Marathi Kavita To Anolakhi : प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एकदातरी नक्की येतो, “तो अनोळखी”. जो तिचं आयुष्यचं भारून टाकतो अन “तो अनोळखी” कधी जिवलग बनतो हे तिचं तिलाही कळत नाही…त्याच अनोळखीची ओळख सांगणारी माझी ही कविता…

हळुवार कुणी यावे
नकळत आपले व्हावे
जन्मांतरीचे बंध जणू
घट्ट रोऊनी सह चालावे
मैत्रीच्या सुखद नात्यामधला
गोडवा क्षणात बिलगावा
महत्प्रयासे जे ना साधे
सहजपरी तो करून जावा
आकर्षणास ओढ असते
सुंदरतेच्या हव्यासाची
निर्मळ मनास स्पर्षणारा
सहवास हवासा तो जपणारा
रूपावर भुलणारे अनेक होते
पण तो एकच मन जिंकणारा
मनाचा आरसा तो माझा
श्रावणापरी बरसणारा
अवखळ गहिरा झराच जणू तो
जणू रानवारा भिरभिरणारा
स्वच्छंदी अन मनस्वी असा जणू
पाऊस ओला रिमझीमणारा
तारुण्याच्या उंबऱ्यावरती
संयमाची सोबत करणारा
खट्याळ माधवापरी तरीही
नात्याचे पावित्र्य राखणारा
तो अनोळखी असूनही
परिचित असा भासणारा
आसमंत व्यापणारा
सुगंध बनून दरवळणारा
… सुगंध बनून दरवळणारा
तुम्हाला जर ही कविता आवडली असेल, तर अभिप्राय नक्की कळवा, तसेच स्वतः पुरताच वाचत न राहता तुमच्या मित्रांसोबत सामायिक (share) करा. .धन्यवाद !🙏
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
Marathi Kavita To Anolakhi
- Zunjaar Marathi Kavita – Marathi Best Inspirational Poem |झुंजार मराठी कविता #1 - November 25, 2024
- Best Marathi Poem | Lek Aamchi Ladachi | लेक आमची लाडाची - March 12, 2024
- My Family Poem in Marathi | Mhatarpan | म्हातारपण - February 28, 2024