Marathi Prem Kavita-Mazi man meet tu | माझी मन मीत तू
Marathi Prem Kavita-Mazi man meet tu | माझी मन मीत तू : कवीच्या मनात प्रेयसी विषयी असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. कवी साठी सारं काही तीच आहे, त्याच्या जगण्याची आशा, आकांक्षा, सर्वस्व तीच आहे. आणि तेच या कवितेतून व्यक्त केलं आहे. वाचा तुम्हालाही आवडेल. धन्यवाद !


Best Marathi Prem Kavita Athavan Yete| मज तुझी आठवण येते
Marathi Prem Kavita-Mazi man meet tu | माझी मन मीत तू :
माझी मन मीत तू, माझ्या मनीचा विचार तू,
माझे गोड गाणे तू, माझ्या गाण्याचा सूर तू ।। धृ ।।
किती पाहू किती राहू, न्याहळत तुज
किती बोलू किती सांगू, माझे हित गुज
रोम-रोमात भिनलं प्रेम, झालो मी धुंद
दूर-दूरवर बहरला तुझ्या, प्रीतीचा गंध
माझी प्राण ज्योत तू, माझ्या जीवनाचा सार तू ,
माझी नवी कल्पना तू, माझ्या कल्पनेचा द्वार तू ।।१।।
किती गाऊ, किती लिहू, गीत तुझ्या साठी,
किती न्हाऊ, किती वाहू, प्रीत तुझ्या साठी,
श्वास-श्वासात वाढू दे, साथ तुझी जीवनात,
क्षणा-क्षणास राहू दे, माझ्या हाती तुझा हात,
माझी सखी-रागिणी तू, माझ्या यशाचा जोर तू,
माझी मुक्त भावना तू, माझ्या भावनांची दोर तू.
||
माझी मन मीत तू, माझ्या मनीचा विचार तू,
माझे गोड गाणे तू, माझ्या गाण्याचा सूर तू ।। धृ ।।
कविता आवडल्यास आपला अभिप्राय नक्की कळवा. तसेच आपल्या मित्र-मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा.
धिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स