Hubble Space Telescope | हबल अवकाश दुर्बीण

Hubble Space Telescope | हबल अवकाश दुर्बीण : या लेखात आपण हबल दुर्बीण विषयीची माहिती मिळविणार आहोत. Know about The Hubble space telescope images, its birth date, information related to UPSC. You will get the answers to when was the Hubble space telescope launched? Hubble space telescope launch date? When Hubble space telescope goes live? Know everything about NASA’s Hubble space telescope.

हबल अवकाश दुर्बीण विषयीची माहिती:

हबल स्पेस टेलिस्कोप ही अवकाश दुर्बिण आहे. अवकाशाचा वेध घेण्यासाठी नासा व युरोपियन अवकाश संस्था यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प राबवला, त्यावर दशको वर्ष संशोधन केले. खूप आर्थिक, मानसिक व वैज्ञानिक अडथळ्यांवर मत करून, अखेर अशी दुर्बीण बनविली. अशी ही अतिप्रगत दुर्बीण २४ एप्रिल १९९० या दिवशी अंतराळात, पृथ्वीच्या कक्षेत सफलता पूर्वक सोडण्यात आली.
११,११० किलो ग्रॅम वजनाची ही दुर्बीण, आत्तापर्यंची सर्वात मोठी आणि प्रगत अशी दुर्बीण आहे. नासाच्या मोठ्या वेधशाळांच्या प्रकल्पातील हे एक प्रकल्प. अमेरिकेच्या एडविन हबल या खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून या दुर्बिणला “हबल” असे नाव देण्यात आले.

विज्ञानाचा मागील इतिहास पाहता, विज्ञानाने खुप मोठी झेप घेतली होती. कधी ना पाहिलेल्या, कधी न घडलेल्या गोष्टी अस्तित्वात आल्या होत्या. अति सूक्ष्महून सूक्ष्म कण पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शक जन्माला होता. हृदयाचे ठोके मोजणारी स्टेटसस्कोप, स्पेक्ट्रोस्कोप, दुर्बिण यासारखी नवीन काल्पनिक उपकरणं उदयास आली होती. विश्वाकडे पहाण्याच्या मानवाच्या दृष्टीत विलक्षण बदल झाला होता. गॅलिलिओने तयार केलेली ही विलक्षण दुर्बिण, नव्या रूपाने, नव्या ताकदीने आकाशाकडे वळणार होती. संबंध जगाचे डोळे बनून ही दुर्बीण एक अनोखी दुनिया दृष्टिपथास आणणार होती. मानवाच्या अंतराळाविषयीच्या कुतुहलाचे आणि अभियांत्रिकी कौशल्याचे प्रतीक ठरणार होती. अंतरीक्षीय विश्वात नवीन तारे, पाहणारा हा नवीन चक्षु, प्रचंड ताकदीने अंतराळात विराजमान झाला होता.

|Related: Marathi Bhasha Din Kavita | अभिमान माझा  मराठी – Poem

हबल दुर्बीणची क्रांती :

हबल स्पेस टेलिस्कोप ही एक खूप मोठी, अंतराळात स्थित असलेली कार्य वेधशाळा आहे. या वेधशाळेने १९९० मध्ये स्पेस शटल द्वारे प्रक्षेपित केल्यापासून खगोलशास्त्रात एक नवी क्रांती घडवून आणली आहे. या वेधशाळेद्वारे पर्यावरणाच्या बऱ्याच गोष्टींचा अचूक अंदाज घेता येणे शक्य झालं आहे. जसे पावसाचे ढग पाहून, पाऊस कोठे व कधी होणार हे सूचित केलं जातं. प्रकाश प्रदूषण किती आहे आणि वातावरण प्रतिकूल व अनुकूल आहे, कोठे वादळ होण्याची शक्यता आहे. अशा बऱ्याच गोष्टींची, आगाऊ सूचना दिली जाते. त्यामुळे आधीच तयार राहून, मनुष्यहानी होण्यापासून वाचू शकतो. हबल दुर्बिणीमुळे या रहस्यमयी ब्रह्मांडाचे क्रिस्टल-क्लीअर- दृश्य घेणे सहज शक्य झालं आहे.

शास्त्रज्ञांनी हबल दुर्बिणीचा वापर करून आतापर्यंत सर्वात दूरचे तारे आणि आकाशगंगा चित्र दाखवले आहे. आपल्या सौरमालेतील ग्रहांचे निरीक्षण केले आहे, त्यांचे खूप चित्र जगाला दाखवले आहेत. खरं तर आशा निरीक्षणासाठीच या दुर्बिणीचा जन्म झाला होता. मागील ३२ वर्षांच्या काळात, हबल दुर्बिणीचा ऑपरेशनमध्ये त्याच्या क्षमतांमध्ये प्रचंड वाढ करण्यात अली आहे. आता तुम्ही म्हणाल स्पेस दुर्बिणीची क्षमता कशी वाढवता येईल. तर त्याचे खरे कराण असे आहे की, अमेरिकेच्या NASA या संस्थे तर्फे अवकाशात सेवा मोहिम, राबविल्या जातात. याच मोहिमेदरम्यान हबल दुर्बिणीमध्ये नवीन, अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणे जोडली गेली. हबल दुर्बिणीचे जुने झालेले भाग बदलून टाकण्यात आले. काही नवीन भाग जोडून दुर्बिण अधिक अपग्रेड आणि सक्षम बनविण्यात आली. प्रत्येक दोन-तीन वर्षाआड अशा सर्व्हिसिंग मिशन द्वारे दुर्बिणीचे आयुष्य व दुर्बिणीची कार्यक्षमता खूप पटीने वाढवली जाते.

हबल दुर्बिणीची श्रेणी:

या हबल दुर्बिणींमध्ये प्रकाशाची एक विशिष्ट श्रेणी असते, ज्या मुळे ती शोध घेऊ शकते. हबल दुर्बिणीचे डोमेन दृश्यमान पासून ते, अल्ट्राव्हायोलेटपासून आणि अल्ट्राव्हायोलेटपासून जवळच्या इन्फ्रारेडमध्ये पसरते. हबल दुर्बिणीच्या या श्रेणीने हबलला तारे, आकाशगंगा आणि इतर खगोलशास्त्रीय वस्तूंच्या आश्चर्यकारक प्रतिमा घेता येतात. या प्रतिमांमुळे जगभरातील लोकांना खगोलशास्त्राची प्रेरणा मिळाली आणि ब्रह्मांडाबद्दलची आपली समज बदलली. आता आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती, सहज मिळते. आकलनीय आणि याअगोदर कधी न उलगडलेली कोडी, आता सहज सुटत आहे. विज्ञानाने गाठलेलीही नवीन उंचीच आहे.

हबल दुर्बिणीने आत्तापर्यंतच्या जीवनकाळात १.५ दशलक्षाहून अधिक निरीक्षणे केली आहेत. ही माहिती NASA च्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे. त्याच्या शोधांवर १९,००० हून अधिक विज्ञान पेपर प्रकाशित झाले आहेत. प्रत्येक वर्तमान पात्र, खगोलशास्त्र पाठ्यपुस्तकात या वेधशाळेचे योगदान समाविष्ट आहे, आणि त्यांचे मूल्य विलक्षण आहे. हबल टेलिस्कोपने आंतराळातील बऱ्याच गोष्टींचा मागोवा घेतला आहे. गुरूवर आदळलेला धूमकेतू, प्लूटोभोवती शोधलेले चंद्र अशा घटनांची माहिती मिळविली आहे. संपूर्ण आकाशगंगेमध्ये धुळीने माखलेल्या डिस्क आणि तारकीय नर्सरी सापडल्या आहेत. या नर्सरी कदाचित एक दिवस पूर्ण विकसित ग्रह प्रणालीत परावर्तित होतील. त्यांची स्वतंत्र शृंखला तयार झालेली असेल. इतर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या वातावरणाचा अभ्यास करणे हबल दुर्बिणीने मुळे शक्य झाला आहे.

|Related: What is Metaverse in Marathi| मेटाव्हर्स एक नवीन संकल्पना

दुर्बिणीची निरंतर सेवा:

या हबल दुर्बिणीने ब्रह्मांडाच्या खूप दूर जाऊन भूतकाळात, पृथ्वीपासून १३.४ अब्ज प्रकाश-वर्षांहून अधिक अंतरावर डोकावून पाहिले आहे. तेथील ताऱ्यांचे निरीक्षण केले आहे. जुन्या आकाशगंगा विलीन होताना पाहिल्या आहेत. ब्रांम्हाण्डच्या खोलीत लपून बसलेल्या सुपरमॅसिव्ह कृष्णविवरांची तपासणी करता आली आहे. हबल दुर्बिणीने विस्तारत असलेल्या विश्वाचा इतिहास अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात, अधिक सहजतेने, आणि खरी वस्तुस्थिती आपल्या समोर आणण्यास आपल्याला मदत केली आहे.

३२ वर्षांपेक्षा जास्त काळ चालत असलेल्या या कार्यात, हबल दुर्बीणने अशी निरीक्षणे केली आहेत. कधी न पटणारी पण वस्तुतः अस्थित्वात असणाऱ्या घटनांचे दर्शन घडविले आहे. खरंच या अभूतपूर्व वैज्ञानिक शोधाचे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे. हबल दुर्बिणीमुळे मानवतेच्या कल्पनांना पकडून ब्रह्मांडाबद्दलचे आपले ज्ञान वाढविण्यास मदत केली आहे आणि अनेक वर्षे हे असेच कार्य निरंतर चालूच राहील यात शंका नाही.

अधिक माहिती :

आम्हाला आशा आहे की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ, वाचनासाठी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !

|Related: Makar Sankranti in Marathi | मकर संक्रांती २०२२

१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

आवश्यक लिंक्स :
शैक्षणिक माहितीसाठी : येथे क्लीक करा.
खेळांविषयी च्या माहितीसाठी : येथे क्लीक करा.

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x