Benefits of Onion Peel | कांद्याची साल फेकून देऊ नका
Benefits of Onion Peel | कांद्याची साल फेकून देऊ नका: नमस्कार मित्रांनो आज आपण एका वेगळ्याच विषयावर बोलणार आहोत. कांद्याची साल, अजिब वाटलं असेल ना, पण हे खरं आहे. कांद्याच्या सालीचाही उपयुक्त उपयोग होऊ शकतो, यावर विश्वास वाटत नाही ना. चला तर आपण याविषयी जरा जास्त माहिती घेऊ. म्हणजे पुढच्या वेळी कांद्याची साल फेकून द्यायची की नाही याचा विचार करू.
आपण कदाचित “रूट-टू-स्टेम” शिजवणे याबद्दल ऐकले असेल, यामध्ये भाजीचा कोणताही भाग वाया घालवत नाहीत. आपण हे करत नाही, पण खरेतर, आपल्या आजी-आजोबांच्या काळात. भाजीचा कोणताही भाग फेकून देत नसत, सर्व काही वापरले जात असे. निसर्गात वनस्पती स्थिर असतात, इतर प्राण्यांप्रमाणे त्या हालचाल करू शकत नाहीत. निसर्गाने प्रत्येक जीवास स्वतःचे रक्षण करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी आणि स्वतःला बरे करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी प्रदान केल्या आहेत. त्यामुळे असे समजते की वनस्पती त्यांचे अनेक संरक्षणात्मक गुणधर्म हे बाह्य आवरणांमध्ये केंद्रित करतात, जसे झाडाची साल, फळांची साल. पर्यावरणातील बहुतेक जंतूंची आक्रमणे ही बाहेरूनच होतात, त्यापासून वाचण्यासाठी, नक्कीच सालींमधे अधिक गुणधर्म बनवून ठेवतात.
कांद्याच्या सालीचे फायदे:
कांदा हा भारतात जवळपास घरांमध्ये पाहायला मिळतो. भारतीय जेवणात कांदा एक महत्वाचा आणि आवश्यक घटक आहे. कांदा बऱ्याच प्रकारच्या वस्तू बनविण्या साठी आपण वापरतो, पण कांद्याचा आतील भाग. कांद्याची साल तर फेकून दिली जाते, हीच कचरा मानली जाणारी साल प्रत्यक्षात मात्र अनेक प्रकारे उपयोगात आणली जाऊ शकते. सध्याच्या काळात, लोकांमध्ये शून्य कचरा कुकिंग या संकल्पनेची जाणीव होत आहे आणि ते प्रत्यक्षात अमलातही आणत आहेत. याच संकल्पनेतून कांद्याच्या सालीचे फायदे काय असू शकतात, हे प्रकाशात आले आहे. बऱ्याच भाज्यांच्या सालींचे फायदे आहेत, कदाचित तुम्ही ते वाचलेही असेल. पण कांद्याच्या सालीचे काय? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ते खरोखर कांद्याच्या सालीत दाट पौष्टिकता आहे आणि त्यांचे अनेक घरगुती उपयोग देखील आहेत. चला तर जाणून घेऊया.कांद्याच्या सालीचे फायदे.
|Relatee : Keep Coloured Clothes Shine | रंगीत कपडे चमकदार ठेवा… (Read more)
१. कांद्याच्या सालीचा चहा :
ज्या लोकांना चहा पिण्याची सवय आहे त्यांनी, चहा मध्ये कांद्याची साली टाकून तयार केले आहे. कांद्याच्या साली टाकून बनवलेल्या चहामध्ये कमी कॅलरीज असतात. जास्त-कॅलरी असलेल्या वातीय शीतपेयांच्या (Aerated Beverages) तुलनेत कांद्याच्या सालीचा चहा जास्त फायदेशीर आहे.
२. पौष्टिक भात
भातात अतिरिक्त जीवनसत्त्वे जोडण्यासाठी तांदूळ शिजवताना काही कांद्याच्या साली मिसळा. तांदूळ शिजत असताना साली पूर्णपणे पाण्यात भिजल्यात की नाही याची खात्री करा. शिजवल्यानंतर साली काढून फेकून द्या.
३. स्नायू पेटक्यांपासून आराम
कांद्याची साल स्वच्छ धून घ्या, १०-२० मिनिटे पाण्यात उकळवा, त्यातील पूर्ण अर्क, पाण्यात आल्यावर. पाण्यातील साली काढून टाका आणि झोपायच्या आधी चहाच्या रूपात हे पाणी प्या. जेणेकरून स्नायूंच्या क्रॅम्प पासून आराम मिळेल.
४. केसांचा रंग
कांद्याची साल केसांचा एक उत्तम रंगही बनू शकते, यामुळे ते सुंदर सोनेरी तपकिरी होते. फक्त एका भांड्यात कांद्याची साल घाला आणि ३०-६० मिनिटे उकळा. रात्रभर थंड होऊ द्या, नंतर ते पाणी केसांवर घाला, ३० मिनिटे केस असेच सुकू द्या, त्यानंतर स्वच्छ धुवून काढा. केसांवर सोनेरी तपकिरी चढलेला दिसेल.
कांद्याची सालीतील गुण :
या सालिमध्ये अनेक पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत आहे. यामध्ये “व्हिटॅमिन ए” असते, जे डोळ्यांसाठी खूप चांगले असते. यामध्ये “व्हिटॅमिन सी” आणि “व्हिटॅमिन ई” देखील असतात ज्याचा उपयोग त्वचेच्या उपचारांसाठी केला जाऊ शकतो.
कांद्याच्या सालीचा चहा तुमच्या त्वचेला खाज सुटण्याची किंवा पुरळ येण्याच्या समस्ये पासून सुटका करू शकतो, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. कारण त्यात कडुलिंबा प्रमाणे अँटीफंगल गुणधर्म आहेत. कांद्याच्या सालीचा चहा त्वचेच्या समस्यांवर एक उत्तम उपाय असू शकते.
उच्च कोलेस्टेरॉलचा त्रास होत असल्यास कांद्याची साल तुमच्यासाठी उत्तम औषध ठरू शकतो. कांद्याच्या सालीत “फ्लेव्होनॉइड्स” आणि “पॉलिफेनॉलिक” ही संयुगे आहेत. अभ्यासकांच्या अनुमानानुसार ही संयुगे कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यास मदत करतात. एक नैसर्गिक झोप येण्यासाठी मदत होते.
एका अभ्यासानुसार, लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा गंभीर धोका असतो. या खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात “फ्लेव्होनॉइड” प्रमुख भूमिका निभावतो, तसेच हे फ्लेव्होनॉइडचा चांगल्या कोलेस्टेरॉलच्या पातळीवर काही परिणाम करत नाही.
कांद्याच्या कातड्यामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म देखील असतात जे सर्दी, खोकला आणि फ्लूची लक्षणे दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे हंगामी संसर्गाचा धोका कमी होतो.
(अस्वीकरण: या लेखात नमूद केलेल्या आरोग्य विषयीच्या टिप्स सामान्य पद्धती आणि सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. वाचकांना सल्ला दिला जातो की त्यांनी घरी अनुकरणात आणण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला जर आधीच त्वचेचे विकार असतील आणि डॉक्टरांनी दिलेले औषध घेत असाल तर, तर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य तो निर्णय घ्यावा)
आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
वेगळी माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड
कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.
अशा आहे पुढील प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. Benefits of onion peel tea, benefits of onion peel for hair. What are the benefits of onion peel water for hair, and the benefits of onion peel water for plants? What do onion peel fertilizer, and onion skin tea side effects? How to use onion skin, is onion skin poisonous? I hope you get the answers to all these questions.
- Gudi Padwa Wishes in Marathi 2023 - March 21, 2023
- World Most 7 No Fly Zone Places | नो फ्लाय झोनची ठिकाणे - December 25, 2022
- What Commerce Students can do after 12| Best Options - December 24, 2022