Neem Paste on Skin Good/ Bad| कडुलिंबाचा लेप चांगला/ वाईट

Neem Paste on Skin Good or Bad : कडुलिंबाची पेस्ट तुमच्या त्वचेला तशीच लावणे योग्य आहे का ? Neem leaves paste how much time to leave on the skin? What are the benefits of neem paste on our skin? आज आपण यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर पाहणार आहोत.

नमस्कार मित्रांनो आजचा विषय समाजाला असेलच. होय “कडूलिंब” आज आपण कडुलिंब याविषयी पाहणार आहोत, कडुलिंबाचे उपयोग आणि गुण. या लेखात आज आपण कडुलिंबाची पेस्ट त्वचेसाठी चांगली की वाईट ते समजून घेणार आहोत शिवाय ती कशी वापरायची ते पाहणार आहोत. चला तर करूया सुरुवात.

थोडी माहिती :

आपण हे जाणतोच की, आपले घरगुती उपचार खूप फादेशीर आणि खूप गुणकारी असतात. तसेच या उपायांमुळे कोणताच दुष्परिणाम होत नाही, झाला तर तो फायदाच असतो. आता आपण पाहणार आहोत असाच एक घरगुती उपाय. आपणास त्वचेच्या अनेक समस्या असतात. या समस्या दूर करण्यासाठी आपण व्यावसायिक उत्पादनांवरच अवलंबून राहतो, किंबहुना तेच आपल्या जास्त किफायतशीर आणि जास्त विस्वासू वाटतात. खरं तर हे तुम्हाला माहित असले पाहिजे की आपले घरगुती आणि आयुर्वेदिक उपायच जास्त उपयुक्त आणि चांगले असतात. याउलट बाजारातील उत्पादने, त्यांच्यात असलेल्या रसायनांमुळे (chemicals) तुमच्या त्वचेसाठी जास्त घातक आणि थोडी विषारी असू शकतात. घरगुती उपायात नैसर्गिक घटकांचा उपयोग केल्याने त्वचेच्या सर्व विकारांपासून सुटका मिळू शकते. (Neem Paste on Skin is really good)

जर कोणी तुम्हाला सांगितले की तुम्ही तुमच्या त्वचेच्या जवळजवळ सर्वच्या सर्व समस्या फक्त एका उपायाने सहज सुटू शकतात? प्रश्न ऐकून, आश्चर्य वाटले असेल ना. लगेच मनात अशी कोणती चमत्कारिक वस्तू असेल ती? ज्यामुळे त्वचेच्या सर्व समस्या समाप्त होऊ शकतात? त्या वास्तूचे नाव काय? हे जाणून घेण्याची उत्कंठा दाटली असेल ना! ठीक आहे, ठीक आहे, सांगतो, ते दुसरे तिसरे काही नसून “कडुलिंब” आहे.

तुम्ही घरच्या घरी, घरगुती कडुलिंबाचा बनविलेला लेप, तुमच्या त्वचेची हरवलेली चमक परत आणण्या साठीचे संपूर्ण सूत्र आहे. त्वचेच्या अनेक समस्या पासून वाचवू शकतो. हानिकारक अतिनील किरणांपासून प्रतिबंधित करते. वाचायला खरच खूप छान वाटते ना? पण ते खरं ही आहे, कडुलिंब हे करू शकतो, यात शंका नाही. कारण आपल्या ,माहित आहे की कडुनिंब हा एक नैसर्गिक त्वचा संरक्षक आहे.

|Related: What Happens If Eat Ginger | काय होईल जर रोज आलं खाल्लं

कडुलिंबाचा चमत्कार:

चला, चमत्कारिक वस्तू कोणती हे तर समजले. हे कडुलिंब चेहऱ्यावर लावायचे कसे, किंवा कडुलिंबाचा लेप बनवायचा कसा आणि तो चेहऱ्यावर लावता येईल का? कडुलिंब सोबत अजून कोणत्या गोष्टी लागतील ? या सर्व प्रश्नाचे उत्तर येथे समजून घेऊ.

कडुलिंब ही एक औषधी वनस्पती म्हणून खूप लोकप्रिय आहे, हे आपणास माहित आहेच. ह्या कडुलिंबाची पाने आणि त्याचा अर्क दाहक विरोधक, जंतुनाशक, जखम लवकर भरून काढण्या साठी, तसेच अँटिऑक्सिडेंट आणि उपचार गुणधर्मांसाठी वापरले जातात. जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा उत्तम मेळ कडुलिंबात आहे. हे चरबीयुक्त आम्लाचा (Fatty Acid) मुख्य स्रोत आहे. आपल्या निरोगी त्वचेसाठी हे खूप आवश्यक आहे. तसेच, कडुनिंबात अनेक सक्रिय घटक असतात जे त्वचेच्या समस्यांपासून आपल्याला मुक्त होण्यास मदत करतात. खाज, खरूज, गजकर्ण अशा त्वचा रोगांवरही कडुलिंबाच्या पानांचे पाणी लावण्याचे प्रकार अगदी प्राचीन काळापासू वापरात असल्याचे, ज्ञात आहेत. अजूनही गावातील वैद्य याचाच उपयोग करतात. कडुलिंब ही आपल्याला निसर्गाची कडून मिळालेली अनमोल देणगी आहे, म्हणून आपण तिचा वापर केलाच पाहिजे, या बहुपयोगी वस्तूची माहिती करून घेतलीच पाहिजे.

कडुलिंब – आरोग्यासाठी कसा:

आपल्या आरोग्यासाठी कडुलिंब कसा फायदा करू शकतो ते पाहू :

➥ कडुलिंब त्वचेतील तेलाचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
➦ कडुनिंबात अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे त्वचेवरील काळे डाग, इतर डाग, त्वचेचा रंगद्रव्य कमी करण्यास मदत होते. ज्यामुळे आपली त्वचा डागरहित आणि निर्दोष होते.
➥ कडुलिंबाचा लेप लावल्याने चेहर्‍याचा रंग सुधारण्यास मदत होते,
➦ कडुनिंबामध्ये जीवनसत्व “ई” आणि फॅटी ऍसिड असतात, जे आपल्या त्वचेला घट्ट करतात. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्यांचे प्रमाण कमी होते व त्वचा अधिक टवटवीत आणि तजेली दिसते.
➥ हा लेप चेहऱ्यावर लावल्याने तुम्ही त्वचेचे संक्रमण टाळू शकता, संसर्गाने होणारे त्वचा रोग टाळू शकतात.
➥ कडुनिंबाचा लेप निर्जलित किंवा कोरड्या त्वचेवर जास्त गुणकारी आणि सुखदायी राहतो.
➦ कडुनिंबातील अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असल्यामुळे आपल्या त्वचेचे जिवाणू पासून संरक्षण होते.
➥ या मुळे मुरुमं किंवा मुरुमांमुळे मागे राहिलेले डाग किंवा इतर डाग हलके होण्यास, वा निघून जाण्यास मदत होते.
➥ कडुलिंबाचा लेप चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचे पातळ होणे, सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होते.
➦ कडुनिंब जिवाणूच्या वाढीस प्रतिबंध करणारा आहे, दाहक-विरोधी आहे, त्यामुळे त्वचेची इतरही छोटे-मोठे विकार दूर होतात.
➥ कडुलिंबामुळे दाह कमी झाल्याने त्वचेस थंडावा मिळतो, त्वचेच्या संवेदन शीलतेवर (Sencetivity) उपचार करण्यासाठी कडुलिंब खूप फायदेशीर आहे.
➦ अनेक औषधी आणि उपचार गुणधर्म असलेली ही वनौषधी वनस्पती आहे.
➥ केसातील कोंडा दूर करतो, केस मजबूत करते.
➦ कडुनिंब शरीराला कर्करोग, मधुमेह, बद्धकोष्ठता आणि पेटके अशा अनेक रोगांपासून प्रतिबंधित करते.
➥ यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असल्यामुळे, हे संक्रमणा पासून दूर ठेवतो.
➦ हे सेप्टिक संसर्ग रोखून जखमा देखील बरे करते
➥ कडुलिंब खाल्ल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. श्वासाची दुर्गंधी दूर करते.
➥ त्वचे वरील चट्टे देखील कमी होतात.
➦ कडुलिंब तुम्हाला आतून निरोगी आणि बाहेरून चमकदार ठेवतो.

असंख्य उपगोग आणि फायदे तर कळले, आता आपण कडुलिंबाचा लेप कसा बनवायचा ते समजू घेऊ. कडुलिंबाचा लेप आपण वेगवेगळ्या उपायांसाठी वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो,चला पाहूया ते प्रकार.

|Relatee : Keep Coloured Clothes Shine | रंगीत कपडे चमकदार ठेवा… (Read more)

कडुलिंब आणि कोरफडचा लेप:

१. कडुलिंब आणि कोरफडचा लेप : हा लेप बनवण्यासाठी एक चमचा कडुलिंब पावडर आणि ताजे कोरफडीचे जेल घ्या. नंतर, एका भांड्यात हे दोन्ही साहित्य मिसळा आणि लेप चांगल्या प्रकारे एकत्र करा, त्यासाठी थोडं गुलाब पाणी, किंवा हे नसेल तर साधे पाणी घेऊन मिश्रण एकजीव करावे. बस झाला आपला कडुलिंबाचा लेप तयार. कोरफड आणि कडुलिंब दोन्ही बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आणि दाहक-विरोधी आहेत. ते तुमच्या त्वचेला तेज आणण्यासाठी, त्वचा स्पष्ट आणि चमकदार दिसण्यासाठी खरोखर उपयुक्त आहेत.

➥ कडुनिंबाचा लेप त्वचेलवर लक्षपूर्वक लावा. हा लेप त्वचेवर १५ मिनिटे सुकू द्या, नंतर त्वचेची मालिश करत थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धावून घ्या.
➥ हा कडुनिंब आणि कोरफडीचा तयार केलेला फेस पॅक त्वचेला नैसर्गिकरित्या तेजस्वी आणि डागमुक्त करण्यास तुम्हाला खूप मदत करेल.
➦ हे रक्तप्रवाहाचे नियमन करतो, ज्यामुळे मुरुमांपासून बचाव होतो आणि तुमचा चेहरा निर्दोष दिसू लागतो.

Neem Paste on Skin Good  Bad
Neem Paste on Skin Good/ Bad

कडुलिंबा आणि दहीचा लेप :

२. कडुलिंबा आणि दहीचा लेप :
हा लेप बनवण्यासाठी एक चमचा कडुलिंबाचा वर बनविलेला लेप आणि त्यात २ चमचे दही घ्या त्यानंतर सर्व घटक संपूर्ण मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. लेप चेहऱ्यावर पूर्णपणे सुकू द्या, त्यानंतर ते हलक्या हाताने मालिश करत गार पाण्याने चेहरा धुवून घ्या द्या.
➦ कडुलिंब आणि दही पासून बनविलेला हा लेप चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यास मदत करतो. उन्हाळ्यात किंवा गरम हवामानाच्या ठिकाणी हे जास्त असरदार असेल.

कडुलिंचा फेस टोनर :

३.कडुलिंचा फेस टोनर:
कडुलिंब तुमच्या त्वचेसाठी आश्चर्यकारक काम करते. तुम्ही ते तुमच्या चेहऱ्यावर टोनर म्हणून वापरू शकता. हे तुमच्या चेहऱ्यावरील जास्तीचे तेल आणि घाण साफ करण्यात मदत करेतो. तुमच्या त्वचेवरील छिद्र स्वच्छ करतो आणि त्वचेचा वातावरणाशी संबंध बांधतो. हा एक वनौषधीक उपचार आहे, जे तुमच्या त्वचेच्या सर्व गरजा पूर्ण करतो.

कडुलिंचा फेस टोनर कसे तयार करावे. एक पॅन घ्या आणि त्यात मूठभर कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून घ्या. तुमच्या गरजेनुसार पाणी घेऊ शकता. ते पाणी हिरवे होईपर्यंत उकळवा. त्यानंतर ते पाणी थंड होऊ द्या आणि नंतर तुम्ही ते पाणी गाळून बाटलीत साठवू शकता. हे कडू लिंबाच्या अर्क वाले पाणी फ्रिजमध्ये देखील ठेवू शकता. हा रस स्वच्छ आणि स्पष्ट दिसण्यासाठी दररोज तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावू शकता.

|Related : Try This To Keep White Clothes White | पांढरे कपडे पांढरे ठेवा.

कडुलिंब आणि हळदीचा लेप :

४. कडुलिंब आणि हळदीचा लेप
हा लेप बनविण्यासाठी कडुलिंबाची पाने आणि हळद पावडरची पेस्ट आणि त्यात थोडे गुलाबजल किंवा पाणी टाकून एकत्र वाटून, लेप तयार करा. तयार झालेला लेप, चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर हा फेस पॅक साधारण १५ मिनिटे तसाच चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा आणि स्वच्छ पुसून टाका.

➦ तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक परत आणण्यासाठी कडुलिंबाची पाने आणि हळद पावडरची पेस्ट घालून बनविलेला मास्क खूप गुणकारी आहे.

कडुलिंब आणि चंदनाचा फेस मास्क:

. कडुलिंब आणि चंदनाचा फेस मास्क
हा फेस मास्क बनविण्यासाठी कडुलिंब पावडर दोन चमचे आणि चंदन पावडर दोन चमचे घ्या आणि त्यात थोडे गुलाब पाणी टाकून व्यवस्थित मिसळून एक लेप तयार करा. तयार झालेला लेप, फेसपॅक म्हणून चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर हा फेस पॅक साधारण २० मिनिटे तसाच चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा आणि स्वच्छ पुसून टाका.

➦ कडुलिंब आणि चंदनाचा फेस मास्क तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक परत आणण्यासाठी मदत करेल.

मुरुमं आणि सफेद फोड्यांसाठी मास्क:

६. मुरुमं आणि सफेद फोड्यांसाठी मास्क:
चेहऱ्यावरील मुरुमं आणि सफेद फोड्यांसाठी त्रासदायक असतात आणि तुमचा चेहरा ही निस्तेज बनवतात. आता त्यांना निरोप देण्याची वेळ आली आहे. कारण आपल्याला मिळाला आहे एक रामबाण उपाय. कडुलिंब मोठ्या छिद्रांना आकुंचित करण्यात प्रभावी आहे आणि त्याच वेळी, ते आपल्या त्वचेवरील मृत त्वचा (exfoliates) काढून टाकते.

हे कसे बनवावे, गुळगुळीत पेस्ट बनवण्यासाठी तुम्हाला फक्त २ चमचे कडुलिंब पावडर घ्यावे त्यात थोडे पाणी मिसळावे. त्यात थोडे चिमूटभर हळद टाकून चेहरा आणि मानेला लावा. लेप सुमारे २० मिनिटे कोरडा होऊ द्या, त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, बस झाले. हे मेलेनिनचे प्रमाण कमी करते आणि असमान त्वचेच्या टोनवर देखील परिणाम कारक उपचार करते.

|Related : Hubble Space Telescope | हबल अवकाश दुर्बीण …. (Read More)

कडुलिंबाचा फेस मास्क :

७. चेहरा साफ करणारा (Cleanser) कडुलिंबाचा फेस मास्क
हे हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करते आणि तुमची त्वचा हायड्रेट करते. क्लींजिंग म्हणून कडुनिंबाचा फेस मास्क बनवण्यासाठी कडुनिंबाची सुमारे १०-१५ पाने घ्या आणि त्यांना पाण्या सोबत वाटून घ्या. तुमची त्वचा तेलकट असेल तर त्यात एक चमचा मुलतानी माती टाका, किंवा त्वचा कोरडी असेल तर एक चमचा मध घ्या. त्यात १ चमचा हळद पावडर घालून बारीक वाटून घ्या. पेस्ट चेहऱ्याला लावण्यापूर्वी चेहरा व्यवस्थित धुवून घ्या. साधारणतः २० मिनिटांनंतर, हा लेप थंड पाण्याने स्वच्छ धुवून टाका.

कडुनिंब आणि बेसन फेस मास्क:

८.कडुनिंब आणि बेसन फेस मास्क
बेसनही त्वचा उजळ करण्यासाठी आणि असमान त्वचेवर टोनवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. कडुलिंबासह, हा फेस मास्क तुम्हाला निर्दोष रंग देण्यास, अशुद्धता काढून टाकण्यास आणि आपली त्वचा पुन्हा तरुण बनविण्यात मदत करतो.

कडुनिंब आणि बेसन फेस मास्क कसे तयार करावे. एका वाडग्यात एक चमचा बेसन एक चमचा कडुनिंब पावडर घ्या. त्यात थोडं दही घालून नीट मिसळून घ्या. तयार झाला आपला फेस मास्क. पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुमारे १५-३० मिनिटे तशीच चेहऱ्यावर सुकू द्या. प्रभावी परिणामांसाठी हा लेप आठवड्यातून दोनदा वापरा. त्वचेवरील डाग काढून टाकण्यास याची खूप मदत होईल.

इतर माहिती:

भारतात कडुलिंब अनेक शतकांपासून विविध उपायांमध्ये वापर केल्याचे दाखले आढळतात. कडुलिंबाचे आरोग्य आणि सौंदर्याचे मुबलक फायदे आहेत. तुम्ही तुमच्या रोजच्या सकाळच्या रुटीनमध्ये एक कप कडुलिंबाचा चहा देखील जोडू शकता. हे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करेल आणि तुम्हाला तंदुरुस्त आणि तरुण राहण्यास मदत होईल.

चांगला परिणाम पाहण्यासाठी वरील पैकी एक लेप नयमीत वापरा. तुम्हाला फरक नक्की जाणवेल आणि तुम्ही बाजारातील महागडे केमिकल वाले फेस पॅक सोडून द्याल. तुमच्या त्वचेच्या अनेक समस्यांपासून नैसर्गिक रित्या सुटका मिळवण्यासाठी हे कडुलिंबाचे फेस पॅक वापरून पहा, जे तुम्ही घराच्या घरीच बनवू शकता.

कदाचित बाजारातील नामांकित कंपन्या अशाच प्रकारचे लेप बनवून हर्बलच्या नावा खाली अधिक किमतीने आपल्यालाच विकतात. ते घ्यायला आपण तयारच असतो, कारण आपल्या आपल्याच शास्त्राची आणि घरगुती वस्तूंची कदर नसते. असू द्या… मी अधिक बोलण्या पेक्षा, योग्य ते आपण जाणता. करून बघा, वापरून पहा आणि परिणाम पाहून योग्य तो निर्णय घ्या, धन्यवाद! आशा करतो आपल्याला सर्व प्रश्नाची उत्तर मिळाली असतील.

आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !

वेगळी माहिती :

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.

Is neem bad for skin? Can we apply neem paste on the skin? What happens if we apply neem paste on the face daily? Does neem make skin dark? hope you get the answer to these questions.

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x