Bara Motechi Vihir | बारामोटेची विहीर

महिमानगड, वर्धनगड, कल्याणगड आणि सोबतीला बारा मोटेची विहीर :

Bara Motechi Vihir | बारामोटेची विहीर : (Some Information) :

बारामोटेची विहीर म्हणजे बारा मोटा असलेली विहीर, आता मोट म्हणजे पाणी वाहून नेण्यासाठी किंवा विहिरीतून पाणी काढण्यासाठी, प्राणांच्या चांबड्या पासून बनवलेली पिशवी. ह्या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एकावेळी १२ मोटा लावल्या जात, म्हणून या विहिरीचे नाव बारा मोटेची विहीर असे पडले. ही विहीर म्हणजे एक वास्तुकलेचा अप्रतिम नमुनाच आहे. एक सुंदर ऐतिहासिक वास्तू. सातारा जिल्ह्यातील अजून एक प्रेक्षणीय स्थळ.

महिमानगड, वर्धनगड, कल्याणगड पूर्ण झाल्यानंतर आता मात्र परतीचे वेध लागू लागले होते. पण थेट घरी जातील ते भटके कसले? गाडीची दिशा वाकडी करून लिंब गावात असणारी बारा मोटेची विहीर पाहून घेऊ या मताला सर्वांनी होकार दिला. लिंब गाव साताऱ्या पासून साधारण १५ किमी अंतरावर असेल. लिंब गावापासून जवळपास १.५ किमी अंतरावर, एक शेरीची वाडी आहे. तेथेच जवळ कृष्णा नदीच्या तीरावर ही बारामोटेची विहीर आहे.

विहिरीचा इतिहास व संकल्पना :

इस १७२४ ह्या दरम्यान, छत्रपती श्रीशाहू महाराजांची पत्नी, श्रीमंत वीरूबाई भोसले यांनी ह्या विहिरीचे बांधकाम केले. विहिरीची खोली ११० फूट व व्यास ५० फूट आहे. साधारणतः विहिरीचा आकार गोल असतो, पण हि विहीर अष्टकोनी आकारची आहे. मुख्य विहीर ही अष्टकोनी आहे, तर तिला एक आयताकृती लहान विहीर जोडलेली आहे. या दोन्ही विहिरींच्या मध्ये, एक महाल बांधलेला आहे. महालाच्या आतील खांबांवर देवता, जसे गणपती, हनुमान, काही ठिकाणी फुले, तर काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्पही कोरलेली आहेत. वरून पाहिल्यास ह्या विहिरीचा आकार हा शिवलिंगा प्रमाणे भासतो.

विहिरीची माहिती :

शिवकालीन स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेली ही विहीर म्हणजे एक दर्जेदार कलाविष्कार आहे. विहिरीत उतरण्यास दोन बाजूने प्रशस्त पायऱ्या आहेत. विहीरीच्या समोरच मोडी लिपीत लिहिलेले शिलालेखही आहेत. प्रमुख दरवाजावर कमानिशेजारी दोन शरभ शिल्पे कोरलेली दिसतात. खरं तर येथे १५ मोटेची व्यवस्था असल्याचे दिसते, पण प्रत्येक्षात मात्र फक्त बारा मोटाच वापरात होत्या. म्हणूनच या विहिरीला बारामोटेची विहीर असे म्हटले जाते. गुजरात, राजस्थान प्रमाणे भरपूर कोरीवकाम असलेली आणि सहज उतरता येतील अशा पायऱ्या असलेली आणि दर्जेदार नक्षीकाम असलेली महाराष्ट्रातीलही एकमेव विहीर आहे.

म्हणूनच तर उशीर झालेला असतानाही, हि प्रसिद्द विहीर पाहण्याचं आग्रह धरला. असं सांगितलं जातंकी लिंब गावाच्या आस-पास जावपास ३०० हुन अधिक आंब्याच्या झाडं होती. ह्या अमराईच्या सिंचनाची व्यवस्था व्हावी म्हणून ही विहीर बांधली होती. अष्टकोनी मुख्य विहीर आणि बाजूची आयताकृती उपविहिर यांना जोडणारा एक भुयारी महाल आहे. वेगवेगळ्या भागावर कोरलेली वेगवेगळी शिल्प, थकलेल्या मनालाही, पुन्हा तजेला करत होती. महालातील खांबांवर फुलांचे व इतर बऱ्याच मूर्तींचे उत्कृष्ट कोरीवकाम पाहावयास मिळते.

आम्ही तेथे जाईपर्यंत सूर्य मावळला होता, आणि काळोख पडू लागल्याने टॉर्च घेऊन, जितक पाहता येईल तितकं पाहण्यात सगळे गुंगून गेलो. विहिरीतील पाण्यात पडणार प्रतिबिंब देखील खूप छान होतं.

bara motechi vihir

ट्रेकचा समारोप :

सात वाजून गेले होते आणि अंधार पडायला लागला होता त्यामुळे आता काढता पाय घेणं गरजेचं होत. पोटातल्या भुके ला आता नीट शांत करायचं होतं.  एका हॉटेल मध्य गेलो, तिथे असणारी प्रचंड गर्दी आणि पुढे लागलेली ट्रॅफिक त्यामुळे इथे काय मिळेल ते खाऊ ठरवून तंदुरीवर पाणी फिरवून चिकनच्या दुसऱ्या डिश मागवून एका कोंबडीच्या आत्म्याला मुक्ती देण्याचं काम केलं. सव्वाबारा वाजता पुणे स्टेशन गाठून ग्वालीयर एक्सप्रेसने मी आणि प्रिसीने पनवेल साठी, सागर ने कन्याकुमारीने कल्याणासाठी तर हर्षलदाने त्याच्या रथाने घराकडे प्रस्थान केले. 

अशा प्रकारे महिमानगड, वर्धनगड, कल्याणगड आणि सोबतीला बारा मोटेची विहीर, एक चांगली भटकंती आमच्या आठवणींची खजिन्यात येऊन सामावली होती. 

शिवकालीन इतिहास असलेल्या या नक्षीदार विहिरीला अवश्य भेट द्या. या लेखात दिलेली माहिती आवडल्यास स्वतःपुरतीच न ठेवता इतरांनाही सामायिक (Share) करा, तसेच आपला अभिप्रायही कळवा.

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

Trecking blog, Treck information, Marashtra Forts, bara motichi vihir, places to visit in satara, visiting places in Satara. Bara Motechi Vihir complete information.

विशाल पाटील

मी विशाल शंकर पाटील, महाराष्ट्र, पनवेल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. किल्ले भेट याविषयी मी या ब्लॉग मध्ये माझ्या स्वतःच्या शैलीत लेखन केलेले आहे, मी केलेल्या ट्रेक्सचे जिवंत वर्णन करण्याचा केला प्रयत्न आहे. अशा करतो तुम्हाला तो नक्की आवडेल. स्वतःला सह्याद्रीचा भटकभवान्या म्हणवून घ्यायला मला खूप आवडेल. धन्यवाद!

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x