Zydus cadila vaccine COVID-19| झायडस कॅडिला कोविड लस

Zydus Cadila’s Needle-Free COVID-19 Vaccine | Zydus Cadila Vaccine / zydus cadila covid vaccine.

झायडस कॅडिलाच्या वॅक्सीनचे नाव (zydus cadila vaccine name) ” ZyCoV-D” आहे.

Zydus Cadila vaccine approval :

झायडस कॅडिलाच्या सुईमुक्त कोविड -19 लस (Zydus Cadila Covid 19 Vaccine/), भारत सरकारने मंजुर केले आहे. म्हणून वेळ आहे आता या वॅक्सीन विषयी जाणून घेण्याची.

वॅक्सीन विषयी सर्वसाधारण माहिती :

झायडस कॅडिलाच्या सुईमुक्त कोविड -19 लसीबद्दल पूर्ण स्पष्टीकरण : भारतीय औषध नियंत्रक संघ [The Drug Controller General of India (DCGI)] ने झायडस कॅडिलाची सुई-मुक्त लस, ZyCoV-D हि जगातील पहिली डीएनए आधारित लस आहे जी SARs-COV-2 विषाणू.विरोधात वापण्यास भारत सरकारने मंजुरी दिली आहे. आता ZyCoV-D हि भारतातील मंजूर केलेली सहावी COVID लस आहे.
तुम्हाला या लसीसंदर्भात बरेच प्रश्न असतील, जसे Zydus Cadila’s ZyCoV-D ही प्लाझ्मिड डीएनए लस आहे का? ZyCoV-D ही सुईमुक्त लस आहे, ती कशी कार्य करते? ह्या लसचे किती डोस घ्यावे लागतात ? कॅडिलाची ZyCoV-D लसीची प्रभावीता किती आहे? मुलांसाठी ते पुरेसे सुरक्षित आहे का? ते कधी वापरासाठी उपलब्ध होईल?
आपण या लेखात या सर्व प्रश्नांची उत्तरे वाचणार आहेत.

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, अहमदाबाद येथे स्थापित फार्माची सर्वात मोठी कंपनी झायडस कॅडिला याने, भारतात लसीसाठी सर्वात मोठी क्लिनिकल चाचणी घेतली, त्या रिपोर्टच्या आधारे सरकारकडे परवानगी मागितली होती. २० ऑगस्ट २०२१, रोजी भारत सरकारने या लस साठी मंजुरी दिली आहे.
सध्या, भारतात “भारत बायोटेकचे कोव्हॅक्सिन”, “ऑक्सफोर्ड-एस्ट्राझेनेकाचे कोविशील्ड”, “रशिया निर्मित स्पुतनिक-५”, “मॉडर्ना लस” आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या “जॅन्सेन लसीला” आपत्कालीन वापराच्या प्राधिकरणासाठी (EUA) मान्यता मिळाली आहे. आणि आता ZyCoV-D भारतात मंजूर झालेली सहावी COVID-१९ ची लस आहे.

| Related : Online Free Courses |फ्री ऑनलाईन कोर्सस ……. Read more.

वॅक्सीनचे स्वरूप :

Zydus Cadila ची ZyCoV-D ही एक ‘प्लास्मिड डीएनए’ लस आहे जी प्लास्मिड नावाच्या डीएनए रेणूची नक्कल न करणारी आवृत्ती या तत्वावर काम करते. जी SARS-COV-2 पडद्यावर असलेल्या स्पाइक प्रोटीनची निरुपद्रवी आवृत्ती तयार करण्यात मदत करते.

प्लास्मिड डीएनए लस असल्याने, ZyCoV-D ला परिणाम-आधारित प्रतिकारशक्तीशी संबंधित कोणतीही समस्या येत नाही. प्लास्मिड डीएनए प्लॅटफॉर्म व्हायरसमधील उत्परिवर्तनांना सामोरे जाण्यासाठी त्वरीत नवीन रचना निर्माण करण्यास खूप मदत करत, त्यामुळे ही जास्त परिणामकारक ठरते. हि लस, तृतीय पिढीची लस म्हणूनही ओळखली जाते, डीएनए-आधारित लस, विषाणूविरूद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी डीएनएचा इंजिनीयर प्रमाणे काम करते.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, हा एक पारंपारिक लसीं व्यतिरिक्त अनेक फायदे देणारा एक उत्तम दृष्टीकोन आहे. या लसीमुळे “लसीची स्थिरता सुधारते.

Zydus Cadila ची कोविड लस हि जगभरातील इतर उपलब्ध असलेल्या लसींपेक्षा खूप वेगळी आहे. SARs-COV-2 विषाणूशी लढण्यासाठी ह्या सर्व लसी विकसित करण्यात आल्या असताना, प्रत्येक कंपनीच्या डोसची संख्या ही भिन्न आहे, हे आपल्याला माहित आहे त्याप्रमाणे या लसच्या डोसची संख्या ही भिन्न आहे

Zydus Cadila ची कोविड लसचे काही फरक लक्षात घावे लागतील. घेण्यासारखे आहेत आणि ते इतर कोविड लसींशी कसे तुलना करतात.

ZyCoV ची परिणामकारकता किती ?

Zydus Cadila vaccine update :
Zydus Cadila च्या लसीचे ३ फेज मध्ये परीक्षण करण्यात आले. हे परीक्षण 28,000 हून अधिक स्वयंसेवकां वर करण्यात आले. त्यांच्या अहवाल नुसार झायडस कॅडिलाच्या COVID लसीचे, RT-PCR पॉझिटिव्ह व्यक्तींवर 66.6% परिणामकारकता दर दर्शविली आहे.
तसेच लसीच्या तिसऱ्या डोसनंतर, हे लक्षात आले की ZyCoV घेतलेल्या व्यक्तीं पैकी, कोविडचे कोणतेही प्रकरण दिसून आले नाही.

तसेच, लसीचा दुसरा डोस घेतलेल्या लोकांमध्ये कोणताही गंभीर आजार किंवा मृत्यूची नोंद नाही, ही सर्वात जमेची बाजू आहे.

कंपनीने विकसित केलेल्या लस च्या विकासासंदर्भात बोलताना, झायडस ग्रुपचे अध्यक्ष म्हणाले, “कोविड -19 शी लढण्यासाठी सुरक्षित, सहनशील आणि प्रभावी लस देण्याचे आमचे प्रयत्न ZyCoV च्या रूपाने प्रत्यक्षात आले, याचा आम्हाला खूप आनंद आहे. ZyCoV-D जगातील पहिली डीएनए लस आहे, अशा निर्णायक क्षणी कोणत्याही आव्हानांना न जुमानता, भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनाला आणि त्यांच्या नवनिर्मितीच्या भावनेला माझा सलाम आहे”.

Zydus Cadila ची कोविड लस कश्या प्रकारे दिली जाते ?

Zydus Cadila Corona Vaccine mode is :

इतर कोविड लसींच्या विरोधात, झायडस कॅडिलाची कोरोनाव्हायरस लस ही सुई-मुक्त आहे. मुलांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. हि लस तीन डोस मध्ये प्रसारित करण्यात आली आहे. ‘जेट इंजेक्टर’ या तंत्राचा वापर करून दिले जाणार आहे. सुईने त्वचेला टोचून औषध इंजेक्शन देण्याऐवजी, लस द्रवपदार्थ थेट त्वचेच्या वरच्या थरातून उच्च दाबाचा वापर करून, दिले जाणार आहे.

या लसीच्या विकासाच्या आधुनिक जगात, सुईविरहित (needle-free) लस हा तसा नवीन शोध नाही. या अगोदरही हे तंत्र वापरले गेले आहे. सर्व प्रथम हे तंत्र 1866 मध्ये विकसित झाले होते व 1960 च्या दशकात हि लसीकरण पद्धत वापरातही अली होती.

सुईने दिलेल्या इंजेक्शन मुले, हात सुजणे, ज्या जागी इंजेक्शन दिला आहे तेथे दुखणे, वेदना होणे हे प्रकार खूप होतात. बरेच जण त्यासाठी घाबरून इंजेक्शन घेण्याचे टाळतात. पण सुई-मुक्त लसींच्या मदतीने हे सारे दुष्परिणाम टाळता येतात.

| Related : Akshay Tritiya in Marathi | अक्षय तृतीया … Read more.

लसचे किती डोस घ्यावे लागतात ?

सध्या भारतात दिल्या जाणाऱ्या इतर COVID लसींच्या तुलनेत, ZyCOV-D लसीचे तीन डोसचे घ्यावे लागणार आहेत.
पहिला डोस – 0 दिवस ,
दुसरा डोस – 28 दिवसानंतर आणि
तिसरा डोस – 56 दिवसानंतर दिले जाणार आहेत.
कंपनीचे रिसर्च कार्य चालू, ते दोन-डोस लसीवरही काम करत आहे, भविष्यात यश मिळाल्यास लस दोन-डोस मर्यादित होईल.

काय मुलांसाठी हि लस सुरक्षित आहे ?

ZyCoV-D हा १२ ते १८ वर्षा वयाच्या मुलांसाठी वापरण्यासाठी पात्र ठरलेली पहिली लस आहे. त्यामुळे भारत सरकारच्या मान्यते नुसार हि लस मुलांसाठी सुरक्षित आहे.

भारत बायोटेक ची कोवाक्सिन, लहान मुलांसाठी प्रभावी लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सध्या ही लस २ ते १८ वर्षांच्या वयोगटात वापरण्यासाठी, परीक्षणाची चाचणी चालू आहे.

लसीची उपलब्धता कधी पासून होईल ?

zydus cadila vaccine launch date :
कंपनीच्या (zydus cadila Vaccines Department) मते, अधिकृतता मिळाल्यानंतर ही लस 45 ते 60 दिवसांच्या आत, उपलब्ध करून दिली जाईल. सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबर च्या सुरुवातीस हि वॅक्सीन उपलब्ध होऊ शकेल.
zydus cadila vaccine latest news : लसीची किंमत अद्याप माहिती दिलेली नाही, पण ZyCoV-D लस वितरणापूर्वी किंमत जाहीर केली जाईल असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

सांगता (Raksha Bandhan 2021) :

आम्हाला आशा आहे कि तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपण या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील कमेंटमध्ये सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ! .

अधिक माहिती :

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x