Post Office Schemes in Marathi – 2021| पोस्ट ऑफिस योजना

Table of Contents :

Post Office Schemes in Marathi – 2021| पोस्ट ऑफिस योजना :

Post Office Schemes in Marathi : समाजातील प्रत्येक घटकातील लोकांना छोट्या बचतीचा जास्तीत जास्त फायदा व्हावा या हेतूने पोस्टाच्या बचतीच्या योजना सुरु केल्या आहेत, किंवा असेही म्हणता येईल कि त्या सरकारकडून राबवल्या जात आहेत. आज आपण अशाच पोस्टाच्या योजनांचा माहिती घेणार आहोत. आपणास त्या माहीतही असतील किंवा त्यातील काही योजना नव्याने माहित होतील. या लेखाद्वारे आपण पोस्टाच्या योजना कोणत्या आहेत, त्यांचे लाभ काय आहेत, त्या साठी अर्ज कसा करायचा. त्याचे लाभ मिळविण्या साठी काय करावे, याचे प्रमाण काय असते, या योजना कोण घेऊ शकतो, अश्या बऱ्याच प्रश्नांचे उत्तर या लेखात वाचणार आहोत.

पोस्ट ऑफिस द्वारे आपल्याला लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते. पोस्ट केंद्र सरकारद्वारे चलित असल्यामुळे, या योजना सुरक्षित, चांगल्या आणि हमीदार आहेत, यात शंका नाही. या बचत योजनांमुळे लोकांना पैशाची बचत बचत तर होतेच, पण अनुषंगाने यातील काही योजनांना भारतीय आयकर कायद्याने ८० सी अंतर्गत आयकरात सूट देखील मिळते. पोस्टाच्या बचत योजनांच्या व्याजाचे दर, प्रत्येक तीन महिन्यांनी सरकार निश्चित करते.

पोस्टाच्या विविध लहान बचत योजनांवरील व्याज दर खालीलप्रमाणे आहेत :

क्र.योजनावार्षिक व्याज दर 0१.0४.२0२0 ते ३१.१२.२0२0 पर्यंत
१.पोस्ट ऑफिस बचत खाते४%
२.१ ते ३ वर्षे वेळ ठेव५.५%
३.५ वर्ष मुदत ठेव६.७%
४.५ वर्ष आवर्ती ठेव योजना५ .८%
५.ज्येष्ठ नागरिक बचत योजना७.४%
६.मासिक उत्पन्न खाते६.६%
७.राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (आठवा अंक)६.८%
८.सार्वजनिक भविष्य निधी योजना७. १%
९.किसान विकास पत्र६.९% (१२४ महिन्याची परिपक्वता)
१०सुकन्या समृद्धी खाते योजना ७.६%

| Related : Online Free Courses |फ्री ऑनलाईन कोर्सस ……. Read more.

पोस्टाची बचत खाते योजना | Post Office Savings Account (SB)​​​​​ :

पोस्टमध्ये आता आपण वैयक्तिक किंवा संयुक्त बचत खाते उघडू शकतो. या खात्यांवर वार्षिक ४.0% दराने व्याज मिळतो, हे व्याज कर पात्र आहे. पोस्टाचे बचत खाते आपल्या बँकेच्या खात्या प्रमाणेच असते, हे खाते उघडण्यासाठी किमान ₹ ५00 /- खात्यात जमा करावे लागतात.

राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते (आरडी) | ​NSRD Account (RD)​​

NSRD stands for National Savings Recurring Deposit Account (RD)

भारतीय पोस्ट ऑफिसची आरडी योजना | Indian Post Office RD Scheme In Marathi

एका ठराविक काळात, काही प्रमाणात रक्कम गुंतवणूक करण्यासाठी ही योजना बनविली आहे. या योजने अंतर्गत आपण पोस्ट ऑफिसमध्ये, पाच वर्षांचे आरडीचे खाते उघडू शकतो. या योजनेत किमान गुंतवणुक प्रति माह रुपये १०० आणि जास्तीत जास्त गुंतवणूक रकमेवर कोणतीही मर्यादा नाही, १० च्या पटीत, कितीही पैशाची गुंतवणूक करू शकता. या योजनेवर सध्या ०१/०४/२०२० या तारखे पासून वार्षिक ५.८ टक्के व्याज मिळते.

राष्ट्रीय बचत काळ ठेव खाते (TD) National Savings Time Deposit Account (TD)

एका निर्धारित ठराविक काळासाठी, काही प्रमाणात रक्कम गुंतवणूक करण्यासाठी ही योजना बनविली आहे. या योजने अंतर्गत आपण पोस्ट ऑफिसमध्ये, एक, दोन, तीन, किंवा पाच वर्षांचे टीडीचे खाते उघडू शकतो. या योजनेत किमान गुंतवणुक प्रति माह रुपये १०० आणि जास्तीत जास्त गुंतवणूक रकमेवर कोणतीही मर्यादा नाही, १०० च्या पटीत कितीही पैशाची गुंतवणूक करू शकता. या योजनेवर सध्या ०१/०४/२०२० या तारखे पासून एक, दोन, तीन वर्ष करीता वार्षिक ५.८ टक्के व्याज मिळते. तर पाच वर्षासाठी वार्षिक ६.७ टक्के व्याज मिळते.

| Related : Digital Credit Cards | डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती… Read more.

राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न खाते (MIS) | ​National Savings Monthly Income Account(MIS)

पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना (MIS)

पोस्टाची आणखी एक सुंदर योजना. ही योजना गुंतवणूकदारांना, त्यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेवर, मासिक, त्रैमासिक, सहमसिक आणि वार्षिक स्वरूपात व्याज देते. या योजनेतील किमान गुंतवणुकीची मर्यादा १५०० रुपये आहे, त्यानंतर १००० च्या पटीत, .एका खात्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा ४.५० लाख रुपये आणि संयुक्त खात्यासाठी ९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे. सध्या या योजनेवर ६.६ टक्के व्याज दर आहे. व्याज दर वार्षिक आधारावर गणले जाते.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते (SCSS) | ​Senior Citizens Savings Scheme Account :

ज्येष्ठ नागरिक या योजना ही नियमित व्याज उत्पन्न मिळविण्यासाठी खूप चांगली योजना आहे. ६० वर्ष किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास या योजनेत गुंतवणूक करू येऊ शकते. या योजने मध्ये किमान गुंतवणुकीची रक्कम ही रुपये १०००,आणि कमाल गुंतवणुकीची रक्कम रुपये १५ लाख इतकी आहे. सध्या या योजनेवर ७.४ टक्के व्याज दर आहे. व्याज दर वार्षिक आधारावर गणले जाते.

सार्वजनिक भविष्य निधी खाते | ​​Public Provident Fund Account(PPF )​

ज्या वक्ती सरकारी किंवा इतर कंपनी मध्ये काम करत नाही, ज्यांचा स्वतःचा उद्योग आहे, अशा वक्तींना पीपीएफ या योजनेचा लाभ मिळावा, या हेतूने ही ही योजना सुरु करण्यात आली आहे. पीपीएफ ही दीर्घ मुदतीची गुंतवणूक योजना आहे. या योजनेचा लॉक-इन कालावधी १५ वर्षांचा आहे. या योजनेतील गुंतवणुकीची किमान गुंतवणूक रक्कम आर्थिक वर्षात ५०० रुपये आणि कमाल रक्कम १.५० लाख रुपये प्रति आर्थिक वर्ष आहे. या योजनेवर व्याजदर सध्या वार्षिक ७.१ टक्के आहे. या योजनेत गुंतवणुकीची रक्कम, त्यावरील व्याज आणि परीपक्वता रक्कम या तिन्हीमध्ये आयकरात सूट मिळते.

सुकन्या समृद्धी योजना | ​Sukanya Samriddhi Account (SSA)​Information In Marathi :

पोस्टाची मुलींसाठी सुरु केलेली आणखी एक सुंदर योजना. पालक किंवा कायदेशीर पालक, सुकन्या समृद्धी योजनेत जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाते उघडू शकतात. या योजनेमध्ये एका आर्थिक वर्षातील किमान गुंतवणुक रक्कम २५० रुपये आहे आणि कमाल गुंतवणुक रक्कम १.५० लाख रुपये आहे, ही गुंतवणूक रक्कम ५० पटीत गुंतवू शकतो. सध्या या योजनेवर ७.६ टक्के दराने व्याज मिळत आहे. व्याजाचा दर वार्षिक आधारावर आकारले जातात. या योजनेंतर्गत ज्या मुलीच्या नावे खाते उघडायचे आहे तिचे वय १० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असणे बंधनकारक आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र | ​National Savings Certificates (VIIIth Issue) (NSC) :

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही ५ वर्षासाठी गुंतवणूक करणारी योजना आहे. या योजनेत व्याजदर सध्या ६.८ टक्के आहे. व्याज वार्षिक आधारावर मोजले जाते. सध्या या योजनेचा कार्यकाळ ५ वर्ष इतका आहे. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, ही ठेव कर कपातीसाठी पात्र आहे. या योजनेत किमान रक्कम रुपये १००० तर कमाल रकमेवर कोणतेही बंधन नाही. १०० च्या पटीत ही गुंतवणूक कितीही करू शकतो. १० वर्षांपुढील व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

किसान विकास पत्र | Kisan Vikas Patra(KVP)

किसान विकास पत्र ही तुमची रक्कम दुप्पट करणारी योजना आहे. या योजनेत व्याजदर सध्या ६.९ टक्के आहे. व्याज वार्षिक आधारावर मोजले जाते. सध्याच्या व्याज दर नुस्कार गुंतलेली रक्कम १२४ महिन्यांत दुप्पट होते (म्हणजेच १० वर्षे आणि ४ महिने). हा कालावधी प्रत्येक वेळेनुसार अर्थमंत्रालय द्वारा सुनिश्चित केला जातो. या योजनेत किमान रक्कम रुपये १००० तर कमाल रकमेवर कोणतेही बंधन नाही. १०० च्या पटीत ही गुंतवणूक कितीही करू शकतो. १० वर्षांपुढील व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. २ वर्षे ६ महिन्या नंतर, आवशक्यता असल्यास किसान विकास पत्र जमा करून, खात्यातील जमा रक्कम काढू शकतो.

पोस्ट ऑफिसच्या योजनांचा अर्ज कसा करावा.

(a) खाते कसे उघडावे
(I) योग्य ते फॉर्म योग्यरित्या भरून, स्वाक्षरी करून जमा करावे. खाते उघडण्याचा अर्ज,
केवायसी अर्ज
१) पॅन कार्ड
२) आधार कार्ड, जर आधार उपलब्ध नसेल तर खालील कागदपत्रे सादर जमा करावीत.

१- पासपोर्ट
२. ड्रायव्हिंग लायसन्स
३. मतदाराचे ओळखपत्र
४. राज्य सरकारच्या अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेले मनरेगाद्वारे जारी केलेले जॉब कार्ड
५. नाव आणि पत्त्याचे तपशील असलेले राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरद्वारे जारी केलेले पत्र.

(b )साधारण बचत खात्यासाठी,
i) पालकाचे केवायसी तपशील सादर करावे लागतील.
ii) वरिष्ठ नागरिक VRS खात्यासाठी सेवानिवृत्ती लाभ मिळाल्याचा पुरावा सादर करायचा आहे.
iii) सध्या शाखा पोस्ट ऑफिसमध्ये PPF/SCSS/MIS/KVP/NSC मध्ये खाते फक्त चेकद्वारे उघडता येते.


(c) e-banking/मोबाईल बँकिंग.

(i) संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये नियमाने स्वाक्षरी केलेले विहित फॉर्म सबमिट करून पीओ बचत खात्यावर इबँकिंग/मोबाईल बँकिंग सुविधा मिळू शकते.
(ii) संबंधित पोस्ट ऑफिसद्वारे या सुविधा सक्षम केल्यानंतर, खातेधारकाला खाते उघडण्याच्या ४८ तासांच्या आत https://www.ebanking.indiapost.gov.in वर “नवीन वापरकर्ता सक्रियता” पर्यायामध्ये पुढे जाण्यासाठी सक्रियता कोड मिळेल.

इतर सुविधा :
a) चेक थांबवा – विनंती.
b) मिनी स्टेटमेंट.
c) नामांकन
(i) खाते उघडण्याच्या वेळी नामांकन अनिवार्य आहे आणि ते ४ व्यक्तींसाठी केले जाऊ शकते.
(ii) विहित शुल्कासह संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये विहित अर्ज सादर करून नामांकनात बदल केला जाऊ शकतो.
(iii) खाते कोणत्याही सीबीएस पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या सीबीएस पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकते.
(iv) PPF/SSA/SCSS खाते बँकेकडून पोस्ट ऑफिसमध्ये किंवा त्याउलट हस्तांतरित केले जाऊ शकते.
(iii) खाते हस्तांतरित करण्यासाठी, संबंधित

d) मृत्यूचा दावा

  • ठेवीदाराचा मृत्यू झाल्यास खालील आधारावर पेमेंट करता येते.
  • नामांकन : नामांकित व्यक्तींनी संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये सादर करायची खालील कागदपत्रे.
  • दावा फॉर्म
  • खातेदाराचे मृत्यू प्रमाणपत्र.
  • पासबुक/प्रमाणपत्र.
  • नामांकित व्यक्तीचा आयडी आणि पत्ता पुरावा.
  • दोन साक्षीदारांचा आयडी आणि पत्ता पुरावा.

| Related : Axis Bank Personal Loan | ऍक्सिस बँक वैयक्तिक लोन….. Read more.

Post Office Schemes in Marathi – 2021| पोस्ट ऑफिस योजना :

पोस्ट ऑफिसच्या योजनांचे फायदे आणि वैशिष्ट्ये

  1. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेमुळे गाव-शहरातील सर्वांमध्ये बचतीची सवय लागते.
  2. पोस्टाच्या बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, ज्या काही दीर्घ मुदतीच्या तर काही अल्प मुदतीच्या योजना आहेत.
  3. पैशाची बचत करणे म्हणजेच दुसऱ्या उपान्नाची सोय करणे होय.
  4. पोस्ट ऑफिस गावोगावी असल्यामुळे आपल्याला येथे बचत खाते उघडणे सहज-सोपे होते.
  5. बचत केल्यास आपली आर्थिक परिस्थिती सुधरण्यास मदत होते.
  6. पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजनेचे व्याज दर ४ ते ७.६ टक्के पर्यंत आहेत.
  7. पोस्ट ऑफिस बचत योजना मध्ये अर्ज करणे खूप सोपे आहे.
  8. पोस्टच्या बचत योजना हा सरकारी उपक्रम असल्याने, ह्या पूर्णपणे जोखीम मुक्त आहेत.
  9. पोस्टच्या बचत योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत गुंतवणूकदारास करात सूट मिळते.

Post Office Schemes in Marathi – 2021| पोस्ट ऑफिस योजना

आम्हाला आशा आहे की  Post office Schemes in Marathi ह्या लेख तुम्हाला नक्की आवडला असेल. या लेखात पोस्ट ऑफिस सर्व योजनांची माहिती संक्षिप्त मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला या योजनांची सविस्तर माहिती हवी असल्यास आपण कमेन्ट लिहून आम्हाला सांगू शकता. ती माहिती देण्याचं नक्की प्रयत्न करू.

आम्हाला आशा आहे कि तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपण या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !

अधिक माहिती :

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x