
Marathi Kavita On Women | आक्रोश { आजची स्थिती पाहता आणि स्त्रियांवर होणारे आत्याचाराचे प्रमाण पाहता, खरंच स्त्रिया सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उभा राहतो. आणि याच स्थितीचा विचार करून आजच्या स्त्रीची व्यथा मांडण्याचा प्रयत्न या कवितेतून केला आहे. तिच्या मनाची होत असेलेली घालमेल आणि या व्यथा विरोद्ध स्त्रीचा आक्रोश व्यक्त केला आहे. नक्क्की वाचा तुम्हाला आवडेल.

Marathi Kavita On Women | आक्रोश
महिला दिनाच्या दिवशी, तूच जननी, तूच आदिमाया
हा जयघोष सगळीकडेच ऐकू येतो.
पण याच जयघोषात, रात्रीच्या अंधारातला,
तिचा आक्रोश मात्र दबून जातो ।।
आम्ही कुठे अडवतो हिला, जे आवडेल ते करू दे,
जेथे वाटेल तेथे जाऊदे , हिला सगळीच सूट आहे.
पण काही अनुचित झाले, तर सारेच म्हणू लागतात,
हिला सगळी सूट दिली, हीच आमची चूक आहे ।।
मुलगी वाचावा-शिकवा, महिलांचा सन्मान करा,
असे लिहिलेलं आपण, कित्येकदा सर्वंकडे पाहतो,
अहो पण रात्री अंधारात, मुलीला एकटी पाहता,
कित्येकांच्यातला नराधम, कसा काय जागा होतो ? ।।
शिक्षण घेणाऱ्या मुलींमध्ये, खूप-मोठ्या आशा आहेत,
पण बाहेर पडणाऱ्या प्रत्येकीच्या मनात, एक “निर्भया” आहे.
मुक्त फिरायचंय मला, स्वच्छंद होऊनि अनुभवायाचं जगाला,
अश्या असंख्य भावनांचा उद्रेक आहे, एक “आक्रोश” आहे ।।
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
- Ekati Rahu De Mala | एकटी राहू दे आज मला| Best Marathi Poem - April 1, 2025
- Maitri – A Friendship Poem in Marathi | मैत्री - March 22, 2025
- Patriotic Poems in Marathi | देशभक्तिपर कविता मराठी-२०२१ - August 14, 2021