
क्लेशाचे कारण तव व्हावे

वाटले खरे हो तिचेच सारे
बरी दडलीये पटलांमागे
तिचे नसणेच बरे भासते
खोट्या मुखवट्याने सुखावते

भावनेचा उद्रेग होता मग
कधीतरी ती येणार समोर
मन मात्र करीत राही
आटापिटा न व्हावं म्हणून

तिचं येणं कुणा न चुकलं
लाख करा पराकाष्ठा तुम्ही
मनावर राज्य कुणाचंच
आजवर कधी चाललं नाही……
आजवर कधी चाललं नाही…..

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

Marathi Kavita Mazi Aai, marati poem on mother, marathi poem on love, marathi sundar kavita, marathi kavita status, marathi poem lyrics. Kavita marathi madhe, best marathi poems. marathi kavita on love, marathi kavita on love life, marathi kavita on love for him and marathi kavita on love for her. Your search will end here, you will all these type of poems in marathi. Yes Marathi Kavita. marathi kavita maza abola

marathirang.com
प्रियांका रोठे

नमस्कार, मी प्रियंका रोठे, महाराष्ट्र, ठाणे. मी यशस्वीरित्या माझ्यातील लेखनाचे प्रेम जपले आहे. पुस्तकांबद्दल माझे प्रेम बालपणातच विकसित झाले. मी शाळेच्या ग्रंथालयातून पुष्कळ पुस्तके वाचत होते. तेथून मला लेखनाची आवड आणि सवयही लागली. मला माझे विचार मातृभाषा, मराठीतुन लेखणीच्या साह्याने स्पष्ट करायला आवडतात. मला आशा आहे की तुम्हीही याचा आनंद घ्याल. धन्यवाद !

प्रियांका रोठे

नमस्कार, मी प्रियंका रोठे, महाराष्ट्र, ठाणे. मी यशस्वीरित्या माझ्यातील लेखनाचे प्रेम जपले आहे. पुस्तकांबद्दल माझे प्रेम बालपणातच विकसित झाले. मी शाळेच्या ग्रंथालयातून पुष्कळ पुस्तके वाचत होते. तेथून मला लेखनाची आवड आणि सवयही लागली. मला माझे विचार मातृभाषा, मराठीतुन लेखणीच्या साह्याने स्पष्ट करायला आवडतात. मला आशा आहे की तुम्हीही याचा आनंद घ्याल. धन्यवाद !

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

3 Comments
Inline Feedbacks
View all comments
Harshali
Harshali
2 years ago

मस्त 👌👌

Reply to  Harshali
2 years ago

Thanks for visit, check frequently, you will get more..

error: Content is protected !!
3
0
Would love your thoughts, please comment.x
()
x