Aluminum Foil Ball In Washing |ॲल्युमिनियम फॉइल बॉल

Aluminum Foil Ball In Washing machine | Aluminum foil ball to your dryer while washing clothes in the machine. This will give you amazing effects! ॲल्युमिनियम फॉइलचा बॉल वॉशिंग मशीन मध्ये टाका आणि आश्चर्यकारक फरक पहा. हे तुम्हाला नक्कीच चकित करेल.

या टिपमुळे लॉन्ड्री करणे कधीही रोजच्या सारखे वाटणार नाही:

प्रत्येकात जिज्ञासा असते, त्याला काहीतरी नवीन करण्यात कुतूहल असते. मला तरी आहे, म्हणजे तुम्हाला ही नक्कीच असेल. कपडे धुणे हे एक मजेदार काम असे कोणालाच वाटत नाही, पण ते यापुढे वाटेल. हसू नका मी तुम्हाला तुमचे हरवलेले सॉक्स किंवा रुमाल शोधायला सांगत नाही. तुमच्या वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये ॲल्युमिनियम फॉइलचा बॉल जोडून, तुम्ही ह्या गोष्टी सोप्या करू शकता.

|Related : How To Clean Washing Machine| वॉशिंग मशीन कशी स्वच्छ करावी. (Read more)

फरक:

जर तुम्ही ॲल्युमिनियम फॉईलचे बारकाईने निरीक्षण केले असेल, तर तुम्हाला लक्षात येईल की फॉइलची एक बाजू चमकदार आणि दुसरी निस्तेज असते.

बर्‍याच लोकांना असे वाटते की दोन्ही बाजूंमधील फरक समजावा म्हणून, हा बदल केला असावा. पण खरं तर निस्तेज बाजू चांगली कंडक्टर असते कारण पृष्ठभाग सपाट असतो, याचा अर्थ असा होईल की चमकदार असलेली बाजू चांगल्याप्रकारे उष्णता साठवून ठेवते. हे कदाचित विश्वासार्ह वाटेल, आणि तुम्हाला खरं ही वाटेल, परंतु असे अजिबात नाही. मी फक्त मस्तीत सांगत होतो. एक बाजू निस्तेज आणि दुसरी चमकदार असणे हे केवळ उत्पादन प्रक्रियेचा भाग आहे, दोन्ही मध्ये मुख्य फरक असा काही नाही. त्यामुळे यापुढे कोणत्या बाजूने आच्छादन करायचे आणि कोणत्या बाजूने नाही या संभ्रमात राहू नाही. दोन्ही बाजू सारख्याच ठीक आहे. एक माहिती असावी म्हणून सांगितली आहे, विशेष काही नव्हतं. हां ! पण पुढे मात्र विशेष आहे.

|Related : Try This To Keep White Clothes White | पांढरे कपडे पांढरे ठेवण्यासाठी काय करावे. (Read More)

तुमच्या मशीन साठी ॲल्युमिनियम फॉइल वापरणे योग्य की नाही.

वॉशिंग मशीन किंवा टंबल ड्रायरमध्ये ॲल्युमिनियम फॉइल वापरणे मशीनसाठी अजिबात हानिकारक नाही. ॲल्युमिनियम फॉइलचा चेंडू कपड्यां सोबत असल्याने, तुमचे कपडे आता स्थिर (स्टॅटिक) राहणार नाहीत, कारण फॉइल ही ड्रायर मध्ये तयार होणारी सर्व विद्युत ऊर्जा (इलेक्ट्रिक चार्ज) शोषून घेईल. त्यामुळे कपड्यातून निघालेले बारीक तंतू, मैल आणि घाण पुन्हा कपड्यांना चिकटून राहण्याची शक्यता कमी होते.

ॲल्युमिनियम बॉल

ॲल्युमिनियम फॉइलचे तीन गोळे बनवा जे तुमच्या हातात बसणाऱ्या छोट्या चेंडू इतके असावेत. हे तुमच्या कपड्यांमध्ये टंबल किंवा ड्रायरमध्ये सोडा आणि तुम्ही सामान्यतः वापरत असलेल्या प्रोग्रामवर प्रमाणे मशीन चालू करा. बस झालं इतकं सोपं आहे. शिवाय हे बॉल अनेक वेळा वापरू शकता. प्रत्येक वेळी नवीन घेण्याची गरज नाही. एकदा केलेले चेंडू साधारणतः ६ महिन्यांपर्यंत वापरू शकता. बनविलेला चेंडू घट्ट गुंडाळला असावा आणि प्रत्येक धुलाई नंतर योग्य रीतीने ठेवा. उपाय खूपच साधा आणि सोपा आहे, करून पाहण्यास काहीच हरकत नाही. परिणाम अनुभवा आणि आवडल्यास सतत चालू ठेवा.

आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !

|Related : Keep Coloured Clothes Shiny | रंगीत कपडे चमकदार कसे ठेवावे (Read More)

वेगळी माहिती :

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.

I think you get the answer to the questions like, What is a Japanese aluminum foil ball? Why aluminum foil ball is used in the laundry? What is the difference between aluminum foil vs wool dryer balls? Homemade dryer balls of aluminum foil.

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x