Raje Ek Marathi Kavita | राजे

Raje Ek Marathi Kavita | राजे : शिवाजी महाराजांचे गुणगान, त्यांची वेक्तिरेखा, त्यांचे कार्य. शिवरायांमुळे घडलेला हा माझा महाराष्ट्र. याविषयीच वर्णन एकवितेत केलं आहे. शिवरायांची प्रेरणा घेऊन नवा महाराष्ट्र घडावा त्यासाठी आपणच प्रयन्त करावे, या कार्यासाठी आई भवानीचा आपणास आशिर्वाद मिळावा. जय भवानी जय शिवाजी.

Raje Ek Marathi Kavita | राजे :
भरजरी वस्त्रापरी विणलेले, चरित्र तुमचे दिव्यत्वाची खाण
शिवराया हो तुमच्यासाठी मावळे उभे हे घेउनी मशाल ||
राजस लोभस रूप गोजिरे, रत्न माणकांहुनी साजिरे
तिखट नजर तितकीच गहिरी, माया रयतेसाठी तीत भरे||
तुम्ही होतात म्हणून आमचं अस्तित्व, या महाराष्ट्राचं तुम्हीच सर्वस्व
तुमच्या स्मृतींनी उजळून जाईल, तरुणांचे हे अखंड जीवन
गडकिल्ले हे साक्ष देती, उज्ज्वल – यशस्वी इतिहासाची
तुमच्या पाऊली पावन झाली, माती ही या दुर्गांवरची
कित्येक लढाया अन वादळे, अंगावर झेलती दुर्ग जरी
न डळमळे तरी कधीही, अभेद्य असे बुरुज-तटबंदी ||
तुमच्या आठवणी जपण्याचा, घेतला वसा हा दुर्गसंवर्धनाचा
शौर्याच्या रक्तरंजित गाथांचा, जागर होवो पुनः पुन्हां ||
उठा मावळे पुन्हा करा रे, शिवगर्जना ती दुमदुमणारी
निधड्या छातीवर पेलती, अस्मानीची वादळे सारी
पुन्हा सळसळूदे रक्त धमण्यांत, तेज तुझे आसमंत झाकोळू दे
संकल्प पूर्णत्वास नेण्यास, आई जगदंबे आशिर्वाद दे…
आई जगदंबे आशिर्वाद दे
जय भवानी जय शिवाजी !
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
- Desh Bhakti Poem| Swatantra Vir Savarkar - January 26, 2023
- Marathi Poem in Marathi – Ti Bhet | ती भेट मराठी कविता - November 4, 2022
- Marathi Short Poems on life | मराठी कविता जा घेऊन जा - July 24, 2021