India’s First Book Village | भारतातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार

India’s First Book Village | भारतातील पहिले पुस्तकाचे गाव “भिलार” : Bharatatil pahile pustakanche gaon, Bhilar :

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात भारतातील पहिले पुस्तकाचे गाव या बाबतची माहिती पाहणार आहोत. एक विलक्षण संकल्पना, जी भारतात पहिल्यांदा राबवली गेली आहे आणि ती आपल्या महाराष्ट्रात असल्यामुळे त्याचा मला अधिक अभिमान वाटतो. ही माहिती संबंध जगाला व्हावी या उद्धेशाने मराठी रंग ही माहिती सविस्तरपणे या लेखात देत आहे. भिलार गाव कशासाठी प्रशिध्द आहे? या लेखात जे प्रश्न आपल्या समोर असणार आहेत, त्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे या लेखात मिळवून घेऊ. चला तर करूया सुरुवात, आणि समजूया पुस्तकाचे गाव.

पुस्तकांचे गाव :

“पुस्तकांचे गाव” याबद्दल मी माझ्या मित्रा कडून ऐकलं होतं, पण नक्की काय आहे ते माहित न्हवतं. म्हणून एक दिवस ते काय आहे हे पाहण्यासाठी स्वतःच भेट द्यावी आसा विचार केला. आणि योगा-योगाने तो क्षण आला, आम्ही सह कुटुंब महाबळेश्वरला गेलो असताना वाईला जात वेळेस “पुस्तकांच्या गावाला” भेट दिलीच. मुद्दामून गाडी भिलार कडे वळवली आणि हा काय प्रकार आहे याची खात्री करावी म्हणून एकदा जाऊन पाहावे असा विचार केला. भिलार मध्ये शिरल्यावर, तेथील गावातील भिंतींवर, घरांवर, पुस्तकांच्या संदर्भातली सुरेख आणि रेखीव चित्रे काढलेली दिसली. गावातील कोणत्या घरात कोणत्या विषयाची पुस्तके आहेत, याच्या ठिकाणाचा एक नकाशाही लावला आहे. विचारत-विचारत आम्ही पुस्तकाचे गाव ही संकल्पना राबवत असलेल्या कार्यालयात पोहचलो.

कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने, आमचे हसत स्वागत केले, आमच्या सारखे अजून काही जण आले होते. सर्वाना बसायची व्यवस्था केली जाते. टीव्ही वर एक माहितीपर छोटी चित्रफीत दाखविली जाते व या संकल्पनेची रीतसर माहिती दिली पुरविली जाते.

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाचगणी पासून आठ कि.मि. आंतरावर व थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर पासून साधारण चौदा कि.मि. अंतरावर असलेले हे भिलार गाव. पूर्वी स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले हे गाव आता “पुस्तकांचे गाव” म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाले आहे. एका छोटाश्या गावाने भारतातील पहिले “पुस्तकांचे गाव” होण्याचा मान पटकावला आहे.

संकल्पनेची रूपरेषा :

गावातील काही घरांमध्ये आपल्या घरातीलच एका खोलीत, पुस्तकांचे ग्रंथालय बनवले आहे. स्वतःच्या खुशीने आणि आनंदाने त्यांनी हे स्वीकारले आहे. त्यामुळे तेथे पुरसके वाचायला येणाऱ्यांचे अतिशय प्रसन्नतेने स्वागत केले जाते. तिथेच बसून वाचनाची सोय केली आहे, वाचनासाठी आवश्यक असे वातावरण होईल याची पूर्ण काळजी घेतली आहे. पुस्तकांची मांडणी, त्याने वर्गीकरण, शांतता आणि तेथील थंड वातावरण यामुळे वाचनासाठी अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होते. आपल्याला हवे ते पुस्तक आपण घेऊ शकतो आणि तेथेच वाचनासाठी बसू शकतो. इतकं सर्व संपूर्णपणे निःशुल्क आहे. खरंच आहे ना एक वेगळी संकल्पना.

विनोदी, ऐतिहासिक, कादंबऱ्या, नियतकालिके, राजकारण, यश, दिवाळीअंक, बोलकी पुस्तके अश्या वेग-वेगळ्या ३० पेक्षाही अधिक प्रकारचे वर्गीकरण वेग-वेगळ्या घरात, हे पुस्तकालय केले आहे. प्रत्येक पुस्तकालयात पुस्तकसूची आहे, ज्याचा फायदा आपल्याला हवं असणारं पुस्तक तिथल्या तिथंच मिळतं. विविध वर्तमानपत्रात भिलारसंबंधित छापून आलेल्या बातम्यांची कात्रणे असलेली वही तिथे ठेवली आहे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा, अनुभव आणि अभिप्राय लिहण्यासाठी “अभिप्राय वही” ही ठेवली आहे. ही वही त्याच्या कार्यालयात ही ठेवलेली आहे. याचा उपयोग, त्यातील सूचना नुसार आवश्यक तो बदल किंवा सुधारणा करण्यासाठी होतो, असे तेथील सर्वांचे मत आहे.

संकल्पनेची प्रेरणा :

कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या माहिती नुसार ही संकल्पना महाराष्ट्र शासनाचे माजी शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांची. त्यांचाच मार्गदर्शनाने व पुढाकाराने, हा आगळावेगळा उपक्रम राबविला गेला आहे. माजी मुख्यमंत्री श्री. देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते, ४ मे २०१७ रोजी “पुस्तकांचे गाव” याचे उद्घाटन झाले. प्रकल्प सुरू झाला, त्यावेळी सुमारे १५,००० पुस्के होती, आता ही संख्या २५,००० हुन जास्त झाली आहे. सध्या यातील सर्वच्या-सर्व पुस्तके मराठीत आहेत. घरांच्या ठिकाणी पुस्तके वाचण्याची सुविधा आहे. पुस्तके खरेदी करायची असतील तर ती तेथील प्रकल्प कार्यालयात.

श्री. विनोद तावडे जेंव्हा ब्रिटनला गेले होते, तेंव्हा त्यांनी “Hay on Wye” या नावाचे एक गाव आहे. पुस्तकांची दुकाने, व साहित्य संदर्भातील उत्सव-उपक्रमांसाठी ते प्रसिद्ध आहे. या गावाला तेथे “the town of books” असे ओळखले जाते. याच विषयाला अनुसरून, भिलार गावाला “पुस्तकांचे गाव” बनविण्याची प्रेरणा मिळाली, असे समजते. अशा प्रकारची सुविधा आणि संकल्पना असलेला भारत जगातील ४० वा तर आशियातील तिसरा देश आहे. या संकल्पनेची सुरुवात सर्वात पहिली चीन पासून झाली होती, .

महाबळेश्वराच्या कुशीत असल्यामुळे आल्हाददायक हवामान आढळते. वार्षिक सरदारी तापमान १७-२१ सेल्सिअस इतके असते. वाचनासाठी येणाऱ्या लोकांच्या खाण्याची सोय म्हणून, अल्पोपहार, भोजनगृहेही आहेत. स्ट्रॉबेरी साठी प्रसिद्ध असल्यामुळे आजही येथे हंगामा नुसार अनेक ठिकाणी स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते.

अशा या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन, प्रत्येक पुस्तकप्रेमीने एकदा तरी भेट द्यावी आणि पुस्तकांच्या जंगलात स्वतःला हरवून घ्यावे, असे हे गाव नक्कीच आहे. ते माझ्या महाराष्ट्रात आहे, याचा मला त्याहून जास्त अभिमान आहे.

FAQ:

१) भारतातील पुस्तकाचे गाव भिलार कोठे आहे?
उत्तर : भारतातील पुस्तकाचे गाव भिलार महाराष्ट्रातील, सातारा जिल्हा, महाबळेश्वर येथे आहे.

२) भिलार गावाची वैशिष्ट्ये काय ?
उत्तर : भिलार गावाची वैशिष्ट्ये म्हणजे, हे संबंध भारतातील पहिले पुस्तकाचे गाव आहे, येथे ?

३) भिलार हे गाव काय म्हणून ओळखले जाते?
उत्तर : भिलार हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते?

४) भिलार गावाला पुस्तकांचे गाव असे का म्हटले जाते ?
उत्तर : भिलार गावाला पुस्तकांचे गाव म्हटले जाते, कारण येथील प्रत्येक घरात वाचनासाठी पुस्तके ठिवलेली आहेत.

५) महाबळेश्वरजवळील भिलार हे __ गाव प्रसिद्ध आहे
उत्तर : महाबळेश्वरजवळील भिलार हे पुस्तकांचे गाव प्रसिद्ध आहे.

आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !

अधिक माहिती :

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!