Gudi Padwa in Marathi | गुढी पाडवा
Gudi Padwa in Marathi, Great Indian Festival by (Marathirang),
नमस्कार मित्रांनो मी संतोष भरणुके, मोहा, महाराष्ट्र येथे राहतो. मी विणिज्यचा पदवीधर आहे, तसेच कॉम्पुटर अप्लिकेशन डिप्लोमा केलेला आहे. सतत संगणका सोबत काम करायला आवडत, म्हणून याच आवडीसोबत, लोकांना काहीतरी अधिक माहिती, देता यावी या उद्देशाने, मी आज पासून हा ब्लॉग सुरु करत आहे. या ब्लॉगच्या मार्फत मी मराठी सणांची माहिती, मराठी कविता, चारोळ्या, आवश्यक माहिती आणि असेच बरेच काही तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहोत. आशा करतो तुम्हा सर्वानाही आवडेल. आज मराठी वर्षाचा पहिला दिवस, म्हणजेच गुढी पाडवा. चला तर वाचूया आपल्या पहिल्या सणाविषयी.
Gudi Padwa : गुढी पाडवा :
गुढी पडावा हा हिंदू नव वर्षाचा पहिला दिवस, हा दिवस केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने हा सण साजरा करतो खरा, पण काय तुम्हाला माहित आहे हा सण का साजरा केला जातो. काय आजच्या पिढीला ह्या पाठीमागचे कारण माहित आहे.
खरं तर आजच्या पिढीला हिंदू सणांचे, उत्सवांचे, परंपरेचे माहात्म्य आपणच समजावून सांगितले पाहिजे. तरच त्यांना आपल्या संस्कृतीचे माहात्म्य आणि महत्व कळेल. आपले सण, उत्सव काय आहेत? ते कसे साजरे केले पाहिजेत ? आपले प्रत्यक सण साजरे करण्या पाठीमागचे कारणे काय आहेत? कारण हिंदू संस्कृतीच्या प्रत्येक परंपरेला, काहीना काही तरी नैसार्गिक आणि अध्यात्मिक कारणे आहेत.
आज या लेखात आपण तेच समजून घेणार आहोत आणि खऱ्या अर्थाने गुढी पाडवा साजरा करणार आहोत. (Gudi Padwa in Marathi)
चला तर समजून घेऊया गुढी पडावा म्हणजे काय ?
मराठी वर्षातील पहिला महिना म्हणजे चैत्र आणि त्याचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा, म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा. हिंदू धर्माच्या नव वर्षाची सुरुवात याच दिवशी होते. म्हणूनच आप्रण हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतो.
|Related : (मराठीतील १२ महिन्याची नावे जाणून घ्या : )
गुढी पाडवा | Gudhi Padwa | Great Indian festival :
गुढी कशी उभारावी :
सर्व प्रथम एका लांब काठीच्या एका टोकाला नवे कोरे वस्त्र किंवा खण बांधतात. या कापडा सोबत औषधी असणार्या कडुलिंबाची कोवळी पाने, आंब्याचे टाळ, फुलांची माळ, गोड बत्ताशाची माळ असे बांधले जाते. सर्वात शेवटी गढूवर पाच कुंकवाच्या उभ्या रेषा मारून, सुशोभित केलेला तांब्याच्या धातूचा गडू (कलश) काठीच्या टोकावर ठेऊन ती दारासमोर, पाटावर ठेऊन उभी करतात. यालाच गुढी उभारणे असे म्हणतात. सूर्योदयाला ही बांबूची गुढी रुपी काठी विजजी ध्वजाचा प्रतीक समजले जाते. घरातील दाराला तोरण बांधून, गुढीची पूजा केली जाते. सूर्यास्ताला पुन्हा पूजा करुन गुढी उतरविली जाते. .
गुढी पाडव्याचे वैशिष्ट्य काय :
१. नवे निश्र्चय, नवे स्वप्न, चांगल्या सवयींची अंगीकारण्याचा संकल्प धरून या दिवसाची सुरुवात केली जाते. कडुलिंबाच्या गुणांची महत्व पटवून देण्यासाठी आणि सर्वांना त्याची आठवण करून देण्यासाठी, गुढी सोबत हि पाने बांधली जातात.
२. गुढीपाडवा म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला वसंत ऋतूची सुरुवात होते. सृष्टीला नवजीवन देणारा हा ऋतू आहे. जानेवारी पासून पानांची गळती सुरु झालेल्या झाडांना नवी पाळावी फुटते, झाडांना बाहेर येतो, जणू सृष्टीही नवजीवनाची सुरुवात जा दिवसापासून करते. म्हणूनही आपल्या वर्षाची गणना करताना पहिला उत्तम दिवस असे या दिवसाला म्हटले आहे.
३. चांगली वेळ म्हणजे मुहूर्त, वेदांग ज्योतिष मध्ये उल्लेखिल्या प्रमाणे, साडेतीन मुहर्ता पैकी गुढीपाडवा हा एक उत्तम मुहूर्त आहे. म्हणूनच या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते, नवी गुंतवणूक केली जाते तसेच अनेक नवनवीन कार्यांची सुरुवात केली जाते.
गुढीमध्ये वापरलेल्या प्रतिकांचा विशेष महत्व :
जसे बांबू, बांबूला अनेक वेळा नवे बांबू तयार करण्याची निसर्गाकडून मिळाले वरदान आहे, तरीही तो लवचीक आहे. बांबू प्रमाणे आपल्यात लवचिकता व ताकद यावी. तसेच इतर वृक्षांची, वृक्ष तोड होउ नये म्हणून बांबूची काठी. (Gudi Padwa in Marathi)
नवे वस्त्र खण हे मंगलमय वातावरण निर्माण करते. बांबूवर धातूचा गढू उलटा ठेवला जातो, या धातूमुळे पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणाने येणार्या प्रकाशलहरी खेचून घेण्याची शक्यता वाढते. हा दिवस शुभ व उत्तम असल्यामुळे हवेतही चांगल्या लहरी असतात, त्या शुभ लहरी किंवा स्पंदने आपल्या घरात खेचून आणण्यासाठी हा गढू मदत करतो.
|Related : पांढरे कपडे पांढरे ठेवण्यासाठी काय करावे. (Read More)
गुढी उभारण्याची सुरुवात कधी पासून झाली असेल ?
➥ महाभारताच्या काळात उपरिचार नावाच्या राजा होता, त्या राजाला इंद्र देवाने एक काठी दिली. इंद्र देवाचा आदर म्हणून या राजाने ती काठी त्याच्या महाला समोर रोवली आणि त्याची आदराने पूजा केली. उपरिचार राजाने असे केले म्हणून इतरही राजांनी त्याचे अनुकरण केले आणि इंद्र देवाचा मान म्हणून आपापल्या महाला समोर काठ्या रोवून त्याला मला बंधून सुशोभित केले व त्यांची पूजा केली. तो जो दिवस म्हणजे हिंदू वर्षाचा पहिला दिवस, तेंव्हा पासून हि गुढी उभारण्याची परंपरा सुरु झाली आणि गुढी पाडव्याच्या सणाची सुरवात झाली. .
➨ ‘शक’ हे खूप उपद्रवी होते. या शकांनी भारतावर आक्रमण करून खूप उत्पात माजविला होता. अश्या या शकांचा पराभव कारणासाठी आणि भारताला त्यांच्या याच्यातून बाहेर काढण्यासाठी. एका कुंभाराचा मुलगा शालिवाहन पुढे आला, त्याने ६००० हुन जास्त सैनिकांचे मातीचे पुतळे बनविले. त्यांच्यात ऋषी मुनींच्या मदतीने प्राण प्रतिष्ठा करून त्यांना जिवंत केले आणि त्यांचाच मदतीने शालिवाहन शकांचा पराभव केला. या विजयाचं आनंद म्हणून ही गुढी उभारली जाते अशी आख्यायिका आहे. (Gudi Padwa in Marathi)
Gudi Padwa 2021 : गुढी उभारण्या बद्दल वैज्ञानिक आधार :
या दिवशी, कडुलिंबाची पाने वाटतात, त्या मध्ये थोडं गुळ, मीठ, ओवा, हिंग आणि थोडं मिरी टाकून त्याचं वाटण करतो आणि ते खातो. जसे आपल्या माहित आहे कि गुढीपडव्या पासून ऊन अधिक जाणवू लागत. त्यामुळे शरीरातही उष्णता वाढते, वरील कडुलिंबाचे मिश्रण हे खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होते व शरीरात गारवा निर्माण करण्यास मदत होते. कडुलिंबाच्या गुणामुळे शरीरातील पित्ताचे प्रमाण कमी होते. पचनक्रिया योग्य रीतीने होते अनेक प्रकारचे त्वचा रोग बरे होतात. अश्या प्रकारे आपल्या सणांमागे वैज्ञानिक दृष्टिकोन हि नक्कीच असतो, आपल्याला तो फक्त माहित नसतो इतकाच.
अश्या प्रकारे गुढीपाडवा हे विजयाचे प्रतीक आहे, समृद्धीचे प्रतीक आहे आणि आरोग्याचेही प्रतीक आहे. आज आपण या लेखातून बरीच माहिती मिळविली असेल. ती नक्की समजून घ्याल व येणाऱ्या नव्या पिढीला याचे मार्गदर्शन कराल. लय पावत चाललेल्या या हिंदू संस्कृतीला जपण्याचा प्रयत्न कराल, तिला वृद्धिंगत करण्यास मदत कराल.
सण गुढी पाडव्याचा, सण मोठ्या आनंदाचा,
पाने पडलेल्या झाडांना, नव चैतन्य देण्याचा,
गुढी उभारून दारी, हर्ष उल्हास करण्याचा,
क्षीण आलेल्या मनाला, नवी उभारी देण्याचा ||
|Related : रंगीत कपडे रंगीत कसे ठेवायचे ते पाहूया (Read More) :
आम्हाला आशा आहे कि दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा, तुमच्या सूचनांचा नक्की विचार केला जाईल. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
गुढी पाडव्याचा हार्दिक शुभेच्छा ! Gudi Padwa
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
- Gudi Padwa Wishes in Marathi 2023 - March 21, 2023
- World Most 7 No Fly Zone Places | नो फ्लाय झोनची ठिकाणे - December 25, 2022
- What Commerce Students can do after 12| Best Options - December 24, 2022