Irshalgad fort trek | इरशाळगड किल्ला

किल्ल्या विषयी : Irshalgad Fort trek

(Complete information about Irshalgad Fort and Trek)

किल्ल्याची उंची : समुद्रसपाटी पासून ३७०० फूट उंच.
किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग
किल्ल्याची श्रेणी : मध्यम
किल्ल्यावर जाण्याची योग्यवेळ : जून ते जानेवारी
इतर माहिती : Irshalgad fort trek : गडावर निवासस्थानाची सुविधा उपलब्ध नाही. इरशाळवाडी येथे भोजन सुविधेची व्यवस्था केली जाऊ शकते. ट्रेक दरम्यान पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, त्यामुळे स्वतःच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वतःच करावी.

irshalgad fort
marathirang.com

कसे जावे :

How to go for Irshalgad :
कर्जत – पनवेल रेल्वे ट्रॅकवरील एक रेल्वे स्थानक चौक येथे उतरावे, किंवा बसने पनवेल खोपोली मार्गावर, चौक रेल्वेस्थानकावर उतरावे. तेथून राज मुकुट -आकाराचा किल्ला स्पष्टपणे दिसतो. लांबून किल्ला खरंच सुंदर दिसतो.

ट्रेकची सुरुवात :

(Irshalgad fort trek) चौक रेल्वेस्थानका वर उतरून किंवा बसने आल्यास नाणिगावाजवळ उतरून मोरबा धरणाच्या बाजूस जावे. तेथून अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण एका मोठ्या “मोर्बी” धरणाकडे पोहोचतो. पावसाळ्यात धरणाचे दृश्य खूपच आकर्षक वाटत होतं. पाण्यावर पसरलेली धुक्याची चादर आणि वर सफेद-काळ्या ढगांचे तोरण. त्या भावनांचे शब्दात वर्णन करणे अवघडच. येथूनच डावीकडची एक वाट इरशाळ गडाकडे जाते.

या वाटेने पुढे चालत जात, आजूबाजूचे दृश्य पाहत, पावसाचा आनंद घेत, जवलपास तासा भरात, आपण किल्ल्याच्या माची (पठार) वर असलेले गाव, “ईरशाळ वाडी” पर्यंत पोहचतो. येथे काही ठिकाणी घरात जेवणाची सोय केली जाते, पण आपल्याला अगोदरच तसं सांगून व्यवस्था करावी लागते. आम्ही आमच्या जेवणाची सोय बरोबर घेऊन आलो होतो त्यामुळे वाडीत थोडा विसावा घेतला.

गावातील मुलां सोबत शाळेची व्यवस्था काय आहे, त्याची स्थिती काय आहे, अशी चौकशी केली, उत्तर समाधान कारक मिळाल्यावर, किल्ल्याची वाट विचारून पुढच्या प्रवासास सुरुवात केली. ईरशाळ वाडी पासून वर गडावर चढण्यासाठी ४०-५० मिनिटे लागतात. पावसाळ्यात जाधताना जरा जपून चढावे, काही ठिकाणी जास्त उतार आहे, जास्त दिवसाच्या पावसामुळे जागा चिकट झालेली होते. त्यामुळे घसरण्याची शक्यता असते.

पावसातील किल्ल्यांवरचं दृश्य हे खूपच विलोभिनीय असतं, थंडगार हवा, धुक्यांचे वाहणारे लोट, पावसाच्या धारा, सौम्य धारांमधून पडेणारे पाण्याचे तुषार. याचा फक्त अनुभवच घेऊ शकतो, त्याचे वर्णन करणे इतकं सहज नाही. अशाप्रकारच्या ट्रेक्स मधून जो अनुभव येतो, तो इतर कोणत्याही सहली मधून किंवा रिसॉर्ट मध्य जाऊन मिळणार नाही.

ते झऱ्यां मधून वाहणाऱ्या पाण्यातून चालणं, झाडांच्या गर्दीतून वाट काढत जाणे, दगडांच्या वाटेतून चालणे. असं खूप काही शिकायला, पाहायला आणि निसर्ग अनुभवायला मिळतो. म्हणून तर ट्रेक्स करण्याची मजा काही वेगळीच असते.

ईरशाल गडास आणाखी एक भर ती म्हणजे “मोरबे धरण” आणि त्याचे बॅक-वॉटर मुले तयार झालेला अथंग पाण्याचा समुद्र. या सर्वामुळे गडाचे सौंदर्य आणखीणच वाढलं आहे.

गडाच्या आजूबाजूस :

(Places to visit near Irshalgad Fort) गडाच्या उत्तरेकडे प्रबलगड, माणिकगड, कर्नाळा, सोनगीरी, तर पश्चिमेकडे व पूर्वेस माथेरान डोंगररांगा.

Irshalgad trek

किल्ल्याचा इतिहास :

(History of Irshalgad Fort) (Photo gallery) ईरशालगडाचा तसा फार प्रसिद्ध इतिहास नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे निकटवर्तीय सरदार नेताजी पालकर यांचे जन्मस्थान चौक गाव आहे. ईरशालगड चौक गावापासून खूप जवळच आहे.

What is the history of Irshalgad fort?
Which Railway Station is near to Irshalgad fort?
What is the difficulty level of Irshalgad fort Trek?
Which is the riskiest fort in Maharashtra?

इतर माहिती:

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x