Akshay Tritiya in Marathi | अक्षय तृतीया
अक्षय तृतीया विषयी अधिक माहिती जाणून घ्या, कदाचित तुम्हाला ती माहित ही नसेल. जाणून घ्या हिंदू संकृती आणि परंपरा विषयी. बरीच माहिती वेगवेगळ्या साईट्स व व्हिडिओस मधून गोळा करून तुमच्या पर्यंत, सहज सोप्या शैलीत, पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. वाचा तुम्हाला नक्की आवडेल.
Akshay Tritiya in Marathi | अक्षय तृतीया : आपल्या भारतात, विविध जाती, धर्म, भाषा किंवा वेगवेगळ्या क्षेत्रानुसार सांस्कृतिक फरक पाहावयास मिळतात. जितके जाती-धर्म तितके पारंपरिक सण आपण अनुभवत असतो. मोठ्या-मोठ्या सणांसोबत असे ही काही वेशष दिवस असतात. ज्या दिवसांना सांस्कृतिक आणि धार्मिक मान्यते नुसार अतिशय शुभ आणि विशेष दिवस मानले जातात. असाच एक दिवस किंवा तिथी म्हणजे वैशाख मासातील शुक्ल पक्षाची तृतीया, “अक्षय तृतीया !”. अक्षय म्हणजे कधीच क्षय ना पावणारा, कधीच नष्ट न होणारा. या दिवसाला साडे-तीन-मुहूर्तांपैकी एक असा अतिशय सौभाग्यशाली दिवस मनाला जातो.
या दिवशी सूर्य आणि चंद्र आपापल्या कक्षेतील उच्च प्रभावात असतात, त्यामुळे त्यांचे तेजही अतिउच्च असते. म्हणून या तिथीला सनातन धर्माच्या पंचांग नुसार सर्व श्रेष्ठ मानले जाते. असे मानले जाते कि या दिवशी जे शुभ काम केले जातात त्यांचा परिणाम सदैव (अक्षय) सुखद राहतो. अक्षय तृतीया हा पर्व विशेषतः महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान तसेच संपूर्ण उत्तर भारतात श्रद्धा पूर्वक साजरा केला जातो. या दिवशी वसंत ऋतूची समाप्ती होते व ग्रीष्म ऋतूची सुरुवात होते.
यादिवसा विशेषयीच्या काही मान्यताही जणूया | Know some specialites about Akshay Tritiya :
➥ या दिवसाला भगवान विष्णूचे सहावे अवतार श्री परशुम यांची जयंती सोहळा म्हणूनही साजरी केली जाते.
➦ या दिवशी भगवान विष्णूचे नर आणि नारायण यांचा अवतरित दिवस म्हणूनही मनाला जातो.
➥ भागीरथच्या आग्रहास्तव माता गंगा नदीचे पृथ्वीवर आगमन याच दिवशी झालं होतं.
➦ असं ही मानलं जातं कि सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगाचा प्रारंभ याच दिवशी झाला होता. म्हणून या दिवसाला युगादी असेही म्हटले जाते.
➥ तसेच हा दिवस भगवान विष्णूचे अजून एक अवतार हरग्र्यु यांचा अवतारित दिवस म्हणून मनाला जातो.
➥ याच दिवशी ब्रम्ह देवाचे पुत्र अक्षय यांचा अवतार आगमन झाले होते.
➦ महर्षी व्यास आणि श्री गणेश यांनी महाभारताच्या लिखाणाचा प्रारंभ ह्याच दिवशी केला होता.
➥ महाभारतातील कुरुक्षेत्राच्या अंतिम युद्धाची समाप्ती याच दिवशी झाली होती.
यादिवसाच्या काही विशेष घटना जाणून घेऊया | Some special envent on Akshay Tritiya :
➥ वृंदावन मधील श्री कृष्णाच्या मंदिरात, मूर्तीचे चरण-कमल यांचे दर्शन घेण्यासाठी, केवळ या एकाच दिवसा साठी मुक्त केलं जातं.
➦ या दिवस पासून चारधाम देवालय भक्तांसाठी मुक्त केलं जातं.
➥ ओरिसा मधील रथ यात्रेच्या रथाचं सुशोभी कारणाचं काम याच दिवशी सुरु करतात.
या दिवशी काय करावे : What to do on Akshay Tritiya in Marathi:
अक्षय तृतीया हा संपूर्ण दिवस शुभ असल्यामुळे या संपूर्ण दिवसात शुभ वेळ कोणती हे पाहण्याची किंवा पंचांग पाहण्याची काही आवशक्यता नसते. म्हणूच या दिवशी लग्न समारंभ गृह प्रवेश, वास्तू शांती अशा प्रकारचे शुभ-मंगल कार्ये केली जातात. या दिवशी व्रत केल्यास त्याचे चांगले पुण्य फळ मिळते. या दिवशी सोन खरेदी करण्याचीही प्रथा आहे. या दिवशी पूजा, हवन, दान-पुण्य केल्यास अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की ज्यांना लग्नासाठी वर्षभर मुहूर्त नसेल, त्यांचेही लग्न या दिवसाच्या शुभमुहूर्तावर केले जातात. भारतात बऱ्याच ठिकाणी या शुभमुहूर्तावर हजारोंच्या संख्येने सामूहिक विवाह केले जातात.
सारांश : Conclusion of Akshay Tritiya in Marahti :
अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ आहे आणि या दिवशी जे चांगलं कार्य करू, त्याचे मिळणार फळ हे अक्षय असेल. खास करून या दिवशी, देवाची आराधना करायची, पूजा -पाठ करायचा. चांगल्या कार्यासाठी जितकं शक्य तितकं दान करायचं. स्वतः आनंदी राहून इतरांनाही आनंदी करायचं. आपल्या भारतीय सणांचा मुलं गाभा हाच आहे.
या लेखात दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर, स्वतः पुरती न ठेवता इतरांनाही सामायिक करा (Share) करा. आपला अभिप्राय मात्र नक्की द्या. धन्यवाद !
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
Complete information about Marathi festival Akshaya Trithiya. Why we celebrate Akshaya Trithiya festival in Marathi? How to celebrate Akshaya Trithiya festival? What to do on Akshay tritiya day. What is Akshay Tritiya. Indian Festivals.