Importance of Holi In Marathi | होळी सण आणि सणाचे महत्व काय? Best Info
Importance of Holi In Marathi : होळी म्हणजे काय ?। होळीचे महत्त्व आणि कथा जाणून घेऊया
नमस्कार मित्रांनो, आज आपण “marathirang.com” च्या “भारतीय सण” या सदराखाली “होळी” या सणा विषयी माहित (Holi chi mahiti in Marathi) करून घेणार आहोत. आपण होळी आली, चला होळी आणि रंग पंचमी साजरी करूया म्हणतो. पण खरंच याविषयी काही माहिती आहे का? जसे, होळी का साजरी केली जाते? होळीचा महत्व काय? होळी चा इतिहास? (History of Holi), त्यामागे शास्त्रीय कारण काय? (Scientific reason behind Holi), होळी सणा बद्दल माहिती काय ? (Holi Information In Marathi).
असे खूप सारे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे आज आपण या लेखा द्वारे माहित करून घेणार आहोत. होळीची संपूर्ण माहिती आपल्याला व आजच्या नव्या पिढीला असावी म्हणून हा लेख लिहत आहोत. (Importance of Holi In Marathi)
Table of Contents:
होळी कधी साजरी केली जाते :
Lets understand the Importance of Holi In Marathi and why Holi is celebrated.
फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी साजरी करतात. होळीसाठी आपण सर्व घराची साफ-सफाई करतो, घर नीट आवरतो. सणांच्या निमित्ताने आपण प्रत्येक महिना भाराच्या अंतराने घराची आवरा-आवर करत असतो. प्रत्येक राज्यानुसार आणि गावानुसार आवडीचे गोड पदार्थ बनवले जातात. जसे महाराष्ट्रात पुरणाची पोळी, करंज्या, पापड्या बनवल्या जातात. रात्री छान नटून-थटून, पूजेचे ताट घेऊन होळीच्या पूजेसाठी जातात. होळीची मनोभावे पूजा करून, सणाचा आनंद घेतात. त्यानंतर रात्री होळीचे दहन केले जाते.
होळीदहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना, जुन्या कटू आठवणींना होळीच्या आगीत जालन्याचे महान प्रतीक मानले जाते. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.
पूर्वी आपल्याकडे होळी ८ दिवस आधी पासूनच सुरु व्हायची, संपूर्ण गाव एकत्र असायचा, मुलांची खूप चंगळ असायची. होळीची आतुरतेने वाट पाहायची. पण आता वेळे अभावी लोक सणही थोडक्यात आटपू लागेल आहेत १५ दिवसांचा हा सण दोन दिसत उरकू लागलेत.
|Related : Ashadhi Ekadashi – In Marathi | आषाढी एकादशी संपूर्ण माहिती… Read More
रंगपंचमी केव्हा असते?
मराठी महिना फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची महाराष्ट्राची अविरत परंपरा आहे आणि म्हणूनच हा दिवस रंगपंचमी म्हणून ओळखला जातो. पण उत्तर भारतातील परंपरा ही होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे धुळवड म्हणजेच धूलिवंदन याच दिवशी रंग खेळण्याची प्रथा आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे.
होळीच्या दुसर्याच दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. शिशिर ऋतू संपून – नव्या वसंत ऋतूचे आगमन होते. याच ऋतूत झाडांची वाळलेली पाने आणि सुकलेली लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा मुख्य उद्देश असे. होळीसाठी जिवंत झाड खरे तर तोडू नये, कारण ती प्रथाच नाही.
होळीच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण देशभरात धुलिवंदनाची धूम असते. वास्तविक पाहता रंग उधळण्याचा, रंगोत्सव फाल्गुन वद्य पंचमीला साजरा केला जात असतो. पण उत्तर भारत आणि अन्य ठिकाणी तो होळीच्या म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. तसेच आपल्याकडे प्रत्येक सणाला सुट्टी देणे शक्य नसल्याने सरकारही शाळा, कॉलेज, कार्यालय यांना धुलीवंदनाच्याच दिवशी सुट्टी देतात, त्यामुळे आपणही रंगपंचमीचा सण धुळीवाडीच्या दिवशीच खेळतो. पूर्वापार चालत आलेली खरी रंगपंचमी आता बदलली आहे.
वसंत ऋतू, मदन, नववर्ष, जीर्ण झालेल्या सृष्टीच्या शक्तीचे नूतनीकरण यासंदर्भात हा उत्सव निगडित असल्याचे मानण्यात येते. धर्मसिंधू या ग्रंथाच्या मते, फाल्गुन वद्य प्रतिपदेला वसंतोत्सव सुरु होत असते. त्याचा आगमनासाठी हा सण साजरा केला जातो.
नक्की कधी रंग खेळावे हा प्रश्न पडत असेल ना? (Importance of Holi In Marathi)
आपण धुळवड आणि रंगपंचमी यात नक्की फरक काय असतो ते जाणून घेऊया.
धुळवड म्हणजे काय?
आपल्या महाराष्ट्रातील बहुमूल्य परंपरा ही होळीच्या दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी करण्याची आणि पंचमीच्या दिवशी रंगपंचमी खेळण्याची बहूमोल अशी पुरातन परंपरा आहे.
धुळवड म्हणजे, फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री विधिपूर्वक होळी पेटवली जाते. होलिका दहनाची आग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शांत होते, तेंव्हा ती विझलेल्या होळीची येथील राख एकमेकांच्या अंगाला लावून, धुळवड खेळतात, त्यानंतर आंघोळ केली जाते. अशा प्रकारे धुळवड साजरी केली जाते.
पण आता बदलत्या काळानुसार सणांचे स्वरूपही बदलत आहेत, आणि बदल हा श्रुष्टीचा नियम आहे त्यामुळे ते आपोआप होत ही जातात.
धुलीवंदनच्या दिवशी, वाईट विचाराचा संहार करण्यासाठी गाईच्या पवित्र शेणाच्या वाळलेल्या गोवऱ्या (शेणकुऱ्या) एकत्र करून त्यात गाईचे तूप, कापूर, उसाचे वाढे, एरंडची फांदी या सर्व वस्तू जाळतात. अशी अग्नी प्रजव्लित करून तिच्या धुराने वातावरण शुद्ध होते अशी परंपरा, अतूट भावना आहे तसेच त्यास शास्त्रीय कारण आहे. होळीत अन्न पदार्थाचा समावेश करतात, विशेषत: पुरणपोळीसारख्या पक्वान्नांची, नारळाची त्यात बहुमोल आहुती देतात. (Importance of Holi In Marathi)
|Related : Jagannath Rath Yatra in Marathi | जगन्नाथ रथयात्रा – माहिती … Read more
होळी सणाचे शास्त्रीय कारण:
होळी: होळीच्या दिवशी : (Importance of Holi In Marathi/ Holi day)
याच वेळी शिशिर ऋतू समाप्त होऊन वसंत ऋतूचा प्रारंभ होतो. या कालावधीत निसर्ग आपली कूस बदलत असतो. थंड वातावरण आता दाहकतेकडे झुकत असते. बदलत्या ऋतुमानामुळे विषाणूची वाढ होत असते, वातावरण शुद्ध करण्यासाठी व स्वतःचे आरोग्य वाढवण्यासाठी, होळीचे दहन केले जाते. आगीमुळे वातावरणाचे तापमान वाढते, हवेतील विषाणूंची वृद्धी थांबते. आपण जेंव्हा जळत्या होळी भोवती प्रदक्षिणा घालतो तेंव्हा आपल्या शरीराचे हि तापमान वाढते. परिणामी शरीरावरील व शरीरातील विषाणू मारण्यास त्याची मदत होते.
धुलिवंद/ रंगपंचमीच्या दिवशी :
द्वापारयुगात म्हणजे गोकुळात श्रीकृष्ण आपल्या गोपाळ सवंगड्यांवर पिचकारीने रंगीत पाणी उडवून रंगपंचमी साजरी करत असे, असे सांगितले जाते.
या वेळी उन्हाची तीव्रता वाढत असते. उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. आणि एकमेकांच्या अंगावर पिचकारीने पाण्याचा मारा केल्यामुळे त्वचेला आणि शरीराला थंडावा मिळतो. यामुळेच ही पारंपरिक पद्धत सुरू झाल्याचे सांगितले जाते.
फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाने, टॉमेटो, डाळीचे पीठ, हळद, बीट अशा नैसर्गिक पदार्थांपासून तयार केलेले रंग पाण्यात मिसळून त्याची उधळण केली जाते. तापमानातील होणाऱ्या बदलामुळे मनाला थकवा आलेला असतो, मनातील मरगळ काढण्यासाठी एकमेकां रंग लावले जातात. वातावरण हौशीचे आणि आनंदाचे बनवले जातात. शरीरात चैतन्य निर्माण होते, नवी ऊर्जा मिळते आणि येणाऱ्या नव्या ऋतूस सामना करण्याची प्रेरणा मिळते.
असे बरेच फायदे आपल्या सणातून आपल्याला मिळत असतात. आपले सण हे प्रकृतीचे होणारे बदल व त्यापासून आपल्याला जास्तीत जास्त फायदे घेता यावेत म्हणून साजरे केले जातात. हेच फायदे सहज घेता यावे म्हणून त्यासाठी रुढीची आणि परंपरेची झालर लावतात. कारण असे केले तरच ते आपण आवर्जून आणि मनापासून साजरे करतो. नाहीतर वरचेवर असेच रटाळ जीवन जगत असतो. हे सण आपल्यासाठी नवी चेतना, नवी ऊर्जा आणि नवा जोश घेऊन येतात. जगण्यास नवे वळण देतात, जीवनात नकळत आनंद भरून जातात.
होळी हा एक पर्व आहे, एक उत्सव आहे, हे पर्व आणि उत्सव आपल्या संस्कृतीची ओळख, आपल्या अस्तित्वाची ओळख आहेत. यामुळेच आपल्याला आपल्या संस्कृतीचे महत्व समजते, त्यांचे ज्ञान होते. यातूनच एक भाव प्रकट होतो जो भाव आपल्याला एकमेकांशी जोडण्याचा, एकमेकांत मिसळण्याचा क्षण प्राप्त करून देतात. त्यामुळेच आपण आपले सण साजरे केलेच पाहिजेत तेही तितक्यास उत्साहात.
अध्यात्मिक कारण :
Importance of Holi In Marathi: Scientific reason of Holi.
होळीचे अध्यात्मिक कारण तर बऱ्याच जणांना माहित असेलच. हो तीच भक्त प्रल्हाद, होलिका आणि हिरण्य कश्यप. ही पौराणिक कहाणी तर सर्वज्ञात असेल. पण या गोस्टींचा संदर्भ आपण आपल्या आयुष्याशी लावू शकतो. जसे …
हिरण्य कश्यप : म्हणजे आपल्या मनातील वाईट विचार, वाईट भावना. या सर्वांचं त्याग करायचा आणि आज पासूनच चांगल्या गोष्टींची सवय लावून घेण्याची सुरुवात करायची.
होलिका: म्हणजे आपल्यातील अभिमान, स्वार्थ त्याला ओळखा आणि त्या अभिमानाला या होळीच्या आगीत जाळा. आपली मनाची शक्ती ओळखा, आणि या अभिमानाला, अहंकाराला या होळीत जाळा. आयुष्याला नव्याने सुरुवात करा.
प्रल्हाद: म्हणजे आपला विश्वास, आपली भक्ती आहे. भगवंता प्रति तुमचा विश्वास कायम ठेवा, तुमच्या भक्तीत कधी कमतरता आणू नका. येणाऱ्या प्रत्येक संकटाला तितक्याच विश्वासाने सामोरे जा. तुमच्यातला सत्य सतत जगता ठेवा.
जाणून घेऊया धुळवडीच्या रंगाचे महत्व
(Importance of Holi In Marathi, and the importance of colour)
लाल रंग:
लाल हा मंगळ आणि सूर्याचा रंग आहे. तो उष्णता आणि उत्तेजनेत वाढ करतो.
मंगळ हा रक्तात मिसळून राहतो. म्हणून लाल रंगाने रंगपंचमी खेळल्यानं आरोग्य आणि प्रतिष्ठा वाढते.
लाल रंग ऊर्जा आणि शक्तीचं प्रतीक मानले जाते.
पिवळा रंग:
पिवळा हा रंग धर्माचे प्रतीक आहे. गुरू ग्रहाचा हा रंग शरीरातील सर्व इंद्रियांमध्ये असतो.
याच्या प्रभावाने आपण धार्मिक, सात्त्विक, सदाचारी होतो. हा रंग सत्त्वगुणी असतो.
पिवळ्या रंगाने होळी-रंगपंचमी खेळल्यानं प्रेम, सौंदर्य, आनंद वाढतो आणि निराशा दूर करतो.
भगवान श्रीकृष्णाला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे.
निळा रंग:
निळा रंग शनी, राहू, केतूचे प्रतिनिधित्व करतो. यामध्ये क्रौर्य सामावलेले असते.
हा रंग न्यायाचे प्रतीक आहे. हा रंग रात्री शांत आणि दिवसा उग्र असून तमोगुणी असतो.
रंगपंचमीला निळ्या रंगाने रंगपंचमी खेळल्याने आरोग्य लाभतं. ह्या रंगाचा वापर सुरक्षिततेची भावना मजबूत करतो.
जांभळा रंग किंवा निळसर जांभळा रंग:
हा रंग शनीचे प्रतिनिधित्व करतो. सिनेमा, न्यायालय, लेखन या क्षेत्रात हा रंग यश मिळवून देतो. सर्व प्रकारच्या कलाकारांना हा रंग शुभ फल प्रदान करतो. याच रंगाच्या प्रभावामुळे व्यक्ती कलाकार बनते. निळसर जांभळा हा रंगही शनीचे प्रतिनिधित्व करतो. म्हणून तो न्यायसंगत असल्याचे मानतात. विरोधकांना नामोहरम करण्याची क्षमता या रंगात असते. या रंगाने होळी खेळल्यास उत्साह दुप्पट होऊ शकतो.
|Related : Gudi Padwa in Marathi | गुढी पाडवा… Read more.
किती, काही शिकवतात हे सण आपल्याला.….
अजूनही महाराष्ट्र अनेक भागात तेथील परंपरे नुसार होळीचा सण साजरा केला जातो. काही ठिकाणी ५ तर काही ठिकाणी ७ दिवसांचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. (hope you know the Importance of Holi In Marathi)
आपणांस सर्वांना होळी, धुलिवंदन व रंगपंचमीच्या कोटी-कोटी शुभेच्छा ! (Importance of Holi In Marathi)
आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ! .
अधिक माहिती:
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स