Best Diwali Mahiti In Marathi | दिवाळी माहिती

Diwali Mahiti In Marathi | दिवाळी माहिती :

Get information about Diwali and get the answers to questions like Diwali Mahiti In Marathi. दिवाळी माहिती, Diwali vishayi mahiti. Diwali chi mahiti, Diwali vishay mahiti, Diwali sanachi mahiti. diwali chi mahiti marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण marathirang.com च्या “भारतीय सण” या सदराखाली “दिवाळी” विषयी माहित करून घेणार आहोत. आपण दिवाळी अली म्हणतो, दिवाळी साजरी करूया म्हणतो. पण खरंच दिवाळी कधी सुरु होते, कोणते दिवस महत्वाचे असतात, कधी संपते? दिवाळी का साजरी करतात असे खूप सारे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे आपल्याला माहित नाहीत. आपल्याला लक्ष्मी पूजन आणि भाऊबीज बस हे दोनच दिवस दिवाळीचे आसतात असे समजतो. दिवाळीची संपूर्ण माहिती आपल्याला व आजच्या नव्या पिढीला असावी म्हणून हा लेख लिहत आहोत. (Diwali Mahiti In Marathi)

दिवाळी हा सण दिव्यांचा, रोषणाईचा आहे. भारतातील प्रमुख सणांन पैकी एक. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सारे जण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. शेतकऱ्यांची कंपनीची कामे संपलेली असतात, धनधान्याने कोठारे भरणार असतात. कोजागिरी पौर्णिमे नंतर, थंडीला हळूहळू सुरुवात होते. याच वेळी अश्विन महिना संपता संपता कार्तिक महिन्याच्या सुरुवातीला दिवाळी सुरू होते. इंग्रजी महिन्याच्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचा सण येतो.

दिवाळी साजरी करण्याचे कारण :

दिवाळी हा भारताचा खूप प्राचीन सण आहे. दिवाळी साजरी करण्याबाबतचे वेगवेगळे संदर्भ आणि उल्लेख आपल्या निदर्शनास येतील.
जसे रामायणातील प्रसंगावरून, काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून, प्रभू रामचंद्र रावणावर विजय मिळवून अयोध्येला परत येतात त्या विजयाचा आनंद म्हणून हा सण साजरा केला. १४ वर्षे वनवासात घालवल्यानंतर प्रभू रामचंद्र, माता सीता आणि लक्ष्मण यांच्यासह अयोध्येच्या आपल्या राज्यात परतले. स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सुंदर दिव्यांनी आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजली होती. लोकांनी आपापसात मिठाईही वाटली. म्हणून या दिवशी आपण सारे दिवाळी साजरी करतो, हा विधी आजही काटेकोरपणे पाळला जातो. (Diwali Mahiti In Marathi)

|Related : Ashadhi Ekadashi – In Marathi | आषाढी एकादशी संपूर्ण माहिती… Read More

दिवाळीचे महत्व:

(Diwaliche mahatwa : Diwali Mahiti In Marathi)
दीप हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते, म्हणूनच आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही नेहमीच दीप प्रज्वलन करून करतो. त्यानंतर रांगोळी ही शुभ सूचक मानले जाते. सणासुदीच्या दिवसांत, मंगलकार्यी, शुभप्रसंगी, रांगोळी ही आवर्जून काढली जाते. हेच दिवाळीचे महत्व आहे. दीपोत्सव हा घरासमोर रंगीबेरंगी रांगोळ्या काढून, पणत्या पेटवून, दारासमोर आकाशदिवे लावून, तसेच दरवाज्याला आंब्याची पाने व झेंडूच्या फुलांचे तोरण बांधतो.

दिवाळीची तयारी :

(Diwalichi tayari : Diwali Mahiti In Marathi)
दिवाळीसाठी आपण सारे आपल्या घराची साफसफाई करतो. या निमित्ताने का होईना पण कधी साफ ना केले जाणारे, कोने, अडगळीच्या जागा स्वच्छ केले जातात. घर सुशोभित केले जाते, सणाच्या निमित्ताने नवे कपडे खरेदी करतो. भाऊ-बहीण एकमेकांसाठी भेट वस्तू घेतात. घरात फराळाचे पदार्थ बनवितात. बाजारपेठा विविध प्रकारच्या वस्तूंनी सजलेल्या असतात. नवीन कपडे, दागिने वगैरेंची खरेदी करण्यासाठी बाजारात झुंबड उडालेली दिसते. बाजारपेठा गजबजलेल्या असतात. वातावरणात एक प्रकारचे चैतन्य असते. सणाच्या दिवसापेक्षा त्याची तयारी करण्याची धडपड आणि उत्सुकता जास्त आनंदायी वाटते. सर्वंकडे दिवाळीची जय्यत तयारी चालू असते.
मुलांनाही दिवाळीची सुट्टी असल्याने, त्यांची तर खूप चंगळ असते. मातीचा किल्ला बनविणे, त्यावर मातीची खेळणी, मावळे ठेवतात.
सण आपल्याला दुःख विसरायला लावतात आणि काही दिवसांचे का होईना पण खूप आनंद देतात.

|Related : Jagannath Rath Yatra in Marathi | जगन्नाथ रथयात्रा – माहिती … Read more

दिवाळीची सुरुवात आणि दिवाळीचे दिवस :

१) अश्विन वद्य एकादशी : (रमा एकादशी)

(Rama ekadashi : Diwalicha pahila diwas, Diwali Mahiti In Marathi)
हा दिवाळीचा पहिला दिवस, दिवाळीची खरी सुरुवात या दिवसापासून होते. या दिवशी आपण आपल्या घरासमोर आकाश कंदील लावतो. दिपोत्सवाचा प्रारंभ या दिवशी होतो. रमा म्हणजे लक्ष्मी, समुद्र मंथनातून निघाले पहिले रत्न. या दिवशी लक्ष्मीची पूजा करुन उपवास केला जातो. भगवान विष्णुंना प्रिय अशा तुळशीला प्रदक्षिणा घालतात.या एकादशी व्रत केले जाते.
पापक्षालन करणारी इच्छा पूर्ती करणारी ही रमा एकादशी म्हणजे श्रीविष्णु आणि लक्ष्मीच्या पूजेचे व्रत.

२) वसुबारस (गोवत्सद्वादशी):

(Diwalicha dusara diwas, Vasubaras – Diwali Mahiti In Marathi)
दिवाळीचा दुसरा दिवस. या दिवशी सवत्स (म्हणजे वासरू असलेली गाय) गाईचे पूजन केले जाते.

अश्विन वद्य द्वादशीला वसुबारस असे म्हणतात. ‘वसु’ म्हणजे धनसंपत्ती किंवा द्रव्य, आणि बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्सद्वादशी किंवा गोवत्सबारस असेही म्हणतात. गो म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे गाईचे वासरू.

या दिवशी संध्याकाळी वासरु व गाई यांची पूजा करण्याची प्रथा आहे. देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपादृष्टी असावी, आपल्या मुलाबाळांना, घरच्यांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी वासरासह धेनूची पूजा केली जाते. गाईला आपण गोमाता म्हणतो. गाईचे दूध म्हणजे पूर्णान्न आहे. गोमूत्र, गाईचे शेण यांचा वापर अनेक शुभकार्यात करतो. यांचा उपयोग अनेक ठिकाणी उपचारासाठी केला जातो. अशा बहुगुणी, बहुपयोगी जीवनदायी गोमातेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने गोमातेची पूजा केली जाते.

३) धनत्रयोदशी:

(Diwalicha tisara diwas : Dhan trayodsashi, Diwali Mahiti In Marathi)
दिवाळीचा तिसरा दिवस, अश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात.
यादिवशी सायंकाळी यम दिप दान करतात. म्हणजे कणकीचा (पिठाचा) दिवा करून दक्षिणेकडे ज्योत करून ठेवून देतात. दक्षिण दिशा ही यमदेवतेची दिशा आहे. असे दीपदान केल्याने अकाली मृत्यू टळतो अशी धारणा आहे. घरात कोणाचा अपमृत्यू होऊ नये यासाठी दीप दान करून प्रार्थना केली जाते.

या मागे अशी आख्यायिका आहे की, राजा हेमाचा मुलगा वयाच्या सोळाव्या वर्षी मृत्यू पावणार असतो. मुलाने सर्व ईच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून राजा राजपुत्राचे लग्न लावून देतात. लग्नानंतरच्या चौथ्या दिवशी राजपुत्राचा मृत्यू होणार असतो. या रात्री राजपुत्राची बायको त्याला रात्रभर जागेच ठेवते. महालात त्यांच्या अवतीभवती सगळीकडे सोन्याचांदीच्या मोहरा ठेवते, महालाचे प्रवेशद्वार सोने व चांदी यांनी भरून बंद करते. महालात सर्वत्र दिव्यांची रोषणाई करते. त्यानंतर दोघे गप्पा-गोष्टी करत जागे राहतात.

मृत्यूच्या वेळेनुसार यम सर्परूपाने राजपुत्राच्या महालात प्रवेश करतो. पण महालातील वृषणाईने, दिव्यांच्या आणि सोन्याचांदीच्या लखलखाटाने त्याचे डोळे दिपून जातात. त्याला काही दिसेनासे होते व तो यमलोकात परत जातो. अशाप्रकारे राजकुमाराचे प्राण वाचते.

व्यापारीवर्गात ‘धनतेरस’ या नावाने धनत्रयोदशी साजरी केली जाते. येणाऱ्या आर्थिक वर्ष अधिक भरभराटीचे आणि उलाढालींचे व्हावे या उद्देशाने अफाट संपत्तीचे धनी भगवान “कुबेर” याची पूजन करण्यात येते.

धनत्रयोदशी बद्दल अजून एक आख्ययिका प्रचलित आहे. समुद्रमंथन वेळेस देवी लक्ष्मी सोबत धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन बाहेर आले. त्यामुळे यादिवशी लक्ष्मी आणि धन्वंतरी यांचेही मनोभावे पूजन केले जाते.

धन्वंतरी म्हणजे वैद्यराज होय. त्यामुळे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा दिवस धन्वंतरी खूप महत्वाचा आहे. हा दिवस धन्वंतरी जयंती म्हणून साजरा केला जातो. आयुर्वेदिक चिकित्सक धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) मनोभावे पूजन करतात. या पूजेचा प्रसाद म्हणून कडुनिंबाची बारीक केलेली पाने साखरेसह वाटतात. धन्वंतरी हे आरोग्याचे अधिष्ठात्री दैवत असल्याने दीर्घायुष्य आणि आरोग्याचा लाभ व्हावा अशी प्रार्थना केली जाते.

|Related : Gudi Padwa in Marathi | गुढी पाडवा… Read more.

४) नरकचतुर्दशी:

(Diwalicha chautha diwas, Diwali Mahiti In Marathi)
दिवाळीचा चौथा दिवस: या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करतात, व कारीट (चिरोटे) फोडतात. या दिवसा बाबत खालील पौराणिक कथा आहे.
नरकासुराने आपल्या अखंड तपश्चर्येने ब्रम्हदेवास प्रसन्न केले. ब्रम्हदेवाकडून नरकासुराने कोणाकडूनही वध होणार नाही असे वरदान मिळविले. त्यामुळे नरकासुर अतिशय उन्मत्त झाला होता. त्याने अनेक राजांना पराभूत करून त्यांच्या कन्या, राज्यातील स्त्रियांना अपहरण करून बंदी बनवले होते.

नरकासुराने १६,१०० स्त्रियांना पळवून आणून, मणी पर्वतावर एक मोठे नगर वसवून तिथे डांबून ठेवले. सर्व देवदेवता, गंधर्व, मानव यांना नरकासुर अतिशय त्रास देत होता. त्याच्या अजिंक्य राजधानीवर कृष्णाने सत्यभामेसोबत गरूडावर स्वार होऊन चाल केली.

सत्यभामेच्या मदतीने कृष्णाने नरकासुराचा वध केला. सर्वांना नरकासुराच्या जुलूमातून मुक्त केले. नरकासुराच्या बंदिवासात असणाऱ्या सर्व स्त्रियांना मुक्त करून कृष्णाने त्यांच्याशी विवाह करून त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली.

कृष्णाच्या या पराक्रमाचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
यादिवशी अभ्यंग स्नानाचे महत्व आहे. सूर्योदयापूर्वी उठून, तेल उटणे लावून केलेले स्नान म्हणजे अभ्यंग स्नान. असे अभ्यंग स्नान करून कुटुंबातील सर्वजण फराळाच्या पदार्थांचा आस्वाद घेतात. घरातील मंडळींना, मित्रांना, आप्तेष्टाना दिवाळीच्या शुभेच्छांची देवाण-घेवाण करतात.

५) लक्ष्मीपूजन (अमावस्या):

(Diwalicha pachava diwas, Diwali Mahiti In Marathi)
दिवाळीचा पाचवा दिवस, अश्विन वद्य अमावास्या: या दिवशी संध्याकाळी देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते. या येथे “लक्ष्मी” या शब्दाचा अर्थ केवळ पैसा, धनप्राप्ती किंवा श्रीमंती आ नसून ती “श्री” या संकल्पनेवर आधारित आहे. श्री म्हणजे धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, यश, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, समृद्धि, मान-सन्मान या सर्वगुणसंपन्न अर्थाने अपेक्षित आहे.

हा दिवस लक्ष्मी देवीचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. संध्याकाळच्या वेळी देवीची पूजा केली जाते. तिला ‘संपत्तीची देवी’ म्हणूनही मानले जाते.

प्रदोषकाळी (सायंकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. देवीची पूजा कारतेवेळेस, श्रीमहालक्ष्मीस उत्तम चौरंगावर सुशोभित मांडणी करुन घ्यावे, मनोभावे पूजन करावे. सोबत धन, सुवर्ण, नाणी तुमची गुंगवणूक सदृश्य प्रमाणपत्रे, यांचीही पूजा करावी. पूजा पंचोपचार पद्धतीने करावी, म्हणजे स्नान, धुप, दीप, गंध आणि नैवेद्य अशी करावी. कोणतीही पूजा करताना मनातील भाव हा कृतज्ञतेचा, श्रध्देचा असावा. बरेचवेळा अनवधानाने श्रीविष्णूंचे स्मरण-प्रार्थना करणे राहुन जाते, श्रीमहालक्ष्मी तत्वाचं वैशिष्ठ्य म्हणजे जिथे विष्णूंचे स्मरण-प्रार्थना होते त्या ठिकाणी तिचा निवास रहातो. कारण ती विष्णुंशिवाय रहात नाही. त्यामुळे तिची पुजा अर्चना करण्याआधी विष्णूदेवांचे स्मरण करणे क्रमप्राप्त आहे हे विसरु नका.

नुसते मानसिक स्मरण करून हे मंत्र म्हटले तरी चालेल.
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥ हा मंत्रजप ११ वेळा म्हणावा.

घराघरांमधून दिव्यांची रोषणाई केली जाते. लक्ष्मीला साळीच्या लाह्या आणि बत्तासे यांचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. नवीन केरसुणीची (झाडू) हळदी – कुंकू, फुलेवाहून पूजन करावे. व्यापाऱ्यांसाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो. (Diwali Mahiti In Marathi)

प्राचीन काळी या दिवशी रात्री कुबेर पूजन करण्याची प्रथा होती. कुबेर हा धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. पुढे कुबेरासोबत लक्ष्मीची पूजा केली जाऊ लागली. कालांतराने गणपतीला कुबेराच्या जागी प्रतिष्ठित केले गेले. नित्य वैध मार्गाने धन मिळविणे, अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे या दोन्ही मूल्यांची जोपासना लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने केली जाते.

सर्वात महत्वाचे, :श्रीलक्ष्मीपुजनाच्या दिवशी मांसाहार, मद्यपान किंवा कोणतेही अनैतिक, आणि अशुभ कृत्य करु नये. दिवसभर प्रसन्न राहावे, वादविवाद करु नये. दिवसभरात जमेल तेव्हा अन्नदान करावे. सुवासिनीची ओटी भरावी. कुलदेवतेचे स्मरणचिंतन करावे. लक्ष्मीपुजनाचे वेळी घरच्या ओटीवर/अंगणात दिवे प्रज्वलित करावेत.

श्रीलक्ष्मीदेवीचे काही प्रभावी मंत्रांचा जप १०८ वेळा करावा. जप करणे शक्य नसेल तर निदान प्रार्थना तरी करावी. एक मंत्र माहितीसाठी दिला आहे.

✓ १) ॐ श्री महालक्ष्मी देव्यै नम:

|Related; भारतीय सणांची माहिती… Read more.

६) बलिप्रतिपदा

(Diwalicha sahava diwas, Diwali Mahiti In Marathi)
दिवाळीचा सहावा दिवस, कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलीप्रतिपदा). हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखला जातो. .हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो.

[साडे तीन मुहूर्त: १. गुढी पडावा, २.अक्षय तृतीया ३. दसरा, ४. दिवाळी पाडवा (अर्धा)]


या दिवशी सोने खरेदीस प्राधान्य द्यावे, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांकडून नवीन वर्षाचा प्रारंभ या दृष्टिकोनातून या दिवसाचे महत्व आहे.

एका पौराणिक कथेनुसार पार्वतीने याच दिवशी महादेवांना द्युतात हरविले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा म्हटले जाते.
बळीराजा च्या तावडीतून देवांना सोडविण्यासाठी, भगवान विष्णूंनी वामनावतार धारण करून ते बटूच्या वेशात बळीराजा समोर उभे राहिले आणि त्यांनी तीन पावले भूमी दान म्हणून मागितली. वचनाला जागून बळीराजाने हे दान दिले. वामनावतारात असलेल्या विष्णूंनी महाकाय रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी पहिल्या दोन पावलात व्यापले.

पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने आपण दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी बळीराजाने आपले मस्तक पुढे केले. तेव्हा वामनाने बळीच्या मस्तकावर तिसरे पाऊल ठेवून त्याला पाताळात गाडले. भगवान विष्णूनींनी बळीराजाला पाताळलोकीचे राज्य बहाल केले. या सर्वांसोबत विष्णूंनी वरदानही दिले की कार्तिक शुद्ध प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील, तुझी आठवण काढतील. म्हणून बळीराजाच्या आठवणीत ‘इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना केली जाते.

व्यापाऱ्यांसाठी हा दिवस म्हणजे नवीन आर्थिक वर्षाचा प्रारंभ. लक्ष्मी प्राप्तीसाठी शुभ मुहूर्तावर वहीपूजन या दिवशी केले जाते. जमाखर्चाच्या नवीन वह्या यादिवशी सुरू केल्या जातात. या वह्यांची गंध, हळद कुंकू, फुले व अक्षदा वाहून मनोभावे पूजा केली जाते. उत्तर भारतातील लोक या दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा करतात.
प्राचीन काळी यादिवशी इंद्रदेवाची पूजा करण्याची प्रथा होती. नंतर त्याचे गोवर्धन पूजेत रूपांतर झाले.
श्रीकृष्णाची मनोभावे पूजा करून विविध प्रकारची खाद्यान्ने आणि पक्वान्ने यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. याला अन्नकूट म्हणतात.

दिवाळीच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी घालून पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते. पती आपल्या पत्नीला भेटवस्तू देतो.

७) भाऊबीज :

(Diwalicha satava diwas, Diwali Mahiti In Marathi) (Bhaubij/ Bhaubeej – detail in Marathi)
दिवाळीचा सातवा दिवस, कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.
याच दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला होता, म्हणून या दिवसाला यमद्वितिया असेही म्हणतात.
बीज म्हणजे द्वितीया तिथी.

यादिवशी भाऊ बहिणीच्या घरी जाऊन औक्षण करून घेतो. बहीण आपल्या भावाचे स्वागत गोडाधोडाच्या पदार्थांनी करते. भाऊ बहीणीला ओवाळणी देतो. भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा सण प्रत्येक समाजात असतो. आपल्याकडे भाऊबीजेला अनन्य साधारण महत्व आहे.
उत्तरभारतात राखीपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आता वेगवेगळ्या प्रांतातील लोक कामकजानिमित्त भारतभर विखुरल्यामुळे राखीपौर्णिमा, भाऊबीज सर्वत्र साजरी केली जाते.

अशाप्रकारे दिपावलीचे सात दिवसांचे पर्व सर्व देशभरात मोठ्या प्रमाणात, मोठ्या उत्साहात व झगमगाटीने साजरा केला जातो. (Diwali Mahiti In Marathi)

आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ! .

अधिक माहिती:

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :

➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

So this the complete information about Diwali Mahiti In Marathi.

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x