SBI e Mudra Loan | एसबीआई ई-मुद्रा लोन

SBI e Mudra Loan | एसबीआई ई-मुद्रा लोन : e mudra loan SBI

SBI e Mudra Loan : होतकरू आणि स्वतःचे उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना आर्थिक मदत देण्यासाठी भारतीय सरकारने विविध सरकारी योजना लागू केल्या आहेत. एमएसएमई कर्ज विभागामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित व्यवसाय इच्छुकांच्या उद्देशाने अनेक योजना आहेत. त्यातील प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही एक योजना आहे जी SBI बँके द्वारे चालवली जाते. सध्या भारत सरकारने छोट्या-छोट्या लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी २०१५ पासून, “प्रधानमंत्री मुद्रा योजना” [ Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY) ] सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत असंयुक्त संस्था (नॉन-कॉर्पोरेट), विना शेती आणि लघु उद्योजक रु.१० लाखा पर्यंत व्यवसाय कर्ज घेऊ शकतात, हि सुविधा व्यावसायिक कर्जासह क्रेडिट सुविधा प्रदान करण्यासाठी सुरू केली आहे. e mudra loan sbi म्हणजेच sbi e mudra pm svanidhi loan.

पात्रता निकषांच्या आधारे पात्र कर्जदाराला पाठिंबा देण्यासाठी सरकारने २७ सार्वजनिक क्षेत्रातील बँका, १७ खाजगी क्षेत्रातील बँका, २७ प्रादेशिक ग्रामीण बँका आणि २५ सूक्ष्म वित्त संस्था भागीदार संस्था म्हणून नोंदणी केल्या आहेत. या व्यापारी बँका, बिगर बँकिंग वित्त संस्था, ग्रामीण बँका किंवा छोट्या बँकांद्वारे मुद्रा लोन दिले जाते.

आज आपण अशाच प्रकारचे मुद्रा कर्ज देणारी बँके विषयी, कर्जाच्या पद्धती विषयी जाणून घेणार आहोत.
ती बँक आहे, “स्टेट बँक ऑफ इंडिया” (SBI). भारत देशातील सर्वात मोठी बँक.

Related Topic : HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड … (Read More)

एसबीआय ई मुद्रा कर्जाची वैशिष्ट्ये

मुद्रा कर्जे मुळात ३ वर्गात आहेत. अर्जदार त्यांच्या गरजेनुसार योग्य श्रेणीमध्ये मुद्रा कर्जासाठी अर्ज करू शकतात.

शिशु : ५0000 रुपयांपर्यंत कर्ज, व्याज दर किमान 1% दरमहा किंवा 12% वार्षिक. परतफेड कालावधी 1-5 वर्षे.

किशोर : ५000१ रुपयांपासून ५ लाखांपर्यंत कर्ज. योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करताना अर्जदाराचा क्रेडिट इतिहास लक्षात घेऊन व्याज दर कर्जदारावर अवलंबून असेल. परतफेड कालावधी बँकेच्या निर्णयानुसार अवलंबून असेल परंतु जास्तीत जास्त ५ वर्षे.

तरुण : ५ लाख ते १0 लाख रुपयांपर्यंत कर्ज. योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून अर्जदाराचा क्रेडिट इतिहास लक्षात घेऊन व्याजाचे दर अवलंबून राहतील. परतफेड कालावधी बँकेच्या निर्णयानुसार अवलंबून असेल परंतु जास्तीत जास्त ५ वर्षे.

मुद्रा योजनेअंतर्गत तुम्ही घेतलय जाणाऱ्या कर्ज घेण्यासाठी तारणाची गरज लागत नाही. परंतु हे उद्योजक आणि बँक यांच्यावर अवलंबून असेल.

कर्जाची परतफेड करण्याची जास्तीत जास्त मुदत ५ वर्षे असेल. उद्योग विकासाचा वार्षिक आढावा घेण्यात येईल.

बाजारातील स्पर्धात्मक व्याज दर अर्जदाराच्या क्रेडिट प्रोफाइलवर आधारित ठरवले जातात.

मुद्रा कर्जाचा लाभ कोण घेऊ शकतात ?

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) [Micro, small & Medium Enterprises. (MSME)] या सदारांतर्ग उद्योजकांना मुद्रा कर्ज देखील प्रदान करते. लुघू उदयोग व्यवसाय विस्तारीत करण्यासाठी, त्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी, छोटी-मोठी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी, इत्यादी विविध आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तुम्ही एसबीआय ई-मुद्रा कर्ज घेऊ शकता.
या योजनेअंतर्गत असंयुक्त संस्था, अनेक लघु व्यवसाय विभाग जसे लघु उत्पादन युनिट, सेवा क्षेत्रातील युनिट, दुकानदार, फळे आणि भाजीपाला विक्रेते, ट्रक ऑपरेटर, फूड-सर्व्हिस युनिट्स, दुरुस्ती करणारी दुकाने, मशीन ऑपरेटर, लघु उद्योग, कारागीर, फूड प्रोसेसर आणि इतर म्हणून कार्यरत असलेल्या लाखो मालकी किंवा भागीदारी कंपन्या इत्यादि जण या एसबीआय बँकेद्वारे दिल्या जाणाऱ्या मुद्रा कर्जाचा लाभ घेऊ शकतात.

स्टार्ट-अप अर्जदारांनी व्यवसायाचे प्रतिमा सादर केले पाहिजे, जे या कर्जाचा लाभ घेण्यासाठी व्यवसाय मॉडेलची नफा कमावण्याची क्षमता दर्शवते. स्टार्ट-अप चे सामान्यतः शिशु योजने अंतर्गत वर्गीकरण केले जाते आणि अशा व्यवसायांना ५0000 रुपयांपर्यंत कर्जाची रक्कम मिळते.

आधीक नफा कमावणाऱ्या प्रस्थापित व्यवसाय युनिट्स, किशोर आणि तरुण वर्गांतर्गत येतात. यांना व्यवसायाच्या विस्तारासाठी किंवा यंत्रसामग्री आणि उपकरणे सुधारण्यासाठी क्रेडिटसाठी अर्ज करू शकतात. या अर्जदारांना नफ्याचे पुरावे सादर करावे लागतील आणि यंत्रसामग्री आणि उपकरणे अपग्रेडेशनची आवश्यकता देखील सिद्ध करावी लागेल. त्यांना हे समजावून सांगावे लागेल की हा विस्तार किंवा सुधारणा त्यांच्या नफ्यात सुधारणा करण्यास मदत होणार आहे. या कर्जामुळे नवीन रोजगाराच्या संधी देखील निर्माण होणार आहेत. बँकेला जर हे पटलं, पाहणी अंतर्ग हे सिद्ध झालं तर तुम्ही १ लाख ते १० लाखा पर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकता.

जर तुमचे SBI बँके मध्ये खाते असेल तर तुम्ही SBI मुद्रा कर्जासाठी रु.१ लाखापर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. एसबीआय ई -मुद्रा लोन साठी वेबसाइट – Link for SBI e Mudra Loan : https://emudra.sbi.co.in:8044/emudra

Related topic : Buy car insurance online | कार विमा म्हणजे काय ? —– Read more.

एसबीआय मुद्रा कर्जाचे काय फायदे आहेत?

१) ओव्हरड्राफ्ट सुविधा.
तुम्हाला SBI मुद्रा कार्ड द्वारे ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. हे एक कार्ड आहे, ज्या कार्ड द्वारे तुम्हाला रोख क्रेडिट सेवा प्रदान करते आणि हेच कार्ड डेबिट कार्ड म्हणून देखील उपयोगात येऊ शकते.

२) प्रक्रिया शुल्क :
सर्वात महत्वाचे म्हणजे मुद्रा कर्जासाठी बँक कोणतेही प्रक्रिया शुल्क (Processing fee) घेत नाहीत . आपल्याकडे कोणतेही संपार्श्विक किंवा सुरक्षा नसल्यास, ही कर्जे संपार्श्विक-मुक्त आहेत. त्यामुळे तुम्हाला हे कर्ज सहज उपलबद्ध होऊ शकते.

३) व्याज दर :
What is the interest rate for Mudra loan in SBI?

एसबीआय मुद्रा कर्जावरील व्याज दर आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निर्धारित असल्यामुळे, ते नियमित व्यावसायिक कर्जापेक्षा खूप दारावर दिले जातात.

४) खरेदीची यादी :
स्टेट बँक ऑफ इंडिया मुद्रा कर्ज हे व्यवसायाचे विस्तार करण्यासाठी, उपकरणे खरेदी इत्यादीसाठी मिळू शकते. याव्यतिरिक्त, योजनेचा महत्वाचा एक भाग म्हणजे, व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी छोट्या-छोट्या वस्तूंची तरतूद करता येऊ शकते.

५) महिलांना सवलत :
महिला उद्यमी योजनेअंतर्गत केंद्र महिलांना त्यांचे उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहित करते. अशा प्रकारे, महिलांना एसबीआय मुद्रा कर्ज अधिक विशेष सवलतीच्या दरात मिळण्याची सुविधा आहे. महिलांना सवलत

एसबीआय ई-मुद्रा व्याज दर आणि शुल्क

१) व्याज दर : (What is the interest rate for Mudra loan in SBI?)
MCLR शी जोडल्या नंतर जे 8.40% ते 12.35% दरम्यान असेल.
MCLR म्हणजे : Marginal Cost Of Funds Based Lending Rate – निधी आधारित कर्ज दरची अधिकतम किंमत

२) प्रक्रिया शुल्क :
शिशु आणि किशोरसाठी कोणत्याही प्रकारचा प्रक्रिया शुल्क नाही. तरुणांसाठी कर्जाच्या रकमेच्या 0.5 % प्रक्रिया शुल्क असेल.

३) प्री -पेमेंट शुल्क :
३ ते ५ वर्षे सहा माह्याच्या स्थगितीसह, प्रत्येक व्यवहाराच्या स्वरूपानुसार ते अवलंबून असेल.

Related Topic : फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती….. Read more

मुद्रा कर्जासाठी पात्रता काय असेल

Who is eligible for E Mudra loan? अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे. आणि कमाल वयोमर्यादा 65 वर्षे असावी. This is the mudra loan eligibility.
आवश्यक कागदपत्रे :
अ) Documents for SBI e Mudra Loan : एसबीआय ई-मुद्रासाठी आवश्यक कागदपत्रे. एसबीआय शिशु मुद्रा कर्जासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत.


➥ जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र (GST Registration certificate)
➥ एसबीआय बँकेच्या खात्याचा तपशील
➦ उद्योग स्वरूप नोंदणीकृत असलेले आधार तपशील (Udyog Aadhar details)
➥ खरेदी आणि आस्थापना प्रमाणपत्र (Shop purchasing and Establishment Certificate)

आ) एसबीआय किशोर आणि तरुण मुद्रा कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

ओळखीचा पुरावा : पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट किंवा शासकीय प्राधिकरणाने जारी केलेले फोटो आयडी इ.
निवासी पुरावा : दूरध्वनी किंवा वीज बिल, मालमत्ता कर पावती इतर उपयोगिता बिल, पासपोर्ट, स्थानिक पंचायत किंवा नगरपालिकेने दिलेले निवासी प्रमाणपत्र इ.
बँक स्टेटमेंट : मागील सहा महिन्याची खाते विवरण.
व्यवसाय ID : आधार आणि स्थापनेचा पुरावा पत्र (नोंदणी प्रमाणपत्रे आणि भाडेपट्टी किंवा भाडे करार किंवा इतर कागदपत्रे)
ताळेबंद प्रमाण पत्र : मागील दोन वर्षांचे वार्षिक ताळेबंद विवरण पत्र. (Balance Sheet statement)
नफा-तोटा प्रमाण पत्र : मागील दोन वर्षाचे वार्षिक नफा-तोटा विवरण पत्र. (Profit and Loss statement)
अर्जदाराचा फोटो : अर्जदाराचे २ अलीकडील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र.
उपकरणे / यंत्रे खरेदी करण्यासाठी मागवले किंमतिचे कोटेशन : अर्जासोबत यंत्रसामग्री आणि व्यवसायासाठी खरेदी करावयाच्या इतर वस्तूंचे कोटेशन असणे आवश्यक आहे.
आयकर दस्तऐवज : व्यक्ती आणि व्यावसायिक संस्थांसाठी मागील २ वर्षांचे आयटी विवरणपत्र

एसबीआय ई-मुद्रा कर्जासाठी अर्ज कसा करावा?

तुम्ही SBI ई-मुद्रा कर्जासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाइन अर्ज करू शकता.

SBI ई-मुद्रा कर्जासाठी ऑनलाईन प्रक्रिया :

How can I get 50000 loan from SBI? : If you apply from online you can get upto Rs.1 lakh loan from SBI bank. SBI e mudra and pm svanidhi loan याच प्रोसेस ने अप्लाय करतात.

How to apply for SBI e mudra loan : SBI e mudra loan apply online. एसबीआय ई-मुद्रा कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण करू शकता :

चरण १ : एसबीआय ई-मुद्रा वेबसाइटवर जा आणि ‘Proceed for e-Mudra’ वर क्लिक करा.

चरण : ‘OK’ वर क्लिक करा.
चरण : नंतर दिलेल्या सूचना वाचा माहिती भरा. ज्यात तुम्हाला मोबाईल नंबर, एसबीआय खाते क्रमांक, कर्जाची रक्कम ई. भरून “Proceed” बटणावर क्लिक करा.
चरण : अर्ज भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
चरण : ई-चिन्हासह नियम आणि अटी स्वीकारा. ई-सही साठी आधार वापरावयाचे असल्यास, संमती देण्यासाठी तुमचा आधार क्रमांक द्यावा लागेल.
चरण ६ : शेवटी ओटीपी प्रविष्ट करा जो तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त होईल.

बस, येथे तुमची ऑनलाईनची प्रक्रिया पूर्ण होते.

| Apply for SBI credit Card – and Save more : Clik Here


SBI ई-मुद्रा कर्जासाठी ऑफलाइन प्रक्रिया :

आपल्या जवळच्या एसबीआय बँकेच्या शाखेत जा आणि कर्ज आणि वित्त हाताळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घ्या. त्यांना तुमच्या कर्जाची आवश्यकता आणि व्यवसायाच्या प्रस्तावाबद्दल सांगा. तेथे तुम्हाला ई-मुद्रा अर्ज दिला जाईल, फक्त फॉर्म मधील आवश्यकती माहिती भरा, आवश्यक कागदपत्रे जोडा आणि अर्ज प्रस्तुत (सबमिट) करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ : SBI ई-मुद्रा कर्जासाठी) :

कर्जाचे स्वरूप कसे आहे ?
➤ मुदत कर्ज किंवा कार्यरत भांडवल म्हणून मुद्रा लोन दिले जाते.

कर्जाचे उद्देश काय आहे ?
➤छोट्या उद्योगांसाठी (स्टार्ट-अपसाठी) भांडवल, विद्यमान युनिट्सचे आधुनिकीकरण, युनिटचा विस्तार, उपकरणे आणि यंत्रे खरेदी

कर्जाची पात्रता काय आहे ?
➤ उद्योजक आपला व्यवसाय वाढवण्यासाठी, नवीन व्यवसाय स्थापित करण्यासाठी किंवा नफा कमवणाऱ्या संस्था स्थापन करण्यासाठी.

मुद्रा कर्ज समाजातील कोणत्या घटकांसाठी आहे ?
➤ मुद्रा कर्ज ग्रामीण आणि शहरी अशा समाजातील सर्व दोन्ही भागातील उद्योजकांना साठी आहे. सर्व घटकातील लोक एसबीआय मुद्रा कर्जासाठी अर्ज करू शकतात.

कर्जाचे प्रमाण किती आहे ?
➤ कर्जाची कमाल मर्यादा रक्कम: रु .१0 लाख.

शिशु श्रेणी कर्जाचे प्रमाण किती आहे ?
➤ कर्जाची कमाल मर्यादा १0,000 ते ५0,000 रुपयांपर्यंत.

किशोर श्रेणी कर्जाचे प्रमाण किती आहे ?
➤ कर्जाची कमाल मर्यादा ५१,000 ते ५00,000 रुपयांपर्यंत.

तरुण श्रेणी कर्जाचे प्रमाण किती आहे ?
➤ कर्जाची कमाल मर्यादा ५00,000 ते १0,00,000 रुपयांपर्यंत.

मुद्रा कडून या क्रेडिट सुविधेसाठी कोण पात्र आहेत?

➤ ही योजना प्रामुख्याने नॉन-कॉर्पोरेट स्मॉल बिझनेस सेगमेंट (NCSBS) वर केंद्रित आहे ज्यात मोठ्या प्रमाणावर मालकी आणि भागीदारी फर्म आहेत ज्यात लहान उत्पादन युनिट, सेवा क्षेत्र युनिट, दुकानदार, फळे आणि भाजी विक्रेते, ट्रक ऑपरेटर, अन्न-सेवा युनिट, दुरुस्ती करणारी दुकाने, मशीन ऑपरेटर, लघु उद्योग, कारागीर, अन्न प्रक्रिया करणारे आणि इतर, ग्रामीण आणि शहरी भागात.

Related Topic : Best Online Trading Platform in india : सर्वोत्तम ट्रेडिंग प्लॅटफॉर्म

परतफेडचा कालावधी किती आहे ?
➤ ३ ते ५ वर्षे, सहा माह्याच्या स्थगितीसह, प्रत्येक व्यवहाराच्या स्वरूपानुसार ते अवलंबून असेल.

प्रक्रिया शुल्क किती असेल ?
➤ शिशु आणि किशोर कर्जासाठी शून्य
➤ तरुण कर्जासाठी कर्जाच्या रकमेच्या 0.5%

मार्जिन किती द्यावी लागेल ?
➤ मार्जिन ५0,000 रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य
➤ रु. ५0,00१ ते रु .१0 लाख कर्जाच्या रकमेसाठी १0%

मुद्रा कर्ज महिला मुद्राच्या कोणत्या श्रेणीमध्ये घेऊ शकतात ?
➤ महिला उद्यमी योजने अंतर्गत जी महिला उद्योजकांसाठी डिझाइन केलेली आहे आणि ती मुद्रा अंतर्गत समाविष्ट आहे. या योजनेअंतर्गत, महिलांना तिन्ही गटांखाली मदत मिळू शकते, उदा. ‘शिशु’, ‘किशोर’ आणि ‘तरुण’.

व्याज दर किती आहे ?
➤ MCLR दरांशी जोडलेले

संपार्श्विक सुरक्षा ठेव म्हणून काय द्यावे लागेल ?
➤ कोणतेही संपार्श्विक आवश्यक नाही. तथापि, प्राथमिक सुरक्षा म्हणून, मुदत कर्जासाठी पी अँड एमचे गहाण मालमत्ता म्हणून (हायपोथेकेशन) आणि कॅश क्रेडिटसाठी वस्तूंचा साठा आणि प्राप्तीयोग्य वस्तू गहाण मालमत्ता म्हणून ठेवल्या जातात.

एसबीआयला मुद्रा कर्जासाठी कोणत्याही तारणाची आवश्यकता आहे का?
➤ एसबीआयला मुद्रा कर्जासाठी कोणत्याही तारणाची आवश्यकता नाही. RBI ने सर्व कर्ज रु. एमएसई क्षेत्रासाठी रु १0 लाखा पर्यंत कोणत्याही संपार्श्विकची आवश्यकता नसल्याचे जाहीर केले आहे. बँकेला मात्र कर्जदाराला कर्जाच्या मुदतीसाठी बँकेकडे एसबीआय मुद्रा कर्जाच्या पैशाने मिळवलेले स्टॉक, यंत्रसामग्री, जंगम वस्तू किंवा इतर कोणत्याही वस्तू हायपोथिकेट (तारण) ठेवण्याची आवश्यकता असते.

सांगता :

ज्या व्यक्तींना व्यवसायाशी संबंधित विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असते त्यांच्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना हा एक आदर्श पर्याय आहे. या योजनेद्वारे, देशातील MSMEs ला निधीमध्ये अधिक चांगला लाभ होणार आहे. छोट्या उद्योगांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक निधी सहज उपलब्ध करता येणार आहे. हे सर्वजण PMMY योजनेअंतर्गत स्वस्त दराने कर्ज घेऊ शकतात. यामुळे रोजगार निर्मिती आणि जीडीपी वाढण्यास मदत होईल व भारताची अर्थव्यस्था सुधारण्यास मदत होईल. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज, तुमचे उद्योजक बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रभावी पर्याय आहे, या योजनेचा अवश्य फायदा घ्यावा. यासाठीच हि माहिती तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा हा प्रयत्न आहे.

अधिक माहिती :

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x