Marathi Kavita Mazi Marathi Bhasha | माझी मराठी

marathi kavita mazi marathi
marathi kavita marathi rang

माझी मराठी | Mazi Marathi

Marathi Kavita Mazi Marathi या कवितेत मराठी भाषा, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे कशी वाचली. केवळ वाचली नाही तर तिची वृद्धीही झाली. मराठी भाषेचा विकासही झाला. भाषेच्या विकासात आपलाही हात असावा आणि आपली भाषा अजून वृद्धिंगत व्हावी हीच माफक अपेक्षा. वाचा नक्की आवडेल.

Marathi Kavita Mazi Marathi Bhasha :

मराठी माझी भाषा,
मराठी माझी बोली,
शिवरायांच्या स्पर्शाने,
माझी मराठी पावन झाली ।।धृ।।

: माझी मराठी : 

मराठी माझी भाषा,
मराठी माझी बोली,
शिवरायांच्या स्पर्शाने,
माझी मराठी पावन झाली ।।धृ।।

लाख संकटे झेलली तिने, लाख आक्रमणे पेलली,
लाख वादांनी पेटली, ती लाख शत्रूंनी दाटली,
इतक्याहून ही तगली, सार्थ दटुनी उभी राहिली
शिवरायांच्या स्पर्शाने, माझी मराठी पावन झाली ।।१।।

जेंव्हा झाला शिवराज्याभिषेक, मग मराठीने टाकली कात
गडांचे बांधिले तोरण तिला, नव-नवे शब्द गुंफिले त्यात,
शाहिराच्या पोवाड्यातही सजली, अभंग मराठीची हि शैली
शिवरायांच्या स्पर्शाने, माझी मराठी पावन झाली ।।२।।

आता नव्या ऋतूत नटली, वटवृक्षापरी बहरली,
नव्या साजात थाटली, लख्ख मोत्यांनी सजली,
साता समुद्रापारही रुजली, पार अभिजातही जाहली,
थोर आमाची ती पुण्याई, राजे तुम्ही तीस तारिली
शिवरायांच्या स्पर्शाने, माझी मराठी पावन झाली ।।३।।

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x