Ekati Rahu De Mala | एकटी राहू दे आज मला

एकटी राहू दे आज मला : Marathi poem :
एकटी राहू दे आज मला
एकटी राहू दे आज मला
हवीत कशाला ही नाती आजूबाजूला
नकोत कोणतेही बंधन मला
घेऊ दे एक मोकळा श्वास मला.
नाही बोलावसं वाटतं आज मला
माझ्या प्रत्येक हालचालीची खबर
हवीय कशाला तुम्हाला.
एकटी राहू दे आज मला.
कळत नकळत अनेक बंधनात
उगीच मन माझा गुंतला
या गुंतलेल्या जाळ्यातून
राहू दे ना पाय माझा मोकळा
का हवी कुठल्याही नात्याला
एका नात्याची जोड
समाज काय म्हणेल यासाठी
माणसांचे नेहमीच तडजोड.
भीती नाही एकटेपणाची
पण माणसांची भीती वाटते
आयुष्यात येणार दूर न जावे
ही इच्छा मात्र दाटते.
आयुष्यात येणारा प्रत्येक जण
आपली ठराविक वेळ घेऊन येतो
मग का बर आपण त्या व्यक्तीकडून
आपल्या अपेक्षा ठेवतो.
नको या इच्छा या अपेक्षा
या साऱ्यांचे ओझेसे वाटते
मन करून हलके
चालूया आपले मोकळे रस्ते.
आयुष्याच्या झोक्यावर
मुक्त झूलायचं आहे रे मला
नको कोणी सोबती
एकटी राहू दे आज मला.
—–. ➥ अंकिता सोनटक्के
Bharat Bhumi Mazi | भारत भूमी माझी | Patriotic Poem
Marathi Prem Kavita-3 | Love Poem In Marathi | मराठी प्रेम कविता
You can find this poem with these titles like marathi poems, marathi balgeet, marathi kavita, marathi songs, marathi poetry, marathi kavya, best marathi poem, marathi poem video, poems in marathi.
इतर माहिती :
For Credit Card Apply here:
अधिक आकर्षक लेखांसाठी आमचे अनुसरण करा आणि जग एक्सप्लोर करण्यासाठी कनेक्ट रहा मराठी रंग सोबत. चला संवाद आणि समजूतदार पणाची शक्ती स्वीकारूया.
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.
➥ Learn What is credit card – Infolips.
- Ekati Rahu De Mala | एकटी राहू दे आज मला| Best Marathi Poem - April 1, 2025
- Maitri – A Friendship Poem in Marathi | मैत्री - March 22, 2025
- Patriotic Poems in Marathi | देशभक्तिपर कविता मराठी-२०२१ - August 14, 2021