Maruti To Launch Next Gen Swift Dzire | नव्या जमण्याची स्विफ्ट डिझायर
Maruti To Launch Next Gen Swift Dzire | नव्या जमण्याची स्विफ्ट डिझायर
मारुती सुझुकी ही भारतीय कार बाजारातील अग्रणी कंपनी, आता नव्या जमण्याची स्विफ्ट डिझायर घेऊन येणार आहे. या कारचे मायलेज आणि इतर वैशिष्ट्य ऐकून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
नमस्कार मित्रांनो, आज आपण marathirang.com च्या “Vehicle” या सदराखाली मारुती सुझुकी च्या नवीन कार विषयीची माहिती करून घेणार आहोत. चला तर पाहूया ही कार (Next Gen Swift Dzire).
जसे आपण सर्वजण जाणतो, मारुती सुझुकी इंडिया, भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी. याच कंपनीने, त्यांच्या स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल म्हणजेच “SUV” मधील “विटारा” च्या भव्य यशानंतर, आणखी काही नवीन मॉडेल आणायचे नियोजित केले आहे. जसे हॅचबॅक “स्विफ्ट” आणि कॉम्पॅक्ट सेडान मढी स्विफ्ट डिझायरची नव्या जनरेशन ची, पूर्णतः नवीन, मजबूत-हायब्रीड पॉवरट्रेनसह आणण्याची सुनियोजित केले आहे.
कंपनीने जाहीर केलेल्या माहिती नुसार, या दोन्ही नवीन स्विफ्ट आणि डिझायर २०२४ च्या पहिल्या तिमाही पर्यंत लॉन्च केल्या जाणार आहेत. या दोन्ही मॉडेल्स देशातील सर्वात जास्त इंधन-कार्यक्षम असरणाऱ्या कार होणार आहेत. (Next Gen Swift Dzire from Maruti Suzuki)
|Related : Heart Touching Love Poem in Marathi | प्रेम कविता …. Read more.
या नवीन कारमध्ये सर्व-नवीन असणार आहे. सुझुकी 1.2 लिटर पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे. सध्या जे K12C च्या इंजिनच्या विपरीत, तीन-सिलेंडर युनिट असणार आहे. टोयोटाच्या मजबूत हायब्रिड तंत्रज्ञानाशी मिळते-जुळते असलेले हे इंजिन आहे. जपानी ऑटोमेकरचे हे नव्या तंत्रज्ञानाचे इंजिन, जे सध्या ग्रँड विटारा आणि अर्बन क्रूझर हायराइडर सारख्या कारमध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन अधिक कमी किमतीत उपलब्ध होण्यासाठी, देशात मोठ्या प्रमाणावर काम-काज केले जात आहे.
नव्या पिढीची (नेक्स्ट-जनरेशन) ही स्विफ्ट आणि डिझायर मजबूत हायब्रीड्स भारतातील सर्वात जास्त इंधन-कार्यक्षम असणारी कार बनू शकते. साधारणतः 35-40 kmpl चा ARAI-रेट मायलेज मिळवू शकते. या तुलनेत, चालू स्विफ्ट आणि डिझायर अनुक्रमे 22.56 kmpl आणि 24.1kmpl ची कमाल दावा केलेले इंधन आहे, जे फार कमी आहे. (Next Gen Swift Dzire )
उच्च इंधन क्षमता व्यवस्था आणि हायब्रीड पॉवरट्रेन मधून कमी कार्बन डाय ऑक्साईड चे उत्सर्जन होईल. या व्यतिरिक्त, ग्राहकांना मारुतीच्या कॉर्पोरेट सरासरी इंधन क्षमता (CAFE) रेटिंगचा फायदा होईल. अजून सांगायचे झाल्यास, ग्राहकांनी इंधनावर केलेली बचत देखील मजबूत हायब्रीड व्हेरियंट खरेदी करण्याचा, कारण बनू शकेल. होणाऱ्या बचतीचा फायदा, कारच्या उच्च खर्चाची भरपाई करण्यास मदत करेल. त्यामुळे बाजारात ह्या कारची मागणी वाढण्याची दाट शक्यता वर्तविलेली जाते.
तथापि, नवीन-जनरल स्विफ्ट आणि डिझायरच्या किमती देखील त्यांच्या मानक पेट्रोल समकक्षांपेक्षा १ लाख ते १.५० लाख रुपयांनी महाग होण्याची अपेक्षा आहे. सध्या, स्विफ्ट आणि डिझायर अनुक्रमे ₹ 5.92 लाख ₹ 8.85 लाख आणि ₹ 6.24 लाख, ₹ 9.18 लाख (एक्स-शोरूम, भारतात) ऑफर केल्या जात आहेत.
|Related : World’s 1st – First Electric Passenger Plane – Most awaited .. Read more
ग्रँड विटाराच्या सध्या आणि मजबूत अश्या हायब्रिड प्रकारांतील किंमतीतील फरक, आत्तापर्यंत सुमारे २.६ लाख रुपये आहे. तथापि, २०२४ मध्ये नेक्स्ट-जेन स्विफ्ट आणि डिझायर हायब्रीड्स लाँच करण्यापूर्वी मारुती कंपनी ह्या किंमती सुमारे १ लाख ते १.५ लाख रुपयां पर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यास याचा फायदाच होईल. पण तोपर्यंत इलेकट्रीक कार चे प्रमाण वाढले तर मात्र ह्या कारचे यश आटोक्यात राहील.
ह्या सर्व जर-तरच्या गोष्टी आहेत, आणि त्याचे प्रमाण हा येणार काळच ठरवणार आहे. असे असले तरी नव्या तंत्रज्ञानामुळे लोकांच्या सुविधा आणि लोकांचे कल्याणच होणार आहे. चांगल्या दर्जेदार वस्तू ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत, इतके मात्र नक्की.
आम्हाला आशा आहे की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ, वाचनासाठी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ! (Next Gen Swift Dzire)
अधिक माहिती:
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
- Gudi Padwa Wishes in Marathi 2023 - March 21, 2023
- World Most 7 No Fly Zone Places | नो फ्लाय झोनची ठिकाणे - December 25, 2022
- What Commerce Students can do after 12| Best Options - December 24, 2022