Long Term Two Wheeler Insurance | दीर्घकालीन दुचाकी विमा
Long Term Two Wheeler Insurance in Marahti | दीर्घकालीन दुचाकी विमा : याचा विचार का करावा …
नमस्कार मित्रांनो आज आपण मराठीरंग (Marathirang.com) च्या अर्थ या सदराखाली “Long Term Two Wheeler Insurance” दीर्घकालीन दुचाकी विमा याविषयीची माहिती पाहणार आहोत. दुचाकी विमा म्हणजे काय, Long Term का घ्यावा त्याचा फायदा काय? तो घेण्या मागे उद्देश काय? हे सर्व समजून घेणार आहोत. चला तर पाहूया काय आहे Long Term Two Wheeler Insurance.
दीर्घकालीन दुचाकी विमा योजना ही तुमच्या एक वर्षाच्या DTH किंवा WiFi योजनेसारखी असते. जिथे तुम्ही तुमच्या सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीस दर माह छोटी छोटी रक्कम पुन्हा-पुन्हा न देता एकाच वेळी जास्त मुदतीची रक्कम अदा करता, त्यामुळे तुम्हाला खास ऑफर आणि अधिक फायदे, तसेच सवलत देण्यात येतात.
त्याच प्रेमाणे जर तुम्ही आगाऊ पेमेंट करण्यास प्राधान्य देत असाल, तर तुम्ही दीर्घकालीन दुचाकी विमा योजना विचार करायला काही हरकत नाही. चला तर जाणून घेउया की हा विमा प्रकार तुमच्यासाठी योग्य आहे की नाही. (Long Term Two wheeler Insurance)
दीर्घकालीन (Long Term) दुचाकी विमा योजना म्हणजे काय?
दीर्घकालीन टू-व्हीलर विमा योजना म्हणजे तुमच्या दुचाकीला होणारे नुकसान किंवा नुकसान भरपाई पासून संरक्षण देणारी योजना. ही योजनाही अगदी एक वर्षाच्या दुचाकी विमा योजनेप्रमाणे असते. दीर्घकालीन योजनेतील फरक फक्त हा असतो की पॉलिसीचा कालावधी साधारणतः २-३ वर्षांचा असतो.
अशा प्रकारे, २-३ वर्षांचा प्रीमियम अगोदर भरून, तुम्ही तुमच्या बाईकसाठी अखंड लांब कालावधीच्या विमा संरक्षणाचा आनंद घेऊ शकता. यामुळे दरवर्षी नूतनीकरण करण्याची गरज राहत नाही.
दीर्घकालीन दुचाकी विमा योजनेचाच विचार का करावा?
तुमच्या पुढील दुचाकी विमा खरेदीवर करण्यासाठी आपण दीर्घकालीन दुचाकी विम्याच्या या फायद्यांवर एक नजर टाकूया.
१. संभाव्य प्रीमियम बचत २०-३०% :
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) दुचाकी विम्याच्या तृतीय-पक्ष दायित्व (Third Party Insurance) भागासाठीचा प्रीमियम दरवर्षी साधारणतः २०% पर्यंत वाढवू शकतो, कधी कधी तो ३०% पर्यंतही वाढला आहे. जेव्हा तुम्ही दीर्घकालीन योजनेचा विमा खरेदी करता, तेव्हा तुम्ही पुढी २ वर्षात होणाऱ्या संभाव्य २ वर्षाच्या वाढीव प्रेमियांची आजच बचत करू शकता.
|Related: Buy car insurance online | कार विमा म्हणजे काय ? Read more ….
२. दावा केल्यानंतरही नो-क्लेम बोनससह लाभ :
एक वर्षाच्या स्टँडर्ड दुचाकी विमा योजने मध्ये दिलेला नो-क्लेम बोनस एकदा क्लेम केल्यावर शून्य होतो. दीर्घकालीन दुचाकी विमा योजनेत हा २०% पर्यंत कमी केला जातो, त्यामुळे तो पुढील वर्षांसाठी शून्य होत नाही.
उदाहरणार्थ, ३ वर्षांची पॉलिसी खरेदी करताना लागू होणारी NCB ३५% असेल आणि दुसर्या पॉलिसी वर्षात दावा केला असेल, तर त्या वर्षासाठी NCB २०% पर्यंत कमी होते. एका वर्षाच्या पॉलिसीमध्ये या केस मध्ये NCB ०% होतो.
३. सुरक्षा आणि तणावा पासून मुक्ती :
एकदा तुम्ही दीर्घकालीन योजना खरेदी केल्यानंतर, तुमच्या वाहनाचे आर्थिक संरक्षण पुढील २-३ वर्षांसाठी हमी दिते. जर एक वर्षाच्या पॉलिसीचे नूतनीकरण झाले नाही आणि एक दिवस जरी उशीर झाला तर ते धोकादायक ठरू शकते आणि या कालावधीत दुर्दैवाने अपघात झाल्यास, विमा कंपनीकडून कोणतेही दावे मिळत नाहीत. बहु-वर्षीय विमा योजनेत, अशा प्रकारच्या अनिश्चित उद्भवणाऱ्या घटना टाळल्या जातात. त्यामुळे तुम्ही आर्थिक दायित्वाबाबत कोणतीही भीती न बाळगता चिंतामुक्त प्रवास करू शकता.
४. पॉलिसी रद्द करण्याची तरतूद :
जर तुम्ही क्लेम केल्यानंतर तुम्हाला तुमची पॉलिसी रद्द करण्याची इच्छा असल्यास, तुम्ही तसे करू शकता आणि उर्वरित वर्षांवर लागू होणार्या प्रीमियचा तुम्ही परत मिळवू शकता. एक-वर्षीय योजनेत, दुसरीकडे, तुम्ही दावा केल्यास, पॉलिसी रद्द करताना तुम्हाला कोणत्याही प्रीमियमचा परताव्यासाठी पात्र नाही.
रद्द करण्याच्या अटी आणि शर्ती एका विमाकर्त्याकडून वेगळ्या असतात आणि पॉलिसी खरेदीच्या वेळी त्या लक्षपूर्वक वाचणे आणि समजून घेणे आवश्यक आहे. (Long Term Two wheeler Insurance)
|Related: What is insurance in Marathi | विमा म्हणजे काय ? (Read more….)
एक वर्ष दुचाकी विमा आणि दीर्घकालीन दुचाकी विमा:
एक वर्ष आणि दीर्घकालीन दुचाकी विमा योजनांमधील तुलनाचा सारांश येथे पाहूया

अशाप्रकारे, दीर्घकालीन दुचाकी विमा योजनेसह, तुम्ही दोन किंवा तीन वर्षांच्या कालावधीसाठी एकच पॉलिसी दस्तऐवज बाळगून तुमची दुचाकी बिनधास्त चालवू शकता. तुम्हाला हे माहीत आहे की तुम्ही विम्यामध्ये बराच काळ संरक्षित आहत.
जर तुम्ही मोटार विमा खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंक पहा:
आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
- Gudi Padwa Wishes in Marathi 2023 - March 21, 2023
- World Most 7 No Fly Zone Places | नो फ्लाय झोनची ठिकाणे - December 25, 2022
- What Commerce Students can do after 12| Best Options - December 24, 2022