Vat Purnima Information In Marathi | वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती

Vat Purnima Information In Marathi | वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती : नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात वट सावित्री या व्रता विषयीची माहिती पाहणार आहोत. वट सावित्री हा व्रत का केला जातो? वट सावित्री या व्रता मागची कथा काय आहे? हा व्रत का साजरा केला जातो? कधी आणि कशा प्रकारे साजरा करायचा आणि त्या मागील शास्त्रीय कारण काय आहे. या साऱ्या प्रश्नांची उत्तरं या लेखात घेणार आहोत.

वटपौर्णिमा म्हणजे काय ?

हिंदु संस्कृती प्रमाणे ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा, हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. या व्रतादरम्यान सुवासीनी (विवाहित) स्त्रिया आपल्या पतीला दिर्घायुष्य प्राप्त व्हावं, उत्तम आरोग्य लाभावे, कुळाचा विस्तार व्हावा म्हणून वटपौर्णिमेला, वडाच्या झाडाची पूजा करतात. या व्रताची मुख्य देवता सावित्रीसह ब्रह्मदेव असून, सत्यवान, नारद व यमधर्म हे इतर देवही येतात. भारतात प्रसिद्ध पतिव्रता स्त्री म्हणून सावित्रीलाच आदर्श मानलं जात. तसेच तिला अखंड सौभाग्यचे प्रतीकही मानले जाते. यंधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने त्याच्याशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने तीन वर देऊ केले. ही शास्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली; म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले.

वटसावित्री व्रत म्हणजे काय ?

खरं तर वटसावित्री व्रत हा तीन दिवसांचा असतो. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून ज्येष्ठ पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले आहे. पण तीन दिवस उपवास करणे महिलांना शक्य नसल्यामुळे त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा.

जुनी व्रत विधी :

नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी. त्या पात्रात सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्यात. त्यांची हळदी-कुंकू, फुलांनी मनोभावे पूजा करावी. सवित्राची प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी. या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली आहे. पण आता बदलत्या काळानुसार मूळ रूढी सोडून, वेगळी प्रथा केली जात आहे.

योगी अरविंद यांनी आध्यात्मिक परिभाषेतून सावित्रीचे महत्त्व सांगणारे ‘सावित्री‘ हे महाकाव्य लिहिले आहे. वाचण्यास मिळाले तर नक्की वाचन करा.

वटपौर्णिमेची पौराणिक कथा :

वटपौर्णिमेची पौराणिक कथा – Vat Pornimechi Pauranik Katha :

अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.

शाल्व राज्यातील धृमत्सेन राजा होता. धृमत्सेन राजा आणि त्याची पत्नी हे दोघे अंध होते. त्यांना एक मुलगा होता, ज्याचे नाव सत्यवान. सावित्रीने या सत्यवानाची निवड केली.

आधीच्या झालेल्या युद्धात, शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा धृमत्सेन जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत होते. त्यामुळे भगवान नारदाने सावित्रीला, सत्यवाना सोबत लग्न नकारण्याचा सल्ला दिला.

पण सावित्रीने, सत्यवानाला ही सर्व माहिती ना घेता, सत्यवानालाच आपला पती म्हणून स्वीकार केले होते. म्हणून तिने सत्यवानाशी विवाह करण्याचा आग्रह केला. अखेर सावित्री व सत्यवान यांचे लग्न झाले. लग्नानंतर तीही नवऱ्यासोबत जंगलात येऊन सासू सासऱ्याची सेवा करू लागली.

विधी लिखिता नुसार सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा सावित्रीने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडत असता, घेरी येऊन तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला.
सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमधर्माने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्याचा सल्ला दिला पण तिने काहीही न मनात, आपल्या पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. येथेच यमधर्म आणि सावित्री यांच्यात शास्त्रात चर्चा झाली. अखेर यमधर्माने, सावित्रीस पती सोडून इतर कोणतेही तीन वर मागण्यास सांगितले.

सावित्रीने मागितले तीन वर :

१) सासू-सासऱ्यांच्या डोळ्यांची दृष्टी परत मिळवी.
२) सासू-सासऱ्यांचे हरवलेलं राज्य आणि वैभव परत मिळवे.
३) स्वतःचा वंश वाढावा.

यमराजाने घाईघाईत तीला तथास्तु म्हणून वर दिला, त्याच क्षणी यमधर्म ला आपल्या चुकीची जाणीव झाली. पण वचन पूर्ती म्हणून यमराजाला, सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. यमराज आणि सावित्री यांच्यात झालेली शास्त्रात चर्चा आणि सत्यवानाचे प्राण परत मिळाल्या नंतर जिवंत होण्याची घटना ही वडाच्या झाडाखालीच झाली होती. तो दिवस होता ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा. म्हणून ह्या दिवशी सावित्रीची पूजा करून स्त्रिया वडाच्या झाडाची ही पूजा करतात. या दिवशी उपवास करून वट सावित्री व्रताचे आचरण करतात.

या कथेतून आपल्या समोर सावित्रीचे आदर्श व्यक्तिमत्त्व उभं राहतं. समोर आलेल्या परिस्थितीचा सामना करण्याची प्रबळ इच्छाशक्तीत. आपल्या पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम चिकाटीने, दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करण्याची हुशारी. अशक्य कामही करू शकतो याचा विस्वास. असे अनेक उपदेश या कथेतून मिळतात.

वटपौर्णिमा पूजा कशी करायची?

सौभाग्यवती स्त्रीने मला व माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारचा संकल्प करावा. त्या नंतर वाडाच्या झाडाची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करावी.

पूजेसाठी लागणारे साहित्य :
धुप, दीप, अगरबत्ती, तूप, पाच प्रकारची फळं, दिवा ठेवण्यासाठी रोवळी, वडाला गुंडाळण्यासाठी पंढरा मोठा धागा, हळद, कुंकू, पंचामृत (तूप, दूध, दही, मध, साखर – यांचे सम प्रमाण) लहान हिरव्या बांगड्या. ही पूजा वडाच्या झाडा जवळ जाऊन करायची असते.

पूजेची कृती :

या पूजेमध्ये अभिषेक झाल्यानंतर. पंढरा धागा झाडाभोवती गुंडाळावा. हा धागा गुंडाळताना आपला उजवा हात आतल्या बाजूला राहील याची काळजी घ्यावी. अनेक ठिकाणी ३ फेऱ्या मारतात, तर काही ठिकाणी ७ फेऱ्या मारतात. ज्या ठिकाणी जशी प्रथा असेल, साधारणतः त्या प्रमाणे कृती करावी.

पूजेच्या शेवटी अखंड सौभाग्य लाभू दे, जन्मो-जन्मी हाच पती लाभू दे, आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे आणि धन-धान्याची, कुळाची वृद्धी होउदे अशी प्रार्थना सावित्रीस करायची. नंतर ब्रम्हदेवास ही अशीच प्रार्थना करायची आहे.

ज्या स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात, त्यांनी संपूर्ण दिवस हा उपवास करायचा असतो. हा उपवास रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला तरी चालतो.

.

वट पौर्णिमेची बदलत्या काळा नुसार पूजा विधी :

वट पौर्णिमेला अगदी अलीकडच्या काळात, एक फांदी तोडून अणलीजाते आणि तिची घरी पूजा केली जाते.
हे खूप चुकीचे आहे, एक लक्षात ठेवा जेंव्हा फांदी तोडली जाते तेंव्हा ती निष्प्राण होते त्या फांदीत झाडाचा जीव राहत नाही. अशा निष्प्राण फांदीची पूजा करून काहीच साध्य होणार नाही. अशी पूजा कधीच सफल होणार नाही. शिवाय अशा फांदया तोडल्याने वृक्ष तोड झाल्या सारखंच आहे,नाही का?

घराच्या घरी आपण पौर्णिमा साजरी करणार असाल, तर त्यासाठी एक छोटासा चौरंग घ्या. हा चौरंग घराच्या मोकळ्या जागेच्या मध्येभागी ठेवावा. त्या चौरंगावर गंधाने वटवृक्षाचे छोटे चित्र रेखाटा. आणि चित्र म्हणजे खरोखरचे वटवृक्षाचे झाड आहे आणि आपण त्या झाडाच्या खाली बसलो आहोत असा भाव निर्माण करून वरील प्रमाणे विधिवत पूजा पूर्ण करावी.

जर त्या पाटा भोवती प्रदक्षिणा घालने शक्य असल्यास त्या पाटाभोवती सुताचे वेष्टन गुंडाळू शकता. अथवा बसूनच पाटाभोवती सुताचे वेष्टन गुंडाळू शकता. अर्थातच ज्याच्या मनात जसा भाव तशी त्याची कृती.
पती सोबत स्वतःसाठी ही आरोग्यसंपन्न दीर्घायुष्याची, धन-धान्याच्या भरभराटीची, कुळाच्या वृद्धीची प्रार्थना करा.

वटवृक्षाचीच पूजा का करावी?

वडाच्या झाडा मध्ये प्रत्येक्ष ब्रह्म, विष्णू, महेश, नृपसिंह, निल आणि माधव यांचा निवास असतो, अशी मान्यता आहे. वडाच्या प्रयाग चा अक्षय वटवृक्ष होता, त्याठिकाणी राम, लक्ष्मण आणि सीता विसावले होते. सावित्रीची कथा याच झाडाखाली झाली होती.

वडाप्रमाणे, पिंपळ, अवदुंबर, शमी हे सुद्धा पवित्र आणि यज्ञ वृक्ष म्हणून धर्म शास्त्रात वर्णिले आहेत. या सर्वात वटवृक्ष हा सर्वात जास्त काळ जगणारा वृक्ष आहे, त्याचे आयुष्य हे सर्वाधिक असते. वडाच्या पारंब्या मुळे या झाडाचा विस्तारही सर्वात जास्त होतो, म्हणून.

शास्त्रीय कारण :

➦ हिंदु संस्कृतीचे अध्ययन केले असता असे लक्षात येते की अनेक सण, परंपरा या निसर्गाशी जोडलेल्या आहेत. त्याचे काहींना काही निसर्गाशी उद्देश असतोच असतो. भारतीय संस्कृतीत प्राण्यांना, वृक्षांना देवाच्या स्थानी विराजमान केले आहे. उदा. पोळा (बैलाची पुजा), नागपंचमी (नागाची पुजा), वसुबारस (गायीची पुजा), गुडीपाडव्याला (कडुलिंबाच्या आणि आंब्याच्या पानांचे महत्व), दसऱ्याला (आपटयाच्या पानांचे महत्व), वटपौर्णिमा (वडाच्या वृक्षाची पुजा). अजून बरेच सांगता येतील.

➥ वड, पिंपळ, कडुलिंब या वृक्षांना दिर्घायुष्य मिळालेलं आहे. आयुर्वेदात देखील त्याचे महत्व सांगितले आहे. या झाडांना पुजेत स्थान दिला आहे. त्यामुळे मुळे या झाडांची वृक्ष तोड होत नाही. जास्तीत जास्त रोपण केले जातात. जेथे मंदिर आहे तेथे ही झाडे लावली जातात, जोपासली जातात, त्यांची वाढ केली जाते. त्यांना कापण्याचा सहसा विचार केला जात नाही म्हणुन वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी.

➦ वट सावित्रीच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पुजा करतात, त्याला धागा गुंडाळतात आणि त्याच्या छायेत वेळ घालवतात. आयुष्यभराच्या धक्का-बुक्कीत निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ घालवता यावा, त्यांना निसर्ग सुखाची अनुभुती घेता यावी म्हणून समाजाकडून दिली जाणारी हक्काची वेळ.

➥ पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने झाडांचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.

➥ वट वटपौर्णिमा ही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच येते, या दिवसात वृक्षा रोपण केल्यास, झाडे लवकर रुजतात, त्याची चांगली वाढ होते. म्हणून वट वटपौर्णिमेचे अवचित्त साधून वृक्षांचे पूजन करून, त्यांना महत्व देऊन. नव्या पिढीला झाडांचे महत्व सांगता येते. एक चांगला आदर्श ठेवला जातो. त्यांना वृक्षा रोपण करण्यास प्रेरित करत येतं. परंपरेतून निसर्ग संवर्धनाचा वारसा भारतीय संकृतीतूनचं दिला जाऊ शकतो.

प्रार्थना :

सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त आहे. त्याच्या पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा दीर्घायुषी आणि विस्तृत वटवृक्षा प्रमाणे “मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’, अशी प्रार्थना करतात.

वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:। वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।।

अधिक माहिती :

आम्हाला आशा आहे की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

आवश्यक लिंक्स :
शैक्षणिक माहितीसाठी : येथे क्लीक करा.
खेळांविषयी च्या माहितीसाठी : येथे क्लीक करा.

I hope you get all the asweres to the questions like vat savitri vrat katha, vat savitri puja vidhi, vat savitri katha, वट सावित्री व्रत में क्या खाना चाहिए, सत्यवान सावित्री, वट सावित्री व्रत कब मनाया जाता है|

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x