What is Metaverse in Marathi| मेटाव्हर्स एक नवीन संकल्पना

What is Metaverse in Mrathi| मेटाव्हर्स एक नवीन संकल्पना :

In this article, we will see What is Metaverse concept? What is the new metaverse?. We will learn about metaverse, “Is metaverse the future?”, What is the point of the metaverse? what is a metaverse company and metaverse market size? We will see the metaverse examples, what is metaverse, and Facebook. What is metaverse in Roblox, which metaverse companies? Microsoft metaverse, metaverse games, and many more about Metaverse

मेटाव्हर्सची संकल्पना :

मेटाव्हर्स एक नवीन संकल्पना, एक अशी संकल्पना जी आपण फक्त कल्पनेतच विचार केला होता. म्हणजे जे-जे आपण विचार करतो त्या साऱ्या गोष्टी आता कल्पनेच्या दुनीयेत खऱ्या-खुऱ्या स्थितीत अस्थित्वात येणार आहेत. मला माहित आहे मी जे काही सांगतो आहे त्यावर तुमचा विश्वास बसत नसेल किंवा त्या गोष्टी तुम्हाला समजत नसतील पण तरीही मी तुम्हाला ही संकल्पना, व्ययस्थित समजेल अशा भाषेत सांगण्याचा प्रयत्न करेन.

आज पासून साधारण ४० वर्षांपूर्वी जेंव्हा इंटरनेट सुरु झालं होतं तेंव्हा कुणाला वाटलं नसेल की एक दिवस आपण घरात बसून जगातल्या कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवू शकतो. जगात कोणालाही घर बसल्या निरोप पाठवू शकतो, ई-मेल च्या साह्याने. घरात बसून कसलीही खरेदी करू शकतो. या इंटरनेट च्या माध्यमातून आज आपण ऑनलाईन खरेदी- विक्री करणे, माहिती मिळवणे, शिक्षण घेणे ह्या गोष्टी सहज करणे शक्य झाले आहे. कल्पनेच्या पलीकडील गोष्टी सहज शक्य झाल्या आहेत. आता अजून पुढे काय असेल,असा विचार करतोय-ना-करतोय तर हे “मेटाव्हर्स” नावाचे वादळ धडक देऊ लागले आहे. “मेटाव्हर्स” इंटरनेट च्याही पुढे जाऊन एका आभासी जगाची खरी ओळख करून देणारी एक अनोखी संकल्पना आहे. “इंटरनेटसेभी परे” (Beyond the Internet).

मला माहित आहे, मी जे सांगणार आहे त्यावर तुमचा विश्वास बसने जरा कठीण आहे. पण विश्वास ठेवा हे सत्य आहे आणि पुढच्या काही वर्षात हे आपल्या समोर आलेलं असेल.
चला तर समजून घेऊया “मेटाव्हर्स” म्हणजे काय?

मेटाव्हर्सची संकल्पना समजून घेऊ :

समजा मी आज ठरवलं मी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जाऊन एखादी मॅच पाहीन. जगातील सर्व देशांची एक वर्ल्ड टूर करून येईन. एखाद्या सुंदर बागेत शांत ठिकाणी काही वेळ बसेन आणि असे बरेच काही करेन, तेही प्रवास न करता, ना व्हिसा काढता, ना घरातून बाहेर पडता. खूपच अजिब आहे ना, शक्य वाटत नाही ना? पण हो मी जे बोलतोय ते खरं होणार आहे. ही स्वप्नातील कल्पना “मेटाव्हर्स” मुळे शक्य होणार आहे. जेथे हवं तेथे, जेंव्हा हवं तेंव्हा आपण जाऊ शकणार आहोत. जे वाटत होतं कि पुढच्या हजारो वर्षात हे शक्य होणार नाही, ते आता काही वर्षातच शक्य होणार आहे. ह्या “मेटाव्हर्स” मुळे.

आपल्याला असेही वाटत असतंकी, आपल्याला काही इजा होऊ नये, काही त्रास होऊ नये. आपण कधी म्हातारेच होऊ नये, इतकंच काय पण आपण कधी मरूच नये, म्हणजे आपण अनंतकाळासाठी अमर व्हावं. तुम्ही जे विचार कराल ते, सत्यात होइल. तुम्ही जे ठरवाल ती कल्पना खरी होईल, आणि हे सर्व करणार आहे “मेटाव्हर्स”. आता वाटतय ना थोडं मजेशीर आणि गमतीशीर, पण हो तितकंच सत्य ही आहे.

आपण सर्वांना एक खूप चांगली सवय आहे, ती म्हणजे स्वप्न पाहण्याची. उठता-बसता, झोपता-जगता सर्वांना स्वप्न पाहत असतो. कारण स्वप्नात आपण नेहमी खुश असतो. जे आपण खऱ्या जीवनात करत नाही ते आपण स्वप्नात सहज करत असतो. म्हणूनच ती आपल्याला जास्त जवळची वाटतात, त्यातच रमायला आवडतं. म्हणूनच ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड आपण करत असतो.

मेटाव्हर्स च्या अगोदरचा इतिहास :

अगदी मागे जाऊन पाहिलं तर, आपण आपल्या स्वप्नांना चित्रात उतरविण्याचा प्रयत्न केला. ज्या गोष्टी आपल्या आवडतात, खूप सुंदर वाटतात त्यांचे चित्र काढू लागलो. पुढे त्यांचे मूर्तीत रूपांतर झाले, नंतर फोटो रंगीत झाले. अजून पुढे गेल्यावर त्याचे चलचित्र झाले, त्याहून पुढे रंगीत चलचित्र काढू लागलो. त्याहून पुढे म्हणजे ३D मुव्ही येऊ लागल्या. कारण आपली हाव वाढू लागली होती. आपापल्या अजून जवळून आपल्या स्वप्नांना पाहायचे होते, अनुभवायचे होते. आपल्या स्वप्नांना मध्ये अधिक जवळ जाऊन आपल्याला खरोखरचं जगायचं होतं. स्वप्नांना अस्तित्वात अनुभवायचं होतं .

त्यानंतर आले मोशन गेम्स, जेथे आपल्या हालचालीमुळे खेळातील व्यक्ती हातवारे करू लागतो आणि आपल्याला त्यात आपणच खेळतो असा भास व्हायचा. खरंच आपण त्या मैदानात खेळतोय असं वाटायचं. म्हणजेच आपण सर्वांना खऱ्या-खुऱ्या जीवनापासून वेगळं होऊन त्या आभासी कल्पनेकडे जावेसे वाटले. कारण तेथे सर्व चांगलंच आहे, जे आपल्याला वाटतंय तस होतंय. जेथे कसलच दुःख नाही, कसलाच त्रास नाही. बस आनंद-ही-आनंद आहे.

म्हणजे जे चित्र काढण्या पासून सुरुवात केली होती, ती या मोशन गेम्स पर्यंत येऊन थांबली नाही. आता ती अजून पुढे जाणार आहे. कारण आपल्याला ही काल्पनिक दुनिया खुप हवी-हवीशी वाटू लागली आहे. तीच जास्त चांगली वाटू लागली आहे. आणि म्हणून आता वेळ आली आहे याहून एक पाऊल पुढे जाण्याची.

विचार करा एखादी ३D मुव्ही पाहताना तुम्ही त्या गाडीत बसला आहात आणि ती गाडी किंवा एखादं विमान पुढे जातं आहे. तुम्ही ते ३D चे चष्मे लावले आहेत म्हणून तुम्ही त्या जागी आहात असा भास होतो, त्यामुळे ते विमान पडण्याची, किंवा कोणाला धडकण्याची, किंवा ती गाडी पटरी वरून खाली जाण्याची भीती वाटत असते. कारण तुम्ही त्याचा अनुभव घेत असता, ते फिल करत असता. पण समाजा ते विमान तुम्ही स्वतः चालवत आहात, किंवा ती गाडी तुम्ही स्वतः चालवत आहात. आता विचार करा किती जास्त फिल कराल. कसा अनुभव असेल आणि किती उत्सुकता असेल. हेच करणार आहे “मेटाव्हर्स”. तुम्हाला स्वतःच्या अनुभवाची जाणीव करून देणार आहे.

भविष्यातील मेटाव्हर्स :

“मेटाव्हर्स” म्हणजे एक असं काल्पनिक जग, ज्याचा तुम्ही स्वतः एक भाग आहात. येथे तुम्ही खऱ्या आयुष्यात जे करता, ते सर्व काही येथे करू शकता. जसे तुम्ही काम करून पैसे कमवू शकता. जागा विकत घेऊ शकता. एखादा व्यवसाय सुरु करू शकता. होय जे खऱ्या दुनियेत करतो त्या साऱ्या गोष्टी या काल्पनिक जगात करू शकता. म्हणजेच “मेटाव्हर्स” मध्ये करू शकता. जेथे तुम्ही स्वतःच संपूर्ण आयुष्य जगू शकता. खूपच अवघड आहे ना समजायला आणि पचायला सुद्धा, बरोबर. हो जेंव्हा मी ही ऐकलं तेंव्हा मलाही असाच धक्का बसलेला. पण शांत रहा आणि पुढे वाचत रहा. एक-एक गोष्ट सहज सोपी आणि उलगडत होत जाईल.

आज “मेटाव्हर्स” फेसबुक, मायक्रोसॉफ्ट अशा कंपनीज ने एक सामाजिक नेटवर्क (सोशल नेटवर्क) बनवलं आहे. जेथे सध्या आपण फक्त गेम्स खेळू शकतो. किंवा बोलू शकतो. म्हणजेच सध्याचे जे सोशल नेटवर्क अँप्स आहेत जसे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअँप या अँप च्या साह्याने आपण एकमेकांशी बोलू शकतो, व्हिडीओ कॉल करू शकतो आणि गप्पा मारू शकतो. “मेटाव्हर्स” ह्याच नेटवर्क ला अजून पुढच्या स्टेपवर घेऊन जाणार आहे. याठिकाणी तुमचा स्वतःचा एक सुंदरसा अवतार असेल आणि समोरच्या व्यक्तींचाही एक अवतार असेल. तुम्ही सर्वजण त्या चाट रूम मध्ये किंवा त्या गेम मध्ये एकत्र असाल. जेथे अजूनही बरेच जण आपापल्या अवतारात तेथे फिरत असतील. अशा ठिकाणी टेक्स्ट मेसेज मध्ये Hi-Hello बोलण्या ऐवजी, स्वतः हात मिळवून Hi-Hello बोलाल. विचार करू लागलात ना. तर असा असेल पुढच्या लेव्हलचा सोशल नेटवर्क. हे जास्त वास्तविक आणि जास्त खरी अनुभूती देणारं असेल.

मेटाव्हर्स पॉप्युलर होण्याची करणे :

पण आता तुम्ही म्हणाल हे सोशल नेटवर्क जेथे, लोक बोलतील, चाट करतील, गेम्स खेळातील आणि परत जातील. मग अशा ठिकाणी लोकांना बिझी कसं ठेवायचं, त्यांना जास्त वेळ तेथे थोपवून कसं ठेवायचं. लोकांना परत-परत कसं आणायचं, ज्यामुळे हे “मेटाव्हर्स” जास्त पॉप्युलर होईल. त्यासाठी येथे असतील व्हॅच्युअल गेम्स. म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रां सोबत सायकल चालवण्याची शर्यत लावाल. धावण्याची शर्यत लावाल. तुम्ही तुमच्या घरात धावलं, तुमच्या हातात तो रिमोट सेन्सर असेल आणि त्या “मेटाव्हर्स” सोशल नेटवर्कच्या काल्पनिक जगात तुम्ही खरोखरचे धावत असाल, गप्पा मारत असाल आणि बरेच काही करत असाल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एक स्वतंत्र आणि वेगळं जग बनवू शकाल. म्हणजे आज “मेटाव्हर्स” गेमिंगचा आणि सोशल नेट्ववर्किंगची पुढची लेव्हल असेल. पण पुन्हा प्रश्न उभा राहतो, किती वेळ गेम्स खेळणार किती वेळ गप्पा मारणार किंवा चाटींग करणार. म्हणून “मेटाव्हर्स” आपल्या सारख्या लोकांना इतकं एंगेज करायचंकी, तुम्ही ही आभासी दुनिया कधी सोडूनच जाणार नाही. ही असेल “मेटाव्हर्स” ची खरी लेव्हल.

आता तुम्हाला माहित आहे की येथे खूप सारे लोक येणार, खूप वेळ गप्पा मारणार, गेम्स खेळणार. म्हणून लोक त्यांचा बिजनेस तेथे घेऊन जाणार. येणाऱ्या-जाणाऱ्या साऱ्या लोकांना त्यांचा ब्रँड दिसावा. जे-जे आपण खऱ्या जीवनात पाहतो, जे व्यवसाय येथे करतो. ते सारे या आभासी, कल्पनेतील दुनीयेत खऱ्या पद्धतीत चालू होतील. जसे स्मार्ट स्कुलचे क्लासेस “मेटाव्हर्स” मध्ये घेतो अशी ऍड करू. म्हणजे तेथे येणारे लोक आपला बोर्ड पाहतील आणि आवश्यक असल्यास क्लास जॉईन करतील. आता मला सांगा लोक जेथे आहेत, व्यवसाय थेथे आहे, तर मग जॉब पण तेथे असतीलचना. म्हणजे स्मार्ट स्कुलचे क्लास घेण्यासाठी मी, माझी टीम तर तेथे काम करेलचना. म्हणजेच “मेटाव्हर्स” मध्ये लोकांना काम मिळेल. लोक तेथून पैसे कमवू शकतील.

शकतील काय हल्ली कमावताहेत. जर आपण ८-१० तास जर काम तेथे करणार. लोकांना भेटणार, त्यांच्याशी गप्पा मारणार. हळू-हळू आपापलं नेटवर्क तेथे तयार होऊ लागेल. तेथे आपले नवे मित्र बनतील. तेथेच आपले नवीन ट्रेकिंग चे प्लॅन तयार होतील. एखाद्या गडावर जाण्याचे आराखडे तयार होतील. आणि मग काही दिवसांनी “मेटाव्हर्स” ही आभासी दुनयाच आपली खरी दुनया बनेल.

मेटाव्हर्सची क्षमता :

तुम्ही म्हणाल जर हे सारे मी खऱ्या जीवनात करतोय, तर मग मला या आभासी जगात जाण्याची गरज काय. तर त्याचीही बरीच कारणे आहेत. समजा तुम्हाला तुमच्या मित्राला भेटण्यासाठी, बंगलेरू ला जायचे असेल. तर त्यासाठी तुम्हाला तासं-तास प्रवास करावा लागेल. विमानाचे तिकट काढ, बसचे तिकीट काढ आणि बरेच काही. पण “मेटाव्हर्स” मध्ये तुम्ही क्षणात भेटू शकता. आणि आज टेकनॉलॉजि इतकी ऍडव्हान्स झाली आहे की, तुम्ही त्या व्यक्तीला खरोखर भेटल्याचा अनुभवही घेऊ शकाल. ३D गॉगल आणि सेन्सर सूट च्या साह्याने तुम्ही तो खरा स्पर्श अनुभवू शकाल.

दुसरा “मेटाव्हर्स” फायदा असा आहे की. कधी कधी आपल्याला भीती वाटत असते की, मी कसा दिसतो. माझा आवाज कसा आहे. माझी उंची कमी आहे, माझी बॉडी ठीक नाही. पण “मेटाव्हर्स” मध्ये तुमचा अवतार तुम्हाला हवा तसा असले. अगदी तुमच्या स्वप्नातील राजकुमारा सारखा. १००% तुमच्या आवडीचा. मग तुमच्या मनातील न्यूनगंडच नाहीसा होईल. तुम्ही कोणालाही भिडू शकाल.

“मेटाव्हर्स” मध्ये गुन्हेगारी खूप कमी असेल. तेथे कोणी-कोणाला मारलं तरी लागणार नाही. कोणाचा खून होणार नाही. कोणाचा अपघात होणार नाही. कोणाचे अकाउंट मधील पैसे चोरी होणार नाही. भ्रष्ठाचार होणार नाही. कोणाचे डुप्लिकेट कागदपत्र बनणार नाही. जे काही असेल ते सर्व कायदेशीर, सुरक्षित आणि सरळ- सुस्पष्ट. कारण हे ब्लॉक-चेन सिस्टिम थ्रू १००% सुरक्षित असेल.

आता सार खरं वाटू लागलं आहे ना. मग अजून प्रश्न आला असेल. हे सारं कधी पर्यंत सुरु होईल. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे खूप लवकरच होणार आहे. येणाऱ्या काही वर्षात. फेसबुक आणि इतर कंपनीज ने ऑलरेडी खरे खुरे दिसणारे ३D अवतार बनवले ही आहेत. ते इतके खरे आहेत, की जो पर्यंत आपण स्वतः म्हणत नाही तो माझा अवतार आहे तोपर्यंत समोरचा त्यावर विश्वास करणार नाही. तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं आहे. इतकंच काय. माणसाच्या मनात काय चालू आहे तेही वाचता आणि समाजता येऊ लागला आहे. आपल्या हाताच्या हालचाली वरून, आपण काय लिहणार आहोत याचा अचूक अंदाज घेता येऊ लागला आहे. म्हणजे याचा शोध लागला आहे. टेस्टिंग झाली आहे आणि ती ९९.९९% इतकी यशस्वी पण झाली आहे. येत्या काही वर्षातच “मेटाव्हर्स” फुल्ली डेव्हलप प्रणाली अस्तित्वात आलेली असेल, असं मला वाटतं.

मेटाव्हर्सचे कार्य :

पुढे “मेटाव्हर्सच” काम असेल, जे आजच्या सरकारचे आहे. म्हणजे प्रत्येक देशाची सरकार, त्या देशाची इतर देशा पासून सुरक्षा करणे, देशाची प्रगती करणे. त्यासाठी देशात नियंत्रण ठेवणे, नवे नियम लागू करणे. ते नियम जनता पाळते की नाही त्यावर लक्ष ठेवणे. जर कोणी सरकारी नियम पाळत नसतील, तर त्यांना शिक्षा करणे. सरकारच्या अशा सर्व कामकाजामुळे आपण समाजात आपले रोजचे कामकाज सहज करू शकतो, आणि आपले जीवन व्यथित करू शकतो. पण ह्या साऱ्या गोष्टी “मेटाव्हर्स” मध्ये नसणार त्यामुळे “मेटाव्हर्स” मध्ये आपण सर्वजण सामान असू, सर्वजण स्वतंत्र असू. हीच गोष्ट “मेटाव्हर्स” ला अधिक लोकप्रिय बनवते. कारण काही झालं तरी तुम्ही समोरच्या व्यक्तीला कसलीच हानी पोहचवू शकत नाही. म्हणून “मेटाव्हर्स” खूप सुरक्षित आहे.

चला समजून घेऊ ही “मेटाव्हर्स” दुनया असेल कशी. या दुनियेत तुम्ही आपली VR चष्मा घालून, किंवा मोबाइल, लॅपटॉप, डेस्कटॉपच्या मदतीने. या आभासी दुनियेत प्रवेश कराल. तेथे तुम्ही सिलेक्ट केलेला, सुंदर दिसणारा तुमचा अवतार असेल. तेथे खुपसारे शहर असतील, घर, जिम, दुकाने असतील, बाग-बगीचे असतील, डिस्को आणि बरच काही असेल. जे-जे खऱ्या दुनयेत आहे ते-ते सारे तेथे असेल. तुम्ही तुमच्या अवताराला, जेथे पाहिजे तेथे घेऊन जाऊ शकता. नवीन-नवीन शहर फिरू शकता. नवीन गोष्टी करू शकता. खेळू शकता, शिकू शकता. अभ्यास करू शकता. जितकं खर अनुभव घेता येत नाही त्याचा अनुभव घेऊ शकता. हळू-हळू आपण त्या दुनयेचा भाग बनत जाऊ. जितका जास्त वेळ तेथे घालवू. जर आपला जॉब तेथे असेल तर, आपण त्या जगाशी अजून जास्त जवळ येऊ. येणाऱ्या १०-१५ वर्षात हे जग इतकं विस्तृत झालं असेल की, ती एक स्वतंत्र अर्थव्यवस्था तयार झालेली असेल. स्वतंत्र बहरलेले विश्व असेल.

म्हणजे जेथे हवं तिथे जाणं शक्य झालं. याचा अर्थ आपण टाईम ट्रॅव्हल मशीन बनविली. रोज-रोज आपण “मेटाव्हर्स” मध्ये राहणार. मग आपल्या अवतार कडे आपल्या विषयीचा इतका डेटा उपलब्ध असेल की आपण नसताना ही, तो आपली रोजची कामे करत राहील. म्हणजेच आपण अमरही झालो नाही का? तर हे सारं असेल “मेटाव्हर्स” मध्ये. होत ना कमालीचं, आज कमालीचं वाटतंय. पण येत्या काही वर्षातच हे खरं होणार आहे. म्हणून येणाऱ्या नव्या जगाला सामोरं जाण्यासाठी तयार रहा.

अधिक माहिती :

आम्हाला आशा आहे की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

आवश्यक लिंक्स :
शैक्षणिक माहितीसाठी : येथे क्लीक करा.
खेळांविषयी च्या माहितीसाठी : येथे क्लीक करा.

In this article, we have learned about what is metaverse. Which stocks are present on this, how to invest in the metaverse, metaverse examples.
How to access the metaverse, what is metaverse exactly. What Facebook works on metaverse, what is metaverse logo, which are metaverse companies
and metaverse land. Now we know these questions’ answers.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x