Good News For Whatsapp Users | Whatsapp New Update 2022

Whatsapp New Update | Good news for WhatsApp users!

या पुढे तुम्ही पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मार्क शीट आणि गाडीची आरसी डाउनलोड करू शकता. हे काय आहे आणि कसे हे सारे करू शकतो या विषयीची सविस्तर माहिती आपण येथे घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण marathirang.com च्या “माहिती” या सदराखाली व्हाट्सअँप विषयीची माहिती वाचणार आहोत. (Whatsapp New Update)

सेवेचा तपशील:

आज आपण सर्वत्र हे पाहतो की व्हॉट्सॲप वापराचे प्रमाण वाढत चालेले आहे. अगदी प्रत्येकजण व्हॉट्सॲप चा उपयोग करतोच करतो. मग ऑफिस असो वा घर, सर्वत्र व्हॉट्सॲप महत्त्वाचं बनत चाललं आहे किंबहुना ते बनलं आहे. पण हेच व्हॉट्सॲप आता तंत्रज्ञान-जाणकार वापरकर्त्यांसाठी जबरदस्त बदल करत आहे. यामुळे व्हॉट्सॲप आता केवळ फक्त मजकूर पाठवणे, फोटो पाठवणे, फाईल पाठवणे आणि कॉल करणे या साठीच होणार नाही. तर यापेक्षा अधिक वेगळं करणार आहे. (Let’s see Whatsapp New Update)

कोणत्याही सरकारी कार्यालयात न जाता व्हॉट्सॲप द्वारे आपणास महत्त्वाची वैयक्तिक कागदपत्रे मिळवण्याचा एक मार्ग बनणार आहे. MyGov एक WhatsApp चॅटबॉट-आधारित सेवा देते जी डिजीलॉकरचा वापर करून महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांमध्ये प्रवेश मिळवते. डिजीलॉकर हा प्रकल्प मागील काही वर्षा पूर्वी सुरु करण्यात आला असला तरी, अनेक जणांना अजूनही सेवांची माहिती नाही. डिजीलॉकर कशासाठी वापरले जाते, ते कसे काम करते याची कल्पना नाही. त्यामुळे व्हॉट्सॲप ने त्याच्या वापरकर्त्यांना एकाच वेळी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांमध्ये जलद आणि सहज मिळवता यावे यासाठी ही सेवा देणे चालू केले आहे. तुम्हाला फक्त MyGov हेल्पडेस्कसाठी WhatsApp चॅटबॉट उघडायचे आहे.

WhatsApp च्या डिजिलॉकर वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्ही खाते प्रमाणीकृत करणे आवश्यक आहे. त्यानंतर, तुम्ही तुमचे पॅन कार्ड, ड्रायव्हरचा परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र यासारखी अनेक कागदपत्रे डाउनलोड करण्यासाठी व्हॉट्सॲप चा वापरू शकता. नागरिकांना मदत करण्यासाठी व्हॉट्सॲप वर MyGov हेल्पडेस्कद्वारे अनेक सेवा उपलब्ध होणार आहेत. (This is Whatsapp New Update)

व्हॉट्सॲप वरून कोणती कागद पत्रे मिळवता येतील.

डिजीलॉकरवरून तुम्ही व्हॉट्सॲप वर खालील प्रकारचे दस्तऐवज डाउनलोड करू शकता, याची यादी येथे देत आहोत.
✦ पॅन कार्ड
✦ दहावीची मार्कशीट
✦ बारावीची मार्कशीट
✦ चालक परवाना
✦ सीबीएसई दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
✦ विमा पॉलिसी – दुचाकी/ चारचाकी
✦ वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC)
✦ विमा पॉलिसी दस्तऐवज (डिजिलॉकरवर LIC आणि GIC)
Whatsapp New Update changes.)

कागदपत्र कसे डाउनलोड करावे :

डिजिलॉकरद्वारे व्हॉट्सॲप वरून तुम्ही वर नमूद केलेले सर्व कागदपत्र कसे डाउनलोड करू शकता: याची संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊ.
✦ सर्व-प्रथम डिजिलॉकर खाते तयार करा. (https://www.digilocker.gov.in/ या लिंक वर जाऊन, रजिस्टर करा, व्हेरिफाय करा आणि तुमची सर्व कागदपत्र येथून मिळावा.
✦ त्यानंतर तुमचे व्हॉट्सॲप उघडा.
✦ व्हॉट्सॲप वर 9013151515 वर ‘Hi’ किंवा ‘Digilocker’ असा संदेश पाठवा.
✦ तुम्हाला स्वागत संदेश मिळेल, “Welcome to DigiLocker Services to download/ Issue your documents” असा संदेश दिसेल.
✦ त्यानंतर तुमच्या डिजिलॉकर खात्याचे तपशील सबमिट करा.
✦ तुमचा आधार कार्ड क्रमांक सबमिट करा.
✦ व्हेरीफिकेशन साठी OTP विचारला जाईल, तो भरा.
✦ आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

बस झालं आता, तुम्ही डिजिलॉकर वरून तुमची कागदपत्रे सहज डाउनलोड करू शकता. (These are Whatsapp New Update)

आहे ना खूप चांगली सुविधा. सुविधा साऱ्या चांगल्याच असतात, त्यांचा गैर वापर केला जाऊ शकतो. थोडे सावध रहा, सतर्क रहा. आणि सरकारी सुविधांचा लाभ घ्या. (Whatsapp New Update)

सांगता :

आम्हाला आशा आहे कि तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपण या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील कमेंटमध्ये लिहा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !

अधिक माहिती :

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x