Buy car insurance online | कार विमा म्हणजे काय ?

Buy car insurance online | कार विमा म्हणजे काय ? :

Buy car insurance online

नमस्कार, मागील लेखात आपण विमा (Insurance) म्हणजे काय ? याविषयी सविस्तरपणे समजून घेतले. आज आपण वाचणार आहोत कार विम्या विषयीची माहिती.
कार विमा म्हणजे काय ? विम्याचे प्रकार काय आहेत? कार विमा का घ्यावा लागतो ? आणि कार विम्याचे फायदे काय आहेत?

कार विमा म्हणजे ? Vehicle Insurance or Motor insurance ? म्हणजेच वाहन विमा. पण प्रत्येकजण आपापल्या सवडीनुसार, कार असेल तर कार इन्शुरन्स, बाईक असेल तर बाईक इन्शुरन्स किंवा इतर वाहन असेल तर मोटर इन्शुरन्स असे म्हणतो. नवीन वाहन विकत घेताना हा विमा वाहनाच्या किमतीत अगोदर ऍड केलेला असतो. आता तर हा विमा ३ वर्षासाठी ऍड केला जातो, त्यामुळे आपल्याला तो हवा असो किंवा नसो, घ्यावाच लागतो. कदाचित म्हणूनच हा विमा प्रकार आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे.

कार/ वाहन विमा म्हणजे काय ?

कार विमा/ वाहन विमा पॉलिसी हा एक साधारण विमा प्रकार (General Insurance) या सादर खाली येतो.
या विम्या मार्फत आपणास किंवा आपल्या कारला अपघात झाल्यास, कार चोरी झाल्यास किंवा इतर काही नैसर्गिक आपत्तींची जोखीम स्वीकारली जाते व नुकसानीपासून संरक्षण दिले जाते. वरील उल्लेखलेल्या कोणत्याही अनिश्चित परिस्थितीमुळे होणारे कोणतेही नुकसान झाल्यास आपण आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होतो. तसेच अपघातात आपण तृतीय-पक्षाच्या (Third Party) जबाबदार्यांपासून देखील संरक्षित होतो. ही संपूर्ण नुकसान भरपाई इन्शुरन्स कंपनी कडून आपल्या मिळते.

हा विमा किती महत्वाचा आहे आता लक्षात आलं असेल. रस्त्यावर वाहन चालवताना केवळ आपल्याच कराचे नुकसान होते असे नाही. आपल्यामुळे दुसऱ्याच्या होणाऱ्या नुकसानही यामध्ये कव्हर असतो. म्हणूनच हा विमा घेणे, सरकार सक्तीचे केले आहे.

कार/ वाहन विम्याचे प्रकार काय आहेत?

➠ तृतीय-पक्ष कार विमा (Third party car insurance – Buy Online)
➠ सर्वसमावेशक कार विमा (Comprehensive car insurance – Buy Online)

➢ तृतीय-पक्ष कार विमा :

हा विमा म्हणजे, कार विमा असणे कायद्याने बंधन कारक आहे, आणि कायद्याचे पालन करावे म्हणून घेतला जातो. ह्या विम्या मध्ये आपण फक्त आपल्या कारमुळे इतरांचे होणारे नुकसान संरक्षित केले जाते.

➣ सर्वसमावेशक कार विमा :

आपल्या कारला सर्वसमावेशक कार विमा हा स्वत: च्या नुकसानीच्या धोरणासह अंतिम संरक्षण देण्याचे काम करतो. या विम्या अंतर्गत जवळपास सर्वच नुकसान भरपाईचे संरक्षण दिले जाते, म्हणूनच याला सर्वसमावेशक (Comprehensive) विमा असे म्हणतात.

प्रायव्हेट सेक्टरचे इन्शुरन्स मधील वाढत प्रमाण, याला अजून चांगलं आणि स्पर्धक बनावत चाललं आहे. तुमच्या कारची पॉलिसी जर चालू असेल, तर तुम्ही ती पॉलीसी ऑनलाईन पुनर्रचलित (रिन्यू) करू शकता. तुमहाला एक नाही १०-१० पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही चांगल्यात चांगला आणि तुम्हाला आवडेल तो विमा घेऊ शकता.

चला तर पाहू कार इन्शुरन्स मध्ये काय-काय कव्हर होते ?

What is covered in the comprehensive insurance ?
➦ असिसिडेंट्स (Accidents) : आपल्या कारला असिसिडेन्ट मुळे होणारे संपूर्ण नुकसान आणि कारला होणारे डॅमेजेस यामध्ये कव्हर होतात.
➥ कारची अकस्मात चोरी झाली तर तीही कव्हर होते.
➦ वैयक्तिक विमा, असिसिडेन्ट झालेल्या कारच्या चालकास इजा झाली किंवा त्याचा मृत्यू झाला तर policy मधील निश्चित रक्कम विमा धारकाला दिली जाते.
➥ अन्य कोणत्याही कारणामुळे कारला आग लागली तर मुळे होणारे संपूर्ण नुकसान भरपाई यामध्ये कव्हर होते.
➦ नैसर्गिक आपत्ती मुले होणारे संपूर्ण नुकसान भरपाई मिळते, जसे पूर आल्यास, वीज पडल्यास, भूकंप झाल्यास, किंवा इतर काही.
➥ थर्ड पार्टी नुकसान : जर आपल्या कारमुळे इतरांच्या कारचे, इतर वाहनांचे किंवा त्यांच्या मालमत्तेचे होणाऱ्या नुकसानाची भरपाई मिळते.

तसेच काही कंपन्या ग्राहकांना प्रभावित करण्यासाठी या व्यतिरिक्त आजूनही काही अतिरिक्त लाभ देतात.

➦ पससेंजर कव्हर : अकस्मात होणाऱ्या अपघातामुळे चालका सोबत बसलेले इतर व्यक्तींना जर काही झालं, तर त्याचीही ठराविक रक्कम भरपाई म्हणून मिळते.

➥ कार मूल्य परतावा (Return of Car value) : जर अपघातामुळे कारचे खूपच नुकसान झाले असेल, आणि ती दुरुस्ती बाहेर असेल तर अशावेळेला कारची विम्यात ठरलेली किंमत परत मिळते. जिचा उपयोग आपण नवीन कार घेण्यासाठी करू शकतो.

➦ शून्य डिप्रेसिएशन कव्हर : (Zero Depreciation) : नवीन कारचे पहिले पाच वर्ष कोणतेही डिप्रेसिएशन न करता (म्हणजेच कारची किंमत) कमी न करता, पूर्ण किमतीचा विमा दिला जातो.

➥ काही कंपन्या टायर प्रोटेक्शन, consumable वस्तूंचे कव्हरही दिले जातात.
➦ Road side assistance कव्हर, रस्त्यात कार कधी बंद झाली, तर तेथील मदत कव्हर केली जाते.

Digital Credit Card-Marathi  ….. (अधिक वाचा….)

कोणत्या गोष्टी कव्हर नसतात ?

कोणत्याही इन्शुरन्स मध्ये काय-काय कव्हर आहे, त्याच बरोबर कोणत्या गोष्टी कव्हर नाहीत हे माहित असणेही तितकेच महत्वाचे. यावरूनच आपण कोणत्या कंपनीचा विमा घ्यायचा ते ठरवू शकतो.
➥ ड्रिंक अँड ड्राईव्ह (मद्य करून वाहन चालवल्यास)- या परिस्थितीत जर कारचा अपघात झाल्यास कोणतीही विमा कंपनी जोखीम कव्हर करत नाही.
➦ विदाउट लायसन्स (विना चालक परवाना) – या परिस्थितीत जर कारचा अपघात झाल्यास कोणतीही विमा कंपनी जोखीम कव्हर करत नाही.
➥ थर्ड पार्टी पॉलिसी मध्ये : स्वतःच्या कारचं नुकसान कव्हर नसतं.
➦ सहयोगी दुर्लक्ष (Contributory Negligences) : कोणताही सहयोगी संदेश दुर्लक्षित केल्यास. जसे लॉकडाउन असतानाही, कार चालवली असेल, पूर आलेले माहित असतानाही त्या भागात कार ड्राईव्ह करत असेल. किंवा सरकारने बंदी केलेली असतानाही रस्त्यात कार चालवलेली असेल तर, अशा परिस्थितीत नुकसान भरपाई कव्हर नसते.
➥ अतिरिक्त वैशिष्ट्ये खरेदी केली नसतील तर ती कव्हर होत नाहीत.
➦ संभाव्य नुकसान (Consequential Damages) – कोणताही नुकसान जे अपघाशी संबंधित नसेल तर ते नुकसान कव्हर नसते. जसे कारचा अपघात झालेला आहे, पण तरीही ती डॅमेज कार चालवून त्याचे अजून अधिक नुकसान झाले तर ते कव्हर नसते.

कार इन्सुरन्सचे फायदे काय

➥ कारचे होणाऱ्या संभाव्य आर्थिक नुकसानाचे संरक्षण करते.
➦ कायद्याचे पालन केले जाते.
➥ इतर अतिरिक वैशिष्ट्यांचे फायदे.
➦ थर्ड पार्टीचे जे नुकसान होते त्याची भरपाई केली जाते.

आता आपण कार विषयीची शब्दावली (Terminology) समजून घेणं. कारण इन्शुरन्स म्हटलं की, तुम्हाला माहित आहेत बऱ्याच खाचा-खुणा, पळवाटा असतात. आज आपण त्या सर्व टेकनिकल शब्द समजून घेऊ.

१) IDV – (Insured Declared Value) – घोषित विमा रक्कम :

याचा अर्थ आपल्या कारची जास्तीत किमंत. ➢ कारची होणारी नुकसान भरपाई जास्तीत जास्त IDV इतक्या रकमेची असेल.
➣ याच रक्कमे वरून कार विम्याचा प्रीमियम निश्चित होतो.
➢ जसजशी कार जुनी होते तसतशी कारची किंमतही कमी होत जाते.
➣ कार जर आपल्याला विकायची असेल, तर साधारण IDV रकमेची इतकी किमंत मिळू शकते.
➢ म्हणून विमा घेताना IDV व्हॅल्यू नक्की पहा. कारण काही कंपनी IDV व्हॅल्यू कमी दाखवून विमा हप्ता कमी असल्याचा दावा करू शकता. अधिक विमा कंपन्यांची तुलना करताना ही बाब लक्षात ठेवा.

What is insurance in Marathi | विमा म्हणजे काय ? …… (अधिक वाचा….)

२) NCB – (No Claimed Bonus) :

दावा न केल्याचा बोनस : म्हणजे विमा घेतलेल्या पूर्ण वर्षात आपण कोणताही नुकसान भरपाई दावा केला नाही. अशा वेळी दुसऱ्या वर्षी त्याच कारचा विमा नूतनी (रिन्यू) करते वेळी दावा न केल्याचा बोनस म्हणून काही कंपनी १०% पासून ५०% पर्यंत मूळ प्रीमियम मध्ये सूट देतात, यालाच No Claimed Bonus असे म्हणतात.
➢ याच्या टक्केवारीचे प्रमाण वाढत्या स्वरूपाचे असते. जसे पाहिल्यावर्षी २०%, दुसऱ्या वर्षी ३०% असे पाचव्या वर्षापर्यंत ५०% होते. पाचव्या वर्षा नंतर ते तितकेच राहते.
➣ पण या पाच वर्षात जर कशी क्लेम केला तर तो बोनस शून्य होऊन जातो.
➢ हा बोनस फक्त विमा नूतनी (रिन्यू) करते वेळीच दिला जातो.
➢ हा बोनस कारशी निगडित नसून त्या मालकाशी संबंधित असतो. म्हणजे कार बदलायची झाल्यास नवीन कारच्या खरेदी वेळी हा बोनस तुम्ही वापरू शकता व नवीन कारचा विमा प्रीमियम कमी करू शकता. ही माहिती खूप कमी जणांना कडे असते.

३) झिरो डेप कव्हर (Zero Depreciation Cover) :

बम्पर टू बम्पर/ पार्ट्स घसारा कव्हर : हा पर्याय ५ वर्षांपेक्षा कमी कमी कालावधीच्या कारसाठी योग्य आहे. खरं तर प्रत्येक गोष्टीप्रमाणे, बम्पर किंवा कार च्या इतर कोणत्याही धातू भागाचे किंवा फायबर, काच या भागांच्या किंमतीत घट होत असते. हि घट चारच्या दाव्या मध्ये कव्हर होत नाही. पण जर तुम्ही add-on (अतिरिक्त लाभ) घेतल्यास झिरो डेप ही कव्हर केलं जातं.

वर दिलेली कार/ वाहन विमा विषयीची संपूर्ण माहिती आवडली असेल तर, नक्की कंमेंट करून आपला अभिप्राय कळवा. तसेच काही सुचना असतील तर त्याही आमच्या पर्यंत पोहचावा. आणखी कोणत्या विषयावर माहित हवी असल्यास कमेंट मध्ये नमूद करा. आम्ही त्याचा विचार करून सुधारण्याचा प्रयत्न करू व नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करू. दिलेली माहिती मित्रांसोबतही सामायिक (Share) करून आमच्या प्रत्नना प्रोत्साहन द्या. धन्यवाद !

Buy car insurance Online.

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!