What Happens If Eat Ginger | काय होईल जर रोज आलं खाल्लं

What happens if eat Ginger: What will happen, if You Eat Ginger Every Day | काय होईल जर एक महिनाभर आलं रोज खाल्लं तर, Benefits of chewing raw ginger, what happens if you eat ginger every day. How to eat ginger for health benefits, how much ginger should I eat daily? Eating raw ginger has benefits and side effects. How much ginger is too much. Is it safe to eat raw ginger? 4 grams of ginger per day is enough? अश्या प्रकारच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात पाहणार आहोत. आले खाणे चांगले की वाईट याविषयी वाचणार आहोत. या लेखात आपण आलं खाल्लं तर काय फायदे किंवा तोटे होऊ शकतात ते पाहू. चला तर करूया सुरुवात.

आरोग्यदायी आले :

आपण सर्वजण जाणतो, किंवा आपल्याला हे माहीत आहे की, फळे आणि हिरव्या पाले-भाज्या आपल्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्या मध्ये खुप सारे जीवनसत्व असते. हे ही माहीत आहे की आपल्या जेवणात पालेभाज्या असाव्यात, फळे असावीत. म्हणूनच दिवसातून तीन-चार वेळा रंगीत अन्न खावे. आपल्या सर्वाना चांगल्या प्रकारे माहित झाले किंबहुना आपल्या डॉक्टर कडून, मोठ्यांकडून असेच बऱ्याच वेळा सांगितले गेले, बऱ्याच वेळा शिकविले गेले. परंतु काय तुम्हाला हे माहित आहे का? की काही मसाल्यांचे पदार्थ देखील आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे देणारे असतात, होय खरं आहे, मसाल्याचा पदार्थ. त्याच मसाल्याच्या एका पदार्थ विषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तो पदार्थ आहे “आले”. तुम्ही जेव्हा दररोज आले खाता, तेव्हा तुमच्या शरीराला अनेक चांगल्या गोष्टी घडतात. चला पाहूया नेमकी कोणते फायदे आहेत ते.

|Relatee : Keep Coloured Clothes Shine | रंगीत कपडे चमकदार ठेवा… (Read more)

गुणकारी आले :

आले एक अतिशय तिखट चव असलेला मसाल्याचा पदार्थ आहे. हे चवीने तिखट तर आहेच पण त्यात अनेक चांगले गुणही आहेत. आल्यामध्ये झिंगिबेरीन, जिंजरॉल, शोगाओल (zingiberene, gingerol, shogaol) अशी तत्व, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांची संपूर्ण शुंखला आहे. आल्याचा खूप मोठा औषधी इतिहास आहे, या बाबत आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. काही शतकांपूर्वी, आल्याचा वापर सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी केला जात असे, असा उल्लेख इतिहास आढळतो. याशिवाय आले नियमितपणे खाल्ल्याने शरीर निरोगी राहण्यासही मदत होते.

आलेचे गुण :

आल्यामध्ये जिंजरॉल हा जैव-सक्रिय पदार्थ आहे, ज्याचा उपयोग मळमळ आणि उलट्या यांसारखी लक्षणे कमी करण्यासाठी केला जातो. आल्याचा उपयोग सुजलेल्या भागाची सूज कमी करण्यास देखील होतो. मगाशी सांगितल्या प्रमाणे, आल्यामध्ये शोगोल असतो, हे एक वेदनशामक म्हणून खूप प्रभावी आहे. त्यामुळे वेदनेचा प्रभाव कमी करण्यासाठी आले खाण्यास दिले जाते. हा पदार्थ कर्करोग आणि हृदयविकारापासून बचाव करण्यास देखील मदत करतो. आल्या मध्ये असलेले झिंगिबेरिन हे पचनासाठी खूप प्रभावी कार्य करते. आतापर्यंत वाचलेले फायदेच खूप असल्या सारखे वाटतात ना. परंतु इतकेच नाही, आले हे मधुमेह विरोधी देखील परिणाम कारक कारक कार्य करते. हृदयविकारावही याचा खूप उपयोग होतो. मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आले ही एक उत्तम औषधी आहे.

एक महिनाभर आले रोज खाल्ल्यास तुमच्या शरीराचे काय बदल आणि काय फायदे होऊ शकतात, हे वाचल्यावर आश्चर्य वाटले असेल ना. पण हे गुणकारी आले इतक्यावरच थांबले नाही. अजून “आल्याचा” पोटात किती गुणवत्ता भरली आहे तेही वाचूया.

आल्याचे दरोरोज सेवन:

वरील माहिती वाचल्या नंतर, तुम्ही ही महिनाभर रोज आले खाण्याचा विचार करत आहात का? विचार चांगला आहे, आम्ही तुम्हाला थांबवणार नाही. रोज आलं खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. एक छोटीशी टीप देऊ इच्छितो, तुम्हाला रोज-रोज आल्याचा तुकडा शोधात बसण्याची गरज नाही. किंबहुना तसे करूही नका. एक मोठा आल्याचा तुकडा घ्या, साधारणतः १.५ सेंटीमीटर इतका. त्याचे लहान -लहान तुकडे करा आणि ते तुमच्या फरसाण किंवा इतर तुमच्या आवडीच्या वास्तूमध्ये मिसळून ठेवा, हो ज्या गोष्टींमध्ये शक्य आहे त्याच. जसे चहा किंवा चिवडा यात मिसळून ठेवा. हे चार-पाच दिवसांसाठीच असू द्या. हे सर्व केल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो हे समजावून घेऊ या.

|Related : Try This To Keep White Clothes White | पांढरे कपडे पांढरे ठेवा.

आल्याचा आपल्या शरीरावर काय प्रभाव होतो :

आल्याच्या सेवनाने शरीरातील जळजळ जलद कमी होते. आल्याच्या दाहक-विरोधी प्रभावामुळेच शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते. आल्याच्या सेवनाने मळमळही नाहीशी होते. कोणाला सकाळी उठल्या-उठल्या अन्न अपचन झाल्याने अनेकदा मळमळ होते. आम्ही तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की जर तुम्ही दररोज आले खाल्ले तर तुम्हाला यापासून नक्की फायदा होईल. रोज आले खाल्ल्याने तुमची मळमळ कायमची दूर होईल. विशेष म्हणजे गरोदर स्त्रिया आणि केमोथेरपी घेत असलेल्या लोकांनाही याचा फायदा होऊ शकतो. तरीही आपल्या चिकीत्सकाचा सल्ला घेऊन तुम्ही हे करावे ही विनंती. तसं आलं खाल्याने कोणताही वाईट परिणाम नक्कीच होत नाही.

स्नायूंचे दुखणे कमी करतो, जर कोणाला स्नायूंच्या दुखण्याचा किंवा हातपाय दुखण्याचा त्रास असेल तर आले यावर खूप गुणकारी आहे. आले खाल्ल्याने यावर चांगला प्रभाव पडतो. दररोज आल्याचे सेवन केल्याने हळूहळू ह्या वेदना कमी होऊ लागतात, व काही दिवसांनी हा त्रास पूर्णपणे बरा होतो.
आले खाल्ल्याने आतड्यांच्या हालचालींना चालना मिळते. आतड्याच्या हालचालींना याचा खूप चांगला परिणाम होतो. नियमितपणे आले खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा ही त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
स्त्रियांच्या मासिक पाळीच्या वेळेस ज्यांना वेदना होतात, अश्या व्यक्तींनी रोज आले खाल्ल्याने त्यांना खूप फायदा होऊ शकतो. हे वेदना शामक औषधे घेतल्याने, ओटीपोटात तीव्र वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते.

कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत :

आले खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. महिनाभर दररोज आले खाल्ल्याने शरीरातील “खराब” कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. आल्यामधील असलेल्या ठराविक घटकामुळे रक्तातील ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण कमी होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते:
आल्यामधील दाहक-विरोधी गुणधर्म रोगप्रतिकारक शक्तीस मजबूत करण्यास मदत करतात. तुम्हाला आधीच सर्दी किंवा विषाणूचा त्रास झालेला असेल तर, आले तुम्हाला लवकर बरे करण्यास मदत करेल

|Related : Hubble Space Telescope | हबल अवकाश दुर्बीण …. (Read More)

.

आम्हाला आशा आहे कि तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !

अधिक माहिती :

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x