Marathi Prem Kavita Love | तू माझी प्रेम कविता | Love poem

Marathi Prem Kavita Love| Love poem in Marathi: तू माझी प्रेम कविता (Tu Mazi Prem Kavita – By Marathi Rang) : नमस्कार मित्रांनो आज आपण या “तू माझी प्रेम कविता” ही कविता वाचणार आहोत. कवीच्या मनात प्रेयसी विषयी असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. त्याच्यासाठी त्याची प्रेयसी हेच सर्वकाही आहे आणि तो तिच्यातच सर्व शोधात आहे. त्याचे सारे विश्व ही त्याची प्रेयसी आहे आणि त्याच विश्वाचा तो एक छोटा भाग आहे.

हेच वर्णन या कवितेतून दिसत आहे. वाचा तुम्हालाही आवडेल. धन्यवाद !

Marathi Prem Kavita Love

Marathi Prem Kavita | Love poem in Marathi: तू माझी प्रेम कविता (By Marathi Rang) :

|| तू माझी प्रेम कविता ||

तू माझी प्रेम कविता, मी तुझ्या कवितेचा शब्द
तू माझी प्रेम मूर्ती, मी तुझ्या मूर्तीत स्तब्ध ।। धृ ।।

कधी कसे काही ना कळले मला
असा कसा तुझ्यात मी गुंतलो
प्रेमाचे रंग कधीना कळले मला
असा कसा प्रेमात मी रंगलो
तू माझे प्रेम चित्र, मी तुझ्या चित्रातील रंग,
तू माझे प्रेम गाणे, मी तुझ्या गाण्यात दंग ।। १ ।।

तुझी ओढ, तुझा हा नाद मला
कसा कुणा ठाऊक लागला
तुझी आस, तुझा हा ध्यास मला
कधी कसा हृदयास लागला
तू माझी प्रेम भावना, मी तुझ्या भावनेत बंद
तू माझे प्रेम सुगंध, मी तुझ्या सुगंधात धुंद ।। २ ।।

निळ्या भोर संथ ह्या पाण्यात
अशा कशा लाटा उसळल्या
कूजबूज सुरु झालीय मनात
कशा तू ह्या तारा छेडिल्या
तू माझे प्रेम नभ, मी तुझ्या नभातील तारा
तू माझे प्रेम पाऊस, मी तुझ्या पावसाच्या धारा ।। ३ ।।

|Related: माझी मन मीत तू: Mazi Man Meet Tu (Read more…)

अधिक कविता :

➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x