Beat The Summer Heat | उन्हाशी लढण्यासाठी या गोष्टी करा

Beat The Summer Heat | उन्हाशी लढण्यासाठी या गोष्टी करा

Beat the Summer Heat दरवर्षी भारतात उष्णतेचा पारा वाढतच आहे. एप्रिल, मे आणि जून या महिन्यात तापमान सर्वात जास्त असते. मार्च महिना संपता-संपताच उन्हाळ्याचा कडाका जाणवू लागतो. देशाच्या पश्चिम भागात तर तापमान ४१ अंश सेल्सिअस हुन वर जातो. काही ठिकाणी तर हे प्रमाण ४३ अंश सेल्सिअस हुन वर जातो. असे मानले की या उन्हाळ्यात उत्तर आणि पश्चिम भारत उष्णतेच्या लाटेचा सामना करनार आहे. वातावरणातील तापमानाचा वाढणारा हा प्रकोप, केवळ दोनच गोष्टी करू शकतात. ते म्हणजे झाडे लावा, झाडे जगावा आणि पाणी आडवा पाणी जिरवा.

असो, आज आपण याविषयावर चर्चा करणार नाही, तर या उन्हाळ्याच्या लाटेशी लढण्यासाठी आपण घरच्या घरी काय करू शकतो. उन्ह्याळात काय केलं तर उन्हाचा दाह कमी होईल. मराठीरंगच्या “आरोग्य” या सदरात आपण याच गोष्टी समजून घेणार आहोत. चला तर वाचूया “उन्हाशी लढण्यासाठी काय करावे”.

खूप उष्ण तापमानात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागत. अशा वेळी, स्वतःला नेहमी हायड्रेट ठेवणे आवश्यक असते. म्हणजे जास्त पाणी पिणे किंवा ज्या वास्तूत पाण्याचे प्रमाण जास्त आहे अशा वस्तू खाणे आणि योग्य आहार करणे महत्त्वाचे असते.

बाहेरील उष्णतेचा सामना करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील ७ खाद्यपदार्थ समाविष्ट करावेत.

|Related : Neem Paste on Skin Good/ Bad| कडुलिंबाचा लेप चांगला/ वाईट (Read More)

१) काकडी :

हे निश्चितपणे “कोशिंबीर” (सलाड फूड) हुन अधिक आहे. काकडी मध्य पाण्याचे प्रमाण खूप असते, म्हणून काकडी ही एक हायड्रेटिंग भाज्यांपैकी एक मानली जाते.
ह्या नम्र काकडी मुळे केवळ तुमच्या शरीराला हायड्रेशनच मिळते असे नाही तर, यातून पोषक तत्त्वही मिळतात. जसे जीवनसत्व “अ” , जीवनसत्व ‘क” आणि जीवनसत्व “के” मिळते. याच सोबत यात बरीच खाणीज असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढून आपल्याला तजेलदार वाटतं.

२) तमाटी : (टोमॅटो) :

भारतातील बहुतांश भागात टमाटे हे आहारात असतेच, तुम्हाला हे माहीत असेलच. कारण ते एक मुख्य उष्णता विध्वंसक आहे.
टोमॅटो मध्ये ९५% पर्यंत पाण्याचे प्रमाण असते, त्यामुळे हे आपल्या शरीराला उत्तम हायड्रेट करतात. यात भरपूर प्रमाणात लाइकोपीन आणि व्हिटॅमिन “सी” असते. तसेच हे दाहक-विरोधी आल्यामुळे, आपल्या शरीरातील उष्माता कमी करण्यास मदत करतात. टमाटे अँटिऑक्सिडेंट असते, म्हणून यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

३) लिंबू:

बहुगुणी आणि उपयुक्त लिंबू-सरबत हे कोणत्याही ऋतूत चांगलंच असत, यात कोणासही शंका नसावी. सर्व काळात हे एक सर्वोत्तम पेय आहे. उन्हाळ्यात हे केवळ तुमच्या शरीराला थंड ठेवण्यास मदत करत नाही, तर अन्न पचवण्यास आणि चयापचय प्रक्रिया गतिशील करण्यास देखील हे मदत करते. लिंबू मध्ये जीवनसत्व “क” (सी) तसेच बरेच खनिजे असतात याचा फायदा आपल्या शरीराला होतो.

|Related: What Happens If Eat Ginger | काय होईल जर रोज आलं खाल्लं

४) कलिंगड व तत्सम फळे :

उन्हाळा म्हणजे कलिंगड हे आवर्जून आठवले जाते. यात खरबूज आणि टरबूज ही समाविष्ट आहे. खूप साऱ्या पोषक तत्वांनी हे परिपूर्ण असते. भरपूर पाण्याचे प्रमाण असलेले हे फळ तुम्हाला जास्त काळ हायड्रेट ठेवते. तुमचे शरीर थंड ठेवण्यास आणि पचनास मदत करते. पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम आणि कॅल्शियम इत्यादी खनिजे कलिंगड व त्यासारख्य फळांमध्ये असतात.

५) दही :

खास करून उन्हाळ्यात आपल्या आहारात ज्याला सहजपणे समाविष्ट करून घेतो, तो म्हणजे दही. एकी सर्वोत्कृष्ट थंडक देणाऱ्यां पेयांपैकी एक. दही प्रोबायोटिक असल्यामुळे उष्णतेवर मात करण्यासाठी याचा उपगोग विविध पदार्थांमध्ये केला जातो. दही पचन क्रिया नियंत्रणात ठेवते, अति उष्णतेच्या वेळी सामान्य असलेल्या जठर व आतड्यांविषयीच्या समस्यांशी लढण्यास हे मदत करते. म्हणून उन्हाळ्यात हे अवश्य प्यावे.

६) नारळ पाणी :

उष्णतेचा सामना करण्यासाठी आणखी एक लोकप्रिय पेय म्हणजे नारळ पाणी. हे सुपर पोषण देणारे पेय आहे, चवीला चांगले असते आणि पौष्टिकही असते. यात नैसर्गिक एन्झाईम्स, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात, ज्याचा फायदा आपल्या शरीराला मिळतो. नारळाचे पाणी शरीरातील सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते.

|Relatee : Keep Coloured Clothes Shine | रंगीत कपडे चमकदार ठेवा… (Read more)

७) मिरची

हे नाव वाचून चकित झाला असाल ना! कारण आपल्याला माहित आहे की मिरची मुळे तोंडाला जळजळ होते तर शरीरात काय करेल. शरीरातील उष्णता कशी कमी करेल? पण खरं तर मिरची आणि मसालेदार पदार्थात “Capsaicin” नावाचा सक्रिय घटक असतो, हे शरीराचे आतील तापमान वाढवते. ज्यामुळे तुम्ही खाताना घाम येतो. घाम येणे ही मानवी शरीराचे तापमान नियंत्रित करण्याच्या प्राथमिक पद्धतींपैकी एक आहे. विशेषतः, ते घामाचे बाष्पीभवन आहे जे आपल्या शरीरातील उष्णता काढून टाकते. म्हणून तुम्ही मसालेदार अन्न खाताना हायड्रेटेड राहता, येणारा घाम तुमच्या शरीराला जलद आणि अधिक कार्यक्षमतेने थंड होण्यास भाग पडतो.

आम्हाला आशा आहे की या लेखात दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !

अस्वीकरण : वरील दिलेली माहिती, ही सर्वसाधारण आहे, वेगे-वेगळ्या स्रोतांद्वारे गोळा करून, तुमच्यासाठी आणिली आहे. वाचकांसाठी सल्ला देण्यात येतो की आपापल्या सवयी नुसार, स्वतःच्या जबाबदारी वर हे करावे. कोणतीही गोष्ट प्रमाणात असावी, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. आम्ही कोणतीही जोखीम स्वीकारत नाहीत.

वेगळी माहिती :

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.


I hope you got the answer to these questions like how to beat the heat of summer? how to beat the heat during summer? what are beat the summer heat slogans? how do beat the summer heat in India? beat the heat of summer drinks? beat the summer heat meaning. What are the five measures to avoid heat in summer? what do we do to protect ourselves from the heat in summer? How can we minimize the effect of heat during the summer season? How to beat summer heat naturally, if you are under extreme heat what are the things you can take to keep yourself safe, and how to reduce heatwaves? What are summer vacations to beat the heat? how to deal with hot weather without air conditioning.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x