Exam Preparation in Time | परीक्षा जवळ आली की अभ्यास…

Exam Preparation in Time : परीक्षा जवळ आली की अभ्यास करणे योग्य की अयोग्य : आज आपण याच प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत.

In this article, we will see some questions like, As the exam approached, it became clear that the students were studying with fever and discomfort. How to prepare for exams in less time, prepare for the entrance exam in a short time, prepare for an exam in a short time. Well for exams in a short time, exam preparation in less time, to prepare for competitive exams in a short time.

अभ्यासाची सुरुवात कधी करायची :

आपल्या आसपास आपण असे बरेच विद्यार्थी पाहतो की जे परीक्षा जवळ आली की अभ्यास करायला सुरुवात करतात. विद्यार्थी शरीराला त्रास देऊन ताप देऊन कठीण यातना देत अभ्यास करतात. खरंच हे योग्य आहे का? माझ्या मते हे अडाणीपणाचे व मूर्खपणाचे लक्षण आहे. आपल्याला जेंव्हा तहान लागते तेंव्हा आपण विहीर खणायला घेतो का? त्याची तयारी अगोदरच करतो. ह्या सर्व म्हणी त्यांचा अर्थ हे सर्व माहित असून ही, बहुतेक विद्यार्थी हाच मुर्खपणा करत असतात. जसे तहान लागल्यावर आपण विहीर खोदायला जात नाही तसेच परीक्षा आल्यावरच अभ्यास करायला जाऊ नये. याची तयारी अगोदर पासूनच असली पाहिजे.

परीक्षा म्हणजे काय :

खरं तर आपण एक विद्यार्थी म्हणून परीक्षा म्हणजे काय किंवा परीक्षेचे महत्त्व हे समजून घेत नाही. परीक्षा घेण्याचे कारण समजावून घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी हेच खूप आवश्यक आहे. आपल्याला अभ्यासक्रम नेमून दिलेला असतो. त्यासाठी पाठ्यपुस्तके ठरलेली असतात. सदर परीक्षेसाठी पाठांच्या संख्या ठरलेल्या असतात. या पुस्तकांचा पुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक पुस्तकातील प्रत्येक धडा वाचून घेतला पाहिजे, त्याचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. पुस्तकातील ज्ञान संपादन करणे हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.

परीक्षा म्हणजे काय :

विद्यार्थ्यांनी अभ्यास करून, त्या पाठातील काय ज्ञान संपादन केले हे समजून घेण्यासाठी, किंबहुना तपासून पाहण्यासाठी या परीक्षा घेतल्या जातात. सध्याच्या अभ्यासक्रमात तसा खूप बदलही केलेला आहे. मुलांना भाषेचे ज्ञान घेण्यासाठी, किंवा ती भाषा समजण्यासाठी “स्वमत ” हे क्रिया सुरु केली आहे. या मध्ये मुलांना वेगवेगळे विषय दिले जातात त्यावर मुलांना स्वतःच्या शब्दात वैयक्तिक मत मांडण्यास सांगितले असते. खरंच ही एक चांगली संकल्पना आहे. जर ती भाषा आपल्याला नीट समजली असेल, तर आपण कोणताही विषय सहज विस्तारित करू शकतो.

परीक्षेचा मुख्य उद्देश :

परंतु परीक्षेचा हा मुख्य उद्देश एक तर विद्यार्थ्यांना ज्ञात राहिलेला नाही किंवा त्याकडे ते लक्ष देत नाहीत. परिणामी परीक्षा तोंडावर आली की कसातरी पास होण्यापुरता अभ्यास करायचा. तितक्याच वेळात शरीराला खूप त्रास द्यायचा व खूप पाठांतर करून चांगले गुण मिळवायचे. असेच प्रकार पुढे चालू राहिल्यास, हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने खूप भयानक असेल. कारण भविष्यात विद्यार्थ्यांनी केलेले पाठांतर किंवा त्यावेळे पुरते, परीक्षेत मिळविलेले गुण त्यांच्या विशेष उपयोगी पडणार नाहीत. विध्यार्थ्यांना उपयोगी पडणार आहे ते त्यांचे चांगले गुण, त्यांनी संपादन केलेले ज्ञान, त्यांनी समजून घेतलेला विषय.. म्हणून माझ्या मते परीक्षा जवळ आली की विद्यार्थ्यांनी शरीराला त्रास देऊन अभ्यास करणं हे योग्य नाही.

आपला अभिप्राय :

आम्हाला आशा आहे कि तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !

अधिक माहिती :

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x