Marathi Kavita Adishakti | आदिशक्ती

marathi kavita adishakti
marathirang.com

Marathi Kavita Adishakti | आदिशक्ती

Marathi Kavita Adishakti : या कवितेत कवियित्रीने, स्त्रीची विविध रूपे आणि त्यांचे वास्तव्य या विषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. कधी ती स्वतःला चांदणी वाटते, तर कधी सागरातली नाव, कधी उगवत्या सूर्याचे किरण तर कधी आईच्या मायेची उब. तुमचंही रूप यातील कशा-नि-कशात नक्की असेल, वाचा आणि शोधा. आवडली तर नक्की इतरांसोबत सामायिक (शेअर) करा. आणि आपला अभिप्राय व सूचना जरूर सांगा. धन्यवाद !

marathi kavita adishakti
marathirang.com

दूर नभी त्या क्षितिजावरती
लुकलूकणारी चांदणी मी

अगाध सागरी डोलणारी
अवखळ सानुली नाव मी

उत्तुंग पर्वत सर करणारी
पूर्वेची नवकिरणे मी

सोनपाऊली जग उजळती
ओलेती पहाट मी

हिंदोळ्यावर झोके घेत
बागडणारी पाखरं मी

दऱ्याखोऱ्यांत दुमदुमणारी
निधडी शिवगर्जना मी

बोचऱ्या थंडीने कुढताना
गोधडीतली मायेची ऊब मी

दुःखाने होरपळून निघता
आईची प्रेमळ कुशी मी

उन्हाने भाजलेल्या धरित्रीवर
पावसासवे बरसणारी मी

नववधूच्या अल्लड रुपात
रमणारी गृहलक्ष्मी मी

प्रत्येक स्त्रीमध्ये वसणारी
आदिशक्ती ही मी …
आदिशक्ती ही मी ||

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

प्रियांका रोठे

नमस्कार, मी प्रियंका रोठे, महाराष्ट्र, ठाणे. मी यशस्वीरित्या माझ्यातील लेखनाचे प्रेम जपले आहे. पुस्तकांबद्दल माझे प्रेम बालपणातच विकसित झाले. मी शाळेच्या ग्रंथालयातून पुष्कळ पुस्तके वाचत होते. तेथून मला लेखनाची आवड आणि सवयही लागली. मला माझे विचार मातृभाषा, मराठीतुन लेखणीच्या साह्याने स्पष्ट करायला आवडतात. मला आशा आहे की तुम्हीही याचा आनंद घ्याल. धन्यवाद !

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x