Raksha Bandhan 2021 in Marathi| रक्षाबंधन ची माहिती मराठीत

Raksha Bandhan 2021 in Marathi | रक्षाबंधन ची माहिती मराठीत : Happy raksha bandhan, raksha bandhan date is 22 August 2021.

Raksha Bandhan 2021 :

आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत रक्षाबंधन म्हणजे काय?, हा सण का साजरा करतो, याची सुरुवात कशी झाली असावी याविषयी .
जसे आपल्याला माहित आहे कि श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा करतो. या दिवशी बहीण हिंदू परंपरे नुसार आणि विधीनुसार भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिच्या संरक्षणाची जबाबदारी घेतल्याचे वचन देतो. बहिणीच्या संरक्षणा बद्दल “रक्षा” आणि धागा रुपी वचनाचे “बंधन” असे दोन्ही मिळून “रक्षाबंधन” हे नाव पडले असावे. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला संरक्षित करण्यासाठी जो पवित्र धागा बांधला जातो, त्या धाग्यालाच रक्षाबंधन म्हणतात. खरं तर रक्षा बंधन कोणत्या एका धर्माचा सण नसून, हा केवळ भाऊ-बहिणीचा सण आहे, त्यांच्या नात्याचा सण आहे, याच नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. म्हणून हा सण संपूर्ण भारतात, सर्व जाती-धर्माचे लोक उत्साहात साजरा करतात.

हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, आपुलकी, आदर आणि संयम यांचा संयोग आहे. जगातील भाऊ-बहिणीच्या नात्याला आणि त्यांचा प्रेमाला निस्वार्थी आणि पवित्र भावनेने पहिले जाते. भारतीय संस्कृती हि स्त्रीचा आदर करणारी, तिला महानता प्रदान करणारी संस्कृती आहे.

.

“जिथे नारीची/ स्त्रियांची पूजा केली जाते, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास राहतो” आशा भावनेचा संदेश देणारी भारतीय संस्कृती आहे. मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणाऱ्या भारतीय संस्कृतीचे, म्हणूनच तर संबंध जगाला अप्रूप आहे.

अगदी लहानपणा पासून हा सण आपण खूप आनंदात साजरा तर करत आलो आहोत, परंतु रक्षाबंधन का केले जाते हे तुम्हाला माहिती आहे का ? रक्षाबंधन साजरे कसे सुरु झाले असावे आणि ते साजरे करण्यामागची कारणे काय आहेत, चला तर ते सारे जाणून घेऊया. (Raksha bandhan ka sajari kartat, Raksha Bandhan 2021).

तुळस आणि कडुलिंबाच्या झाडाला बांधलेली राखी :

असे सांगितले जाते पूर्वीच्या काळात तुळस आणि कडुलिंबाच्या झाडाला राखी बांधण्यात जात असे.

हिंदी संस्कृतीच्या परंपरेनुसार, प्रथेनुसार, बहिणीने भावाला राखी बांधण्यापूर्वी, निसर्गाच्या संरक्षणासाठी तुळशी आणि कडुलिंबाच्या झाडाला राखी बांधली जायची. ज्याला वृक्ष-रक्षाबंधन असे म्हटले जायचे. पण आता ती प्रथा, पाळली जात नाही. खर तर त्या प्रथेला, आपण सर्व मिळून एक नवं रंग द्यायला हवं होतं. जसे प्रत्येक रक्षा बंधन या दिवशी बहीण एक झाड लावेल आणि भाऊ त्या झाडाचे पालन करून त्या झाडाला रुजून मोठं होई पर्यंत त्याची रक्षा करेल आणि त्या झाडाला पाणी देत राहील. या मुळे झाडे लावा-झाडे जगवा ही मोहीमही राबवता अली असती.
राखी फक्त बहीणने भावालाच बांधली जाते असे नाही. ती एका खास मित्रालाही राखी बांधू शकते ज्याला ती आपला भाऊ मानते. रक्षाबंधनाच्या दिवशी पत्नी सुद्धा तिच्या पतीला राखी बांधते, तसेच शिष्य त्यांच्या गुरूलाही राखी बांधतात. जसे भावा कडून बहिणीचे, तसेच पती कडून पत्नीचे, गुरु कडून शिष्याचे संरक्षण व्हावे त्यांच्यातील नाते अजून मजबूत व्हावे हाच त्या मागचा उद्धेश.

| Related : Online Free Courses |फ्री ऑनलाईन कोर्सस ……. Read more.

द्रौपदीने कृष्णाला बांधलेली राखी

महाभारताच्या युद्धापूर्वी, श्रीकृष्णाने राजा शिशुपाल विरुद्धच्या झालेल्या युद्धात सुदर्शन चक्राचा उपयोग केला होता. त्या दरम्यान त्यांच्या बोटाला कापून रक्तश्राव सुरु झाला होता. त्यावेळी द्रौपदीने तिच्या साडीचा एका टोकाचा तुकडा फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधलं. त्यामुळे बोटातून वाहणारा रक्तश्राव बंद झाला. श्रीकृष्णाने त्याच वेळी द्रौपदीला त्या बदल्यात, भविष्यातील येणाऱ्या सर्व संकटांपासून वाचवण्याचे वचन दिले होते. तो दिवस श्रावणातील पौर्णिमेचा होता, म्हणूनच या दिवसा पासून रक्षा बंधन हा सण साजरा करण्याची प्रथा सुरु झाली.

राजा बली आणि माता लक्ष्मीची कथा ?

भागवत पुराण आणि विष्णु पुराणात सांगितले आहे की, राजा बलीने भगवान विष्णूची खूप वर्ष तपश्र्चर्या केली.
त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन बालीला वरदान दिलं. राजा बलीने, भगवान विष्णूला नेहमी आपल्या सोबत त्याच्या राज महालात राहण्याची विनंती केली. दिलेल्या वरदान प्रमाणे भगवान विष्णूंनी ही बलीची विनंती मान्य केली. भगवान विष्णू राजा बलीसोबत राहू लागले. बऱ्याच दिवसा नंतर माता लक्ष्मीने भगवान विष्णूंसोबत वैकुंठाला जाण्याचा आग्रह केला, पण भगवान विष्णू वचन बद्ध असल्यामुळे त्यांनी माता लक्ष्मी यांना नकार दिला. अखेर नारद मुनींच्या सल्ल्या नुसार मातेने संरक्षणाचा धागा बांधून राजा बालीला आपला भाऊ बनवले. राजाने आदराने लक्ष्मी मातेकडून धागा बांधून घेतला व मनपसंत इच्छित भेट मागावयास सांगितले. माता लक्ष्मीने राजा बलीला भगवान विष्णूला त्याच्या वचनापासून मुक्त करून माझ्यासवे वैकुंठी जाण्याची अनुमती देण्यास सांगितले. बहीण म्हणून मी तुम्हाला मानले आहे, त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण करणे माझे कर्त्यव्य आहे. असे म्हणून राजा बालीने भगवान विष्णूला त्याच्या बंधनातून मुक्त केले. हा दिवसही श्रावण मासातील पौर्णिमेचाच होता. म्हणूनच या दिवसा पासून रक्षा बंधन हा सण साजरा करण्याची प्रथा सुरु झाली.

रक्षाबंधन मुळेच भगवान इंद्राला प्राप्त झालेला विजय :

भविष्य पुराणात असे म्हटले आहे की एकदा देव आणि दैत्य यांमध्ये भयंकर मोठे युद्ध झाले. हे युद्ध जवळपास बारा वर्ष चालूच होते. या युद्धात बाली नावाच्या राक्षसाने इंद्र देवाचा पराभव केला. आश्या प्रकारे स्वर्ग, पृथ्वी आणि पातळ अशा तिन्ही लोकात राक्षसांनी ताबा मिळविला. मग इंद्र देवाची पत्नी सची भगवान विष्णू यांना मदतचा आग्रह केला. भगवान विष्णूने साचीला कापसाच्या धाग्याचा एका हाताला बांधता येईल असे वलय दिले. देवी सचीला ते सुती वलय इंद्र देवाच्या मनगटावर बांधायला सांगितले. सचीने भगवान विष्णूने सांगितल्या प्रमाणे, इंद्र देवाच्या मनगटाला तो सुती धागा बांधून त्याच्या सुरक्षितता आणि यशाची प्रार्थना केली. भगवान विष्णूच्या आणि ब्रह्म देवाच्या आशीर्वाद घेऊन भगवान इंद्र पुन्हा युद्धाला गेले. यानंतर भगवान इंद्राने बालीचा पराभव केला आणि पुन्हा स्वर्गावर ताबा मिळविला. म्हणूनच पत्नीने पतीलाही राखी बांधण्याची प्रथा सुरु झाली असावी.

आता पाहूया हा सण कसा साजरा करतात.

सकाळी लवकर उठून सर्व बहिणी आपापल्या श्रद्धे नुसार देवाची पूजा, प्रार्थना करतात. रक्षा बंधनाची थाळी सजवली जाते. त्यात तांदूळ, फुल, हळद, कुंदू, दीपक, मिठाई आणि राखी ठेऊन छान सजवली जाते. भाऊही नवीन कपडे घालून, सजून बहिणीची वाट पाहत तयार असतो. राखी बांधण्या आगोदर, घरातील इष्ट, देवी-देवतांची पूजा केली जाते, घरातील देवतांना राखी बांधली जाते. नंतर घरातील वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद घेऊन. पूजेसाठी भावाला उचित आणि शुभ ठिकाणी, बैठक किंवा पाटावर बसवलं जातं. सर्व प्रथम श्रद्धा आणि प्रेम पूर्वक हळदी-कुंकूचे टिळक लावले जाते, त्यावर तांदूळ लावतात. शुभ आशीर्वाद म्हणून थोडे तांदूळ डोक्यावरही वाहिले जातात. त्या नंतर ताटातील नरांजणीने ओवाळणी करून आरती उतरविली जाते. या सर्वानंतर उजव्या हाताच्या मनगटावर रक्षा कवच म्हणजे राखी बांधली जाते. त्यानंतर मिठाईचा घास भरवून तोंड गोड केलं जातं (sweets for raksha bandhan). भाऊ आपल्या शक्यते नुसार बहिणीला भेट वस्तू उपहार म्हणून देतो (raksha bandhan gifts). त्यानंतर भाऊ बहिणीला नमस्कार करून, हसत-खेळात सर्वांसोबत जेवण करतात. अशा प्रकारे रक्षा-बंधनाचे अनुष्ठान पूर्ण केले जाते. काही ठिकाणी यादिवशी व्रत ठेवण्याचीही प्रथा आहे. बहीण भावाच्या सुखी-संपन्न आयुष्याच्या कामानेसाठी हे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे. अर्थात प्रत्येक ठिकाणच्या रीती-रिवाजा नुसार थोडाफार फरक असतो, पण सर्वसाधारणपणे हा पर्व असाच संपन्न करतात (celebrating raksha bandhan).

| Related : Akshay Tritiya in Marathi | अक्षय तृतीया … Read more.

बाहेरगावी असलेल्या बहिणीची व्यथा :

ज्या बहिणींचे लग्न झाले असेल आणि भाऊ-बहीण यांच्यातील राहण्याचे अंतर खूप दूर असेल. तर अशा वेळेस, बहीण राखी-पौर्णिमेच्या अगोदरच भावाला पोस्टाने, कुरिअरने, किंवा कोणा कडून कोणत्या ना कोणत्या मार्गाने भावा पर्यंत राखी पोहचेल याची व्यवस्था करतेच करते. तो क्षण तो प्रसंगच असा असतो कि असे करण्यास बहिणीला बळ मिळते. भारतात प्रेम, आपुलकी, आदर, नाती अजुनही कायम असल्याने रक्षाबंधन या सणाचे अनन्य साधारण असे महत्त्व आजही अबाधित आहे (Raksha Bandhan 2021).

सांगता (Raksha Bandhan 2021) :

आम्हाला आशा आहे कि तुम्हाला दिलेली राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षा-बंधन याविषयी दिलेली माहिती आवडली असेल. जर आपण या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील कमेंटमध्ये सांगा. तसेच तुमच्या कडे रक्षा-बंधन कशी साजरी केली जाते तेही अवश्य सांगा. आम्हालाही ते जाणून घ्यायला आवडेल.
कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ! .

Tags – raksha bandhan marathi poems, raksha bandhan marathi geet,

अधिक माहिती :

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x