Poem on Maharashtra in Marathi | जय महाराष्ट्र देशा
Poem on Maharashtra in Marathi | जय महाराष्ट्र देशा: This is a poem about Maharashtra. With this poem, I have written my thought on it.
या कवितेत माझा महाराष्ट्र कसा आहे, त्याची माहिती काय आहे, महाराष्ट्राचा इतिहास काय आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मला तो किती आवडतो याचे वर्णन केले आहे. मला माहित आहे मी खूप मोठा कवी नाही, किंवा महाराष्ट्रावर काही लिहिण्याची माझी कुवतही नाही. पण महाराष्ट्राच्या प्रेमा पोटी आणि माझ्यावर असलेल्या उपकाराची जाण म्हणून हे माझे मत या कवितेत मांडले आहे. स्वतःला नशीबवान समजतो की महाराष्ट्रात जन्मलो.
|Related : Marathi Bhasha Din Kavita | अभिमान माझा मराठी – Poem (Read more…)
Poem on Maharashtra in Marathi | जय महाराष्ट्र: Marathi Poem
।। जय महाराष्ट्र देशा ।।
।। जय महाराष्ट्र देशा ।।
जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र देशा
नाव तुझे ठाव जगा, जय महाराष्ट्र देशा ।।धृ।।
सह्यद्रीच्या कडा गर्जुनी, गाती तुझे गुणगाण,
सागराच्या अरबी लाटा, तुलाच देती रे मान
खास तुझी ही वीर माती, खास तुझी ही भाषा
नाव तुझे ठाव जगा, जय महाराष्ट्र देशा ।।१।।
लाख संकटे अली तरीही, ना कधी मानली हार,
अन्याय विरोधी सदा उभा तू तारणहार,
शौर्य, धैर्य च्या बळावर, उधळल्या दाही दिशा
नाव तुझे ठाव जगा, जय महाराष्ट्र देशा ।।२।।
काय तुझे शौर्याचे पोवाडे, नी काय तुझी वीर गाथा
स्पुर्ती चढे मनास माझ्या ऐकुनी वीर कथा।
किती ऐकले, किती वाचले, ना पूर्ण हो अभिलाषा
नाव तुझे ठाव जगा, जय महाराष्ट्र देशा ।।३।।
सह्याद्रीचा सिंह तूम्ही हो राजे आमची शान
राष्ट्रावर जी नजर उठली, ती छाटून टाकली मान
नाम मात्र बस स्पुर्ती येते, चढे विजयाची नशा
नाव तुझे ठाव जगा, जय महाराष्ट्र देशा ।।४।।
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
I hope you like this Marathi poem. In this article, we have seen poems on subjects like Poems on Maharashtra in Marathi, English, Hindi, Marathi poems on Maharashtra, poems on Maharashtra day, Marathi poems on Maharashtra day,