Karnala Fort Trek | कर्नाळा किल्ला
Karnala Fort Trek : माझा पहिला ट्रेक (My First Trek )
किल्ल्या विषयी : Karnala Fort Trek
(Complete information about Karnala Fort Trek)
किल्ल्याची उंची : समुद्रसपाटी पासून साधारणतः १४४० फूट उंच.
किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग
किल्ल्याची श्रेणी : मध्यम
किल्ल्यावर जाण्याची योग्यवेळ : जून ते फेब्रुवारी.
तसं किल्लावर कोणत्याही ऋतूत गेलं तरी चालत, कारण श्रेणी माध्यम आणि जाण्यास सोपं असल्यामुळे येथे, तशी बाराही महिने गर्दी असतेच. खास करून शनिवार-रविवारी.
Table of Contents :
इतर माहिती :
Karnala Fort Trek : गडावर निवासस्थानाची सुविधा उपलब्ध नाही. पिण्याच्या पाण्याचीही व भोजन सुविधेची व्यवस्था नाही, आपली सोय आपणच करावी.
किल्ल्या विषयी माहिती :
कर्नाळा हा भारतील महाराष्ट्र राज्यात असलेला एक किल्ला छोटा किल्ला आहे. किल्ल्याचा सभोवतालचा परिसर “कर्नाळा अभयारण्य” म्हणून म्हणून प्रसिद्ध आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत-माथेरान या डोंगररांगेतील कर्नाळा किल्ला, ट्रेकर्स साठी सोप्या श्रेणीतीलच आहे. कदाचित म्हणूनच आम्ही सर्व मित्रांनी हाच किल्ला पहिला ट्रेक म्हणून निवडला होता.
कसे जावे :
पनवेलपासून सुमारे १२ कि. मी. अंतरावर असलेला हा किल्ला आहे. पनवेल ते पेण, अलिबाग, रोहा अश्या कोणतीही एस.टी. बसने तसेच स्वतःच्या वाहनाने जाणे अगदी सोपे आहे. पनवेल नंतर पळस्पे जंक्शन पार केल्या नंतर हा किल्ला लगेच दृष्टिपथास येतो. किल्ल्याचा एक उंच सुळका सर्व डोंगरांच्या वर मान काढून आजूबाजूचा परिसर सुरक्षित आहे की नाही याची खात्री करत आहे, असा भास होतो.
ट्रेकची सुरुवात :
कर्नाळा अभयारण्यच्या प्रवेशद्वारापासून किल्ल्यावर जाण्यास जवळपास दीड-ते-दोन तास लागतात. अभयारण्य असल्यामुळे येथ १५० अधिक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आढळतात. लोकांच्या आवाजामुळे फारसे जवळ दिसत नाही, पण आवाज मात्र नक्की ऐकू येतात. अनेक पक्ष्याने चित्र आणि माहिती लिहिले पोस्टर्स पाहावयास मिळतात. तसेच येथे पक्षी संग्रहालयही आहे, येथे ठेवलेले पक्षीही पाहावयास मिळतात.
आम्ही जेव्हा पहिल्यांदा हा ट्रेक केला होता तेंव्हा सुरक्षा चौकी वगैरे काही नव्हतं, पण आता आत प्रेवेश करणाऱ्या प्रतेय्क व्यक्तीची ओळख पटविली जाते. त्यांनी किती प्लास्टिक च्या बाटल्या आत घेऊन गेले आहेत ते लिहिलं जातं आणि येताना पुन्हा ते तपासलं जात. हो हा ट्रेक मी चार वेळा केला आहे, वेगवेगळ्या मित्रां सोबत आणि घरच्यांसोबत. येथील वातावरण डोंगर भागामुळे नेहमी गार असते, तसेच अभयारण्य असल्यामुळे खूप झाडांनी बहरलेला असतो.
पक्षी संग्रहालया नंतर लगेच ट्रेकला सुरवात होते. एक-दोन ठिकाणी सरळ चढ आहे, जेथे पटकन थकायला होतं. बाकी वाट तशी सध्या चाचीच आहे. एका डोंगराच्या कड्यावरून पायऱ्या चढून कर्नाळा डोंगरावर प्रवेश करतो. हे ठिकाण थोडं धोकादायक आहे. मध्ये दारी असल्यामुळे वाराही खूप असतो आणि त्याच ठिकाणी ह्या अरुंद पायऱ्या आहेत. येथून लगेच १५ मिनिटात गडाच्या मुख्यद्वारापाशी पोहचतो. गडाचा मुख्यद्वार, वाडा व इतर भाग पूर्ण ढासळेल आहे. थोडा वर जाताच आपण पोहचतो ते गडाचा सर्वात उंच भागी, हो त्या अंगठ्या सारख्या दिसणाऱ्या, पण वस्तुतः ५० मी उंच असलेल्या एका विशाल सुळक्या पाशी. सुळक्याच्या पायथ्याशी कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. किनाऱ्या वरची तटबंदी थोडीफार शाबूत आहे. जवळच करणाई देवीचे मंदिर आहे.
दिवीचे दर्शन घेऊन आम्ही येथेच सोबत घेऊन गेलेलो जेवण करायचे ठरविले, सावलीची जागा पाहून मस्त पंगत मांडली, डबे उघडले आणि भरपेट पेटपूजा केली. साधारण अर्ध्या तासाच्या अवधी नंतर गडावरील इतर ठिकाणे पाहण्यास सुरुवात केली.
गडाच्या आजूबाजूस :
गडाच्या पूर्वेस प्रबळगड, इर्शाळगड, माथेरान डोंगर रंग दिसतात, दक्षिणेला पेण, रोहा कोकण भाग, पश्चिमेस उरण-मुंबई दिसते तर उत्तरेस ठाणे-पनवेल परिसर पाहता येतं. साधारण ३०-४५ मिनिटात गड पाहून आम्ही गडाचा इतिहास आठवू लागलो.
किल्ल्याचा इतिहास :
किल्लावरील बांधकाम तटबंदी पाहता, हा किल्ला टेहळणी साठी वापरात असावा असा अंदाज आहे. जवळच असलेल्या बोरघाटद्वारे, पूर्वी होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असावा.
१३१८-१३४७ या दरम्यान किल्ला निजामशहा कडे होता. इ.स. १६५७ मध्ये हा किल्ला छत्रपती शिवरायांनी स्वराज्यात सामील केला. पण पुरंदरच्या तहात दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये, कर्नाळाही औरंगजेबाला द्यावा लागला.
पण पुन्हा १६७० मध्ये कर्नाळा स्वराज्यात आल्याची नोंद आहे. तद-पश्चात पुन्हा किल्ला मोघालांकडे गेला. त्या नंतर १७४० मध्ये कर्नाळा मराठी साम्राज्याच्या नियंत्रणा खाली आला. अखेर १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
ट्रेकचा शेवट :
प्रत्यकाने थोडी-थोडी गोळा केलेली माहित सांगून, सर्वांसोबत सामायिक केली. अखेर ३:३० वाजता गड उत्तर करण्यास सुरुवात केली. उतरताना खूप आरामदायी वाटत होतं. एकतर किल्ला आणि आजूबाजूचा परिसर पाहून मन खुश झाले होतं, पाठीवरचं ओझंही कमी झालं होतं आणि वाट उताराची होती. पटापट पाऊले टाकत, दिवसभराचे मजेचे किस्से आठवतं तसा भारत खाली उतरलो. अभयारण्याच्या पायथ्याशी ओलो, तेथून पनवेलला येणारी बस पकडून पनवेल गाठले आणि आमच्या गावाची, शेवटची सहाची उलवा बस पकडून घरी आलो.
पहिला ट्रेक यशस्वी झाला होता. यशस्वी झालेला आमचा पहिला ट्रेक आणि नवीन आलेले अनुभव या सर्वांची चर्चा वाटेत चालूच होती. विषय संपत नव्हते. आमच्या ट्रेकचा प्रमुख म्हणजे माझा मोठा भाऊ (विजय भरणुके) आणि माझ्या सोबत बाकी साऱ्या मित्र, यांना आता हुरूप आला होता, लगेच पुढच्या ट्रेकचे वेद लागले होते, कोठे जायचे, कधी जायचे. याच गप्पांनी आणि नव्याने मिळालेला सुखद आनंदाने आम्ही घरी पोहचलो.
धन्यवाद !
fort trek reviews of karnala, karnala fort trek route. Karnala fort information in marathi, Trek of karnala fort history in marathi, Karnala fort trek difficulty level,
Karnala fort trek difficulty level, Karnala fort trek difficulty level
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
Karnala fort trek time, karnala fort trek distance, Trek of karnala fort from mumbai, karnala bird sanctuary.