What is Stock Market in Marathi | शेअर बाजार म्हणजे काय
Table of Contents :
What is Stock Market in Marathi | शेअर बाजार म्हणजे काय
शेअर मार्केट अभ्यास
नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात शेअर मार्केट/ स्टॉक मार्केटची मूलभूत (Basic) माहित घेणार आहोत. या माहितीमुळे तुमच्या मनातील अनेक समाज/ गैरसमज दूर होण्यास मदत होईल. सहारे मार्केट विषयी तुमच्या मनात उद्भवणाऱ्या जवळपास सर्वच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखाद्वारे मिळतील, किंबहुना ते देण्याचा प्रयत्न केला आहे. Share Market Information in Marathi. Lets learn what is Stock Market ?
शेअर मार्केटच्या माध्यमातून एक सामान्य माणूसही अगदी लाखो रुपयाची कमाई करू शकतो. हो जर व्यव्यस्थित माहित घेतली आणि त्याप्रमाणे गुंतवणूक केली तर हे सहज शक्य आहे. आपल्याकडे अजूनही शेअर मार्केट हा एक जुगार वाटतो, त्यांनी हा लेख जरूर वाचावा. आशा करतो त्यांचे मत नक्की बदलेल. चला तर आपण आजच्या लेखाला सुरवात करू या.
What is insurance in Marathi | विमा म्हणजे काय ? …… Read More…
आपण हा लेख प्रश्न-उत्तराच्या स्वरूपात वाचू या : What is Stock Market ?
१) शेअर मार्केट मध्ये कोण गुंतवणूक करू शकतो.
➠ तर गुंतवणूक म्हटली म्हणजे पुढच्या आयुष्यात उपयोगी यावे म्हणून आज केलेली तरतूद होय. पण आपल्या पैकी असे बरेच जण असतात की जे उद्याची चिंता ना करता आपली महिनाभराची सर्व कमाई खर्च करत असतात. पण बरेच जण असे आहेत जे उद्याची तरतूद करता यावी म्हणून आपल्या कमाईतील काही रक्कम खर्च करूनही, ठराविक रक्कमेची बचत करतात. मग ही बचत, FD मध्ये असेल, विम्या मध्ये असेल, शेअर मार्केट मध्ये असेल किंवा इतर अन्य सेविंग स्कीम मध्ये असेल. यावरून यावरून असे समजतेकी जो माणूस पैसे बचत करु शकतो तो शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकतो. फरक फक्त एकच आहे की शेअर मार्केट इतर पर्यायांपेक्षा अधिक जास्त रिस्की असल्याने १००% गुंतवणूक यात न करता आपापली जोखीम लक्षात घेऊन आणि व्यवस्तीत अभ्यास करूनच करावी, अन्यथा FD आणि विमाच बारा.
२) शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक किती रुपया पासून करू शकतो ?
माझ्या मते प्रत्येक माणसाने शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक ही केलीच पाहिजे. कारण शेअर मार्केट मध्ये आपण अगदी १०० रुपया पासूनही सुरुवात करू शकतो, गुंतवणुकी वर कोणतेही बंधन नाही. येथील योग्य गुंतवणुक इतर सर्व गुंतवणुकी पेक्षा जास्त खूप अधिक पटीने रिटर्न देणारी असेल.
३) शेअर मार्केट वर नियंत्रण कोणाचे असते ?
➠ आपल्या देशात शेअर मार्केट वर नियंत्रणाचे काम Bombay Stock Exchange (BSE) आणि National Stock Exchange (NSE) यांचे असते. या एक्सचेंज वर ज्या कंपन्या रजिस्टर्ड असतात त्याच कंपनीजचे शेअर्स आपण खरेदी वा विक्री करू शकतो. दोन्ही एक्सचेंज वर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्याचे कार्य Securities and Exchange Board of India (SEBI) करते.
Buy car insurance online | कार विमा म्हणजे काय ? —– Read more.
४) एक्सचेंज वर कंपनीज रजिस्टर्ड का होतात ?
➠ समजा एखादी “अ” कंपनी आहे. तिचा व्यवसाय ही छान चालला आहे. पण इतर स्पर्धक कंपनीज मुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणात घेऊन जावे लागणार. नाही तर कंपनीला कमी प्रॉफिट किंवा कदाचित तोटा ही सहन करावा लागेल. अशा वेळेस कंपनीला मोठया स्केलवर नेण्यासाठी खूप मोठ्या भांडवलाची गरज लागेल (साधारण ५०० कोटी). इतकी मोठी पैशाची तरतूद कंपनी करू शकत नसेल तर त्या कंपन्या BSE/ NSE कडे रजिस्टर्ड करतात. एक्सचेंजच्या परवानगीनेच कंपनी स्वतःचे IPO लाँच करतात.
५) IPO म्हणजे काय ?
➠ IPO म्हणजे Initial Public Offering (IPO). वरील उदाहरणातील कंपनी ५०० कोटी रुपयाचे ५ कोटी शेअर विक्रीस काढते ज्याची किंमत १०० रुपये प्रति शेअर असेल. अश्या IPO चे शेअर घेण्यासाठी बरेच लोक बोली लावतात. जर ५ कोटी शेअर्स पेक्षा जास्तीची बोली असेल तर लॉटरी सिस्टिम नुसार शेअर्सचे वितरण होते. ज्यांना शेअरचे ऑलॉटमेंट झाली नसेल त्या लोकांचे पैसे एक्सचेंज परत करते आणि जमा झालेली ५०० कोटी रुपये “अ” कंपनीला देते. कंपनी आलेला पैसा कंपनीच्या एक्सपांशन साठी वापरते.
त्यानंतर ती कंपनी एक्सचेंजवर लिस्ट होते आणि मग आपण कंपनीचे शेअर (भाग) खरेदी किंवा विक्री करू शकतो.
६) भाग धारकाचा फायदा काय ?
कंपनीला तर पैसे मिळाले, कंपनीचे काम चालू झाले. ज्यांनी शेअर विकत घेतले आहेत त्यांचा फायदा काय. तर जसे कंपनीची प्रोग्रेस होईल, कंपनीचा सेल्स वाढेल तसा कंपनीचा फायदा होईल. जसा कंपनीचा फायदा होईल, तसा कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढते, आणि तुम्ही १०० रुपयाचा घेतलेला शेअर थोड्याच महिन्यात २०० रुपये चा होतो. हा आपला फायदा असतो. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही शेअर विकून आपला प्रॉफिट काढून घेऊ शकता. तुमच्या मते कंपनी जर पुढेही चांगला परफॉर्मन्स राहणार आहे असे वाटत असेल तर, शेअर पुढे कंटिन्यू करू शकता. आणि जर तसे वाटत नसेल तर शेअर विकून, दुसरा चांगला वाटणारा शेअर विकत घेऊ शकता.
म्हणजेच कंपनीच्या परफॉर्मन्स या वरून कंपनीच्या शेअरची किंमत ठरत असते. यावरून आपल्याला असे लक्षात आले असेल की शेअर मार्केट हा जुगार नसून वास्तविक परिस्थिती आणि होणाऱ्या घडामोडी यावर अवलंबून असते. एखाद्या कंपनीला जर अधिक फायदा झाला तर त्या आपल्या शेअर होल्डर्सना डिविडेंड स्वरूपात अधिक पैसे देतात. तसेच काही कंपनी बोनस स्वरूपात अधिक शेअरही देतात. अश्या प्रकारे शेअर मार्केट मध्ये बरेच फायदेही होतात.
आता पर्यंत आपणास शेअर मार्केट आणि त्याचे स्वरूप काय आहे याचा अंदाज आला असेल. अजून पुढे पाहूया. आज आपण शेअर मार्केटची पूर्ण रूपरेखा समजूनच घेऊया.
Flipkart Axis Credit Card | फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड … Read more
७) ट्रेडिंग कशाला म्हणतात ?
➠ जेव्हा आपण एखाद्या कंपनीचे शेअर विकत घेतो, तेंव्हा ०.००१% का होईना आपण त्या कंपनीचे हिस्सेदार बनतो. त्या कंपनीचे काही अंशी मालक बनतो. कंपनीला नफा झाल्यास आपल्याला फायदा होतो, कंपनीला तोटा झाल्यास आपल्याला तोटा होतो. म्हणून नफा होणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करायचा आणि तोटा होणाऱ्या कंपनीचाच शेअर विकायचा. शेअर्स च्या खरेदी विक्रीच्या या व्यवहारालाच ट्रेडिंग असे म्हणतात. शेअर मार्केट म्हटलं म्हणजे आपल्या सर्वाना “Treding” हाच शब्द जास्त प्रचलित आहे.
८) ट्रेडिंगचे प्रकार किती ?
अ) Intraday Treding : एखादा शेअर आज सकाळी ९:३० वा. खरेदी करून त्याच दिवशी दुपारी ३:३० वा. विक्री करतो त्याला इंट्राडे ट्रेडिंग असे म्हणतात. शेअर मधील हा प्रकार सर्वात जास्त रिस्की असतो. कारण एखाद्या चांगल्या कंपनीचा शेअर बाजारातील न्युज मुळे खूप वरही जाऊ शकतो, तर तो खालीही येऊ शकतो. म्हणून या प्रकारात आपल्याला लगेच फायदाही होतो तर कधी तोटाही होतो. लगेच फायदा मिळविण्याच्या आशेत बरेच लोक इंट्राडे ट्रेडिंग करतात.
आ) Short Term Trading/ Swing Trading (शॉर्ट टर्म ट्रेडिंग) : एखादा शेअर आज खरेदी करायचा आणि तो काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी विक्री करतो त्याला शॉर्ट टर्म ट्रेडिंग असे म्हणतात. शेअर मधील हा प्रकार कमी रिस्की आहे. चांगल्या कंपनीची निवड असेल तर या प्रकारात ९०% फायदाच होतो.
इ) Long Term Trading (लॉन्ग टर्म ट्रेडिंग) : एखादा शेअर आज खरेदी करायचा आणि तो सहा महिने, किंवा त्या पेक्षा अधिक महिन्यांनी विक्री करतो त्याला लॉन्ग टर्म ट्रेडिंग असे म्हणतात. बरच मोठे शेअर मार्केटचा व्यवहार करणारे काही काही शेअर २०-२० वर्ष विकत नाहीत. शेअर मधील हा प्रकार सर्वात खात्रीशीर प्रकार आहे, तसेच येथील रिस्क खूप कमी रहाते. चांगल्या कंपनीची निवड असेल तर या प्रकारात १००% फायदाच होतोच होतो. याच प्रकारात आपल्याला डिविडेंड, बोनस शेअर, कंपाऊंडिंग इंटरेस्ट अश्या गोष्टींचा अधिक फायदा घेता येतो.
९) शेअर्सचे प्रकार किती आहेत ?
शेअर्सचे प्रकार हे त्यांच्या ऑफर्स वरून ठरवता येतील.
अ) सामान्य भाग (Common Shares) : जे शेअर ट्रेडिंग मार्फत खरेदी-विक्री करू शकतो, अशा शरेस ना सामान्य भाग असे म्हणतात.
आ) बोनस शेअर (Bonus Shares) : एखाद्या कंपनीला चांगला नफा झाल्यास, त्यातील काही हिस्सा आपल्या भागधारकांना डिविडेंड स्वरूपात ना देता, जर शेअर्स च्या बदल्यात अधिक शेअर्स दिले जातात त्याला Bonus Shares असे म्हणतात.
इ) प्रेफेर्ड शेअर्स (Preferred Shares) : जेव्हा एखाद्या लिस्टेड कंपनीला अधिक पैशांची आवश्यकता असेल, आणि मार्केटमधून काही पैसे उभे करायचे असतील, तेव्हा हि कंपनी काही विशिष्ट वित्त संस्थांना किंवा विशिष्ट्य लोकांना नवीन शेअर्स खरेदी करण्याचा प्रथम अधिकार देते. अश्या शेअर्सना प्रेफेर्ड शेअर्स असे म्हणतात. हे शेअर्स खूप सुरक्षित मानले जातात.
जर ही सर्व माहिती वाचून शेअर्स म्हणजे काय ते समजले, ते घेण्याची इच्छाही झाली असेल तर चला पाहूया शेअर्स विकत घेण्यासाठी काय करावं लागतं.
१०) शेअर्सची खरेदी-विक्री कशी करावी :
शेअर्सची खरेदी-विक्री पूर्वी कागदपत्र द्वारे व्हायची आणि ही पद्धत खूप किचकट, गुंतागुंतीची आई अवघा वाटायची, म्हणूनच बरेचजण यापासून लांबच राहायचे. तसेच अकाउंट ओपनिंग चार्जेस, ब्रोकरेज खूप जास्त असल्याने ते खर्चिकही वाटायचे. पण आता हे खूप सोपं आणि स्वस्त झाले आहे, त्या मुळे आपण स्वतःला नशीबवान समजलं पाहिजे. मोबाइलला, लॅपटॉप किंवा कॉम्पुटर च्या साहाय्याने ही प्रोसेस घरबसल्या करता येण्या इतकं सोपं झालाय.
शेअर्स खरेदी-विक्री करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची आवशक्यता असते. १) डिमॅट अकाउंट (Demat Account) २) ट्रेडिंग अकाउंट (Tranding Account). ज्याप्रमाणे बँकेत पैसे ठेवण्यासाठी बँक अकाउंट लागतं, तसे एक्सचेंज मध्ये शेअर्स साठवून ठेवण्यासाठी आपल्याला डिमॅट अकाउंट लागतं. हे अकाउंट ब्रोकर द्वारे ओपन करता येते. तसेच ट्रेडिंग अकाउंट द्वारे शेअर्सची खरेदी विक्री करता येते.
ब्रोकेरची निवड खूप माहिती घेऊन काळजी पूर्वक करावी. डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी किती पैसे लागतात, वार्षिक फी किती आहे, आणि तुम्ही जे ट्रांसकशन करणार आहेत त्यावर त्यांचे किती कमिशन आहे. याची सविस्तर माहिती घेऊनच अकाउंट ओपन करा. ब्रोकेरची निवड याविषयीची सविस्तर माहिती आम्ही पुढील लेखात देणार आहोत.
मला जर विचारलं, तर सांगेन कि मी स्वतः Zerodha चे अकाउंट वापरतो. ज्याचे चार्जेस खूप कमी आहेत आणि सर्विस खूपच चांगली आहे. भारतातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला हा ब्रोकर आहे. (येथे क्लिक करून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता).
चला तर आता सेनसेक्स आणि निफ्टी म्हणजे काय ते समजून घेऊ.
११) सेनसेक्स, निफ्टी म्हणजे काय ?.
What is Sensex and Nifty ?
सुरवातीलाच आपण BSE आणि NSE हे पहिले. BSE मध्ये ५००० हुन अधिक कंपनीज आहेत. यापैकी टॉप ३० कंपनीज, ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत. याचे दर ६ महिन्यातून सर्वेक्षण करून त्यांची निवड केली जाते. कंपनीची निवड करताना त्यांचे मार्केट कॅपिटल, त्यांची मागील ६ महिन्याची ग्रोथ, सेल्स, खर्च आणि प्रॉफिट अश्या वेगवेगळ्या फॅक्टर्सचा विचार केला जातो. या तत्वावरून परफॉर्मन्स न करणारी कंपनी बाहेर जाते आणि चांगले परफॉर्मन्स न करणारी कंपनीची निवड होते. या टॉप ३० कंपनीजच्या ग्रुपला सेनसेक्स (Sensex) म्हणतात. थोडक्यात या ३० कंपनीज वरून ठरविले जाते की मार्केट तेजीत आहे की मंदीत आहे. मार्केटच्या चढ-उताराचे इंडिकेश मिळते म्हणून याला Index / Indices असेही म्हणतात.
NSE मध्ये १५०० हुन अधिक कंपनीज आहेत.
NSE मध्ये १६०० हुन अधिक कंपनीज आहेत. यापैकी टॉप ५० कंपनीज, ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत. या टॉप ५० कंपनीजच्या ग्रुपला निफ्टी (NIFTY) म्हणतात.
Amazon Pay ICICI Bank Credit Card |ऍमेझॉन पे ICICI कार्ड. Read More…
१२) शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्ट का करावी ?
Why should invest in Share Market/ Stock Market :
सध्याची स्थिती लक्षात घेता बँकेत FD चा व्याज ६% – ७% मळते.
बँकांच्या इतर स्कीम मध्येही साधारण इतकेच रिटर्न्स मिळतात.
अश्या परिस्थितीत स्टॉक मार्केट एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. फरक फक्त एकच आहे, येथे अभयास करून माहिती घेऊन योग्य शेअरची निवड करावी लागते, मार्केटची माहिती घ्यावी लागते, स्वतःवर विश्वास ठेवून योग्य तो निर्णय घ्यावा.
सुरुवात छोट्या अमाऊंट पासून करा, मार्केटचा अभ्यास करा. रोज-रोज शिकत रहा, मार्केटचा अंदाज घ्या. ऑबसेर्व्हशन असू द्या. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.
सांगता :
संपूर्ण माहिती शोधण्यासाठी आणि त्यास योग्य पद्धतीने आपल्या भाषेत रूपांतरित करण्यासाठी बरीच परिश्रमांची आवश्यकता लागते. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे.
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला दिलेली शेअर बाजार विषयीची माहिती, Share Market Information in Marathi आवडली असेल. जर आपण या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील कमेंटमध्ये सांगा. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स