Marathi Kavita Maza Abola | माझा अबोला

माझा अबोला | Marathi Kavita Maza Abola

Marathi Kavita Maza Abola | माझा अबोला : नव्या-नव्या प्रेमात असलेला ह्या कवीला, त्याच्या प्रेयसीसोबत खूप काही बोलायचे आहे, खूप गप्पा गोष्टी करायच्या आहेत. पण त्याच्या मनात तो भावनांचा खेळ चालू आहे, त्याच्या मनाची जी अस्थिरता झाली आहे त्या मनस्थितीची वर्णन या कवितेत केलं आहे. नक्की वाचा तुम्हाला ही आवडेल.

Marathi kavita on love
माझा अबोला | Maza Aabola

खूप सांगायचं आहे मला, खूप बोलायचं आहे मला,
पण भेटतो जेंव्हा तुला, कोठोनी येतो हा अबोला ।।धृ ।।
 
किती ठरवून राहतो, किती साहस मी करतो,
होऊनि आतुर मी, जेव्हा वाट तुझी पाहतो,
येते समोर माझ्या तू, मिळते नजरेला नजर,
मन होते भावुक माझे, ओठ करतात थरथर,
 
कशी किमया तुझी ही आहे, कसा रूप हा नावेला,
पण भेटतो जेंव्हा तुला, कोठोनी येतो हा अबोला ।।१।।
 
आस भेटीची धरितो, तारे मोजुनि राहतो,
पण येता समीप तू, सारे विसरुनी जातो,
शब्द ओठात दाटतात, ओठ मिटुनी रहातात
मी काही न बोलता, सारे डोळेच बोलतात,
 
भाव डोळ्यातले माझ्या, सारे कळतात तुला,
मग कशास बोलू मी, बरा आहे हा अबोला ।। २।।
 
खूप सांगायचं आहे मला……

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

Marathi Kavita Mazi Aai, marati poem on mother, marathi poem on love, marathi sundar kavita, marathi kavita status, marathi poem lyrics. Kavita marathi madhe, best marathi poems. marathi kavita on love, marathi kavita on love life, marathi kavita on love for him and marathi kavita on love for her. Your search will end here, you will all these type of poems in marathi. Yes Marathi Kavita. marathi kavita maza abola

संतोष भरणुके

About संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

Check Also

Zunjaar Marathi Kavita

Zunjaar Marathi Kavita – Marathi Best Inspirational Poem | झुंजार मराठी कविता #1

Zunjaar Marathi Kavita | झुंजार मराठी कविता झुंजारन संपणारी जगण्यातील फरपट,चालतो जगीची वाट अनवट,अंत नसणारी …

2 comments

  1. Very nice 👌👍

  2. Harshali Bharnuke

    Khup sundar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!