Digital Credit Card-Marathi | डिजिटल क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

Digital Credit Card / Vertual Credit card / डिजिटल क्रेडिट कार्ड म्हणजे काय ?

Digital Credit card for Online transaction

नमस्कार मित्रांनो, आज आपण अजून एक बँकिंग क्षेत्रातील आत्ता-आत्ता सुरू झालेला पण वेगळा वेगळा प्रकार पाहणार आहोत. नव्या-नव्या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात खूप चढाओढ चालू आहे. खूप कॉम्पिटिशन चालू आहे, त्यामुळे प्रत्येक बँक इतर बँकांपेक्षा आपण ग्राहकांना काय वेगळं आणि चांगलं देऊ शकतो, याचा प्रयत्न करत आहेत. याच चढाओढीतील हा एक ऑनलाइन व्यवहाराचा प्रकार म्हणजे डिजिटल क्रेडिट कार्ड.

चला तर पाहूया डिजिटल क्रेडिट कार्ड म्हणजे काय ? (What is digital credit card ?), त्याचे फायदे काय ? कार्डसाठी अप्लाय करण्याची गरज आहे. खरंच हे सुरक्षित आहेत का आणि या कार्डमुळे आपला व्यवहार सहज होऊ शकतात का ? पाहूया या सर्व प्रश्नांची उत्तरं.

डिजिटल क्रेडिट कार्ड म्हणजे काय ?

डिजिटल क्रेडिट कार्ड/ व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड Virtual Credit Card (VCC). डिजिटल क्रेडिट कार्ड म्हणजे खास ऑनलाइन व्यवहारात उपयोगी येणार अप्रत्यक्ष स्वरुपातील कार्ड. होय हे आपल्या इतर कार्ड्स प्रमाणे खऱ्या स्वरूपाचे नसते, ते केवळ आपल्या कार्ड प्रमाणे दिसणारे चित्र असते. हे कार्ड ऑनलाईन व्यवहार करण्याकरिता तयार केली जातात, त्यामुळे त्यांचा प्रत्येक्ष स्वरूपात असाण्याचा काही उपयोग नाही. म्हणूनच या कार्ड्सना डिजिटल किंवा अप्रत्यक्ष कार्ड्स असे म्हणतात.

आपल्या नियमित क्रेडिट कार्ड प्रमाणेच या प्रकारच्या क्रेडिट कार्डमध्येही एक कार्ड नंबर असतो, त्याची वैधता तारीख असते आणि CVV नंबर असतो. हे सर्व तपशील ऑनलाईन उपलब्ध आहेत आणि ऑनलाईनच पाहिले जाऊ शकतात. ग्राहकांचे व्यवहार सुलभ करण्यासाठी आणि व्यवहारात सुरक्षा सुधारण्यासाठी बऱ्याच क्रेडिट कार्ड प्रदान करणाऱ्या बॅंक्स व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड ऑफर करतात. हे प्रत्यक्ष क्रेडिट कार्डच्या अप्रत्यक्षपणे विस्ताराचे कार्य करतात.

थोडक्यात डिजिटल क्रेडिट कार्ड म्हणजे काय, हे आपल्या लक्षात आलं आहे. आता आपण हे कार्ड मिळविणे आवश्यक आहे की नाही, त्याचे फायदे किंवा तोटे या गोष्टी समजून घेऊ.

Buy car insurance online | कार विमा म्हणजे काय ? —– Read more.

डिजिटल क्रेडिट कार्ड फायदे आणि विशेतः (Digital Credit Card featurs)

➦ सुधारित आणि आधुनिक सुरक्षा
➥ व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड्स हे केवळ एकच वेळ वापराच्या पर्याय या चा असतो.
➦ उत्पादित केलेला कार्ड हा २४ तास ते ४८ तासांच्या विशिष्ट कालावधीसाठीच वैध असतो.
➦ ओटीपीचा वापर लागू केल्याने या कार्ड्सची सुरक्षितता आणखी वाढते.
➥ कार्ड केवळ ऑनलाइन व्यवहारासाठी उपयोगी असल्याने गैरवापर होणे किंवा चोरी होण्याची शक्यता अजिबात नसते.
➦ मर्यादित वापर हा या कार्डच्या सुरक्षिततेचा सर्वात मोठा फायदा.
➥ कार्ड धारकला जर कार्डची आवश्यकता नसल्यास ते रद्द करण्याची सुविधाही प्रदान केली जाते.
➦ तात्काळ उपलब्धता: हे कार्ड ऑनलाईन प्रदान केले जात असल्याने ते ग्राहकांकडे आवश्यक व्यवहारासाठी त्वरित.उपलब्ध होतात.
➥ ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा : जर एखाद्या कार्ड सोबत काही चुकीचे व्यवहार झाले असल्यास ते लगेच बंद करून, नवीन कार्डसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकतात.
➦ व्यवहार मर्यादा : डिजिटल कार्ड व्यवहारांच्या मर्यादेसह येतात, यामुळे हे कार्ड्स अनेक वेळा व्यवहारात उपयोगात आणू शकतात, परंतु ठराविक वेळेपर्यंत. या कार्ड्सची क्रेडिट मर्यादा प्राथमिक कार्ड इतकीच असते.

डिजिटल क्रेडिट कार्ड तोटे : (Digital Credit Card/ Virtual Credit cards disadvantages)

➦ कार्ड हे मर्यादित व्यवहारासाठी साठी दिला जातो.
➥ हे कार्ड केवळ ऑनलाईन व्यव्यहाराच्या वापरासाठी आहे.
➦ कार्ड प्रत्येक्षात अस्तित्वात नसतं.
➥ हे कार्ड केवळ प्राथमिक कार्ड धारकालाच जनरेट करता येतं, Add-on धारक हे कार्ड जनरेट करू शकत नाही.
➦ नियमित कार्ड प्रमाणे VCC मधून आपण पैसे काढू (Withdraw) शकत नाही.

What is insurance in Marathi | विमा म्हणजे काय ? …… Read More…

कार्डचा उपयोग कसा करावा :

जसे वर सांगितल्या प्रमाणे, कार्ड ऑनलाईन व्यव्यहाराच्या वापरासाठी आहे, जेंव्हा कधी ऑनलाईन खरेदी करायची असेल तेंव्हा पेमेंट करताना खालील सूचना पाहाव्यात.
➥ नियमित कार्डप्रमाणे कार्ड नंबर भरावा.
➦ कार्डची वैधता द्यावी, जसे तारीख, CVV इत्यादी भरून.
➥ OTP भरून व्यवहार पूर्ण करावा.

FAQs – क्रेडिट कार्डवरील सामान्य प्रश्न :

१) मी माझ्यासाठी व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड कसे मिळवू शकतो ?
➽ आपण कोणत्याही विशिष्ट व्हर्च्युअल क्रेडिट कार्डसाठी बँक किंवा नॉन बँकिंग संस्था – जर त्या ऑफर करत असतील तर, तुम्ही हे कार्ड मिळवू शकता.

२) मी ऑफलाइन व्यवहारांसाठी माझे व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड वापरू शकतो ?
➽ नाही, व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड्स केवळ ऑनलाइन व्यवहार करण्यासाठीच वापरू शकतात.

३) अ‍ॅड-ऑन कार्डधारकांसाठी व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड देखील असू शकते का?
➽ नाही, सध्या, व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड केवळ प्राथमिक कार्डधारकांना देण्यात आल्या आहेत आणि कार्डधारकांना अ‍ॅड-ऑन करण्यासाठी नाहीत. तथापि, नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी, कार्ड जारीकर्ता पुन्हा एकदा तपासा.

४) आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी मी माझे व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड वापरू शकतो?
➽ होय आपण आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी आपले व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड वापरू शकता. पण त्याच ऍक्टिव्हशन कार्ड देणाऱ्या बँके कडून करवून घ्यावं लागेल.

५) मी व्हर्च्युअल क्रेडिट कार्डसाठी काही फीस आकारली जाते का ?
➽ बहुतेक बॅंक्स ह्या व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड फ्री मध्ये प्रदान करतात. त्यांना असे करणे बंधन कारक नाही, त्यामुळे सगळ्याच बँक देत असतील असे नाही, कार्डला अप्लाय करण्या अगोदर बँकेशी संपर्क करा किंवा त्यांच्या साईटवरून चौकशी करा.

६) व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड वरून मी असंख्य व्यवहार करू शकतो का ?
➽ होय. पण ते ठराविक वेळेकरिताच. जसे आपण वर उल्लेखिल्या प्रमाणे हे कार्ड २४ तास ते ४८ तासांच्या विशिष्ट कालावधीसाठीच वैध राहतो.

सांगता :

वर दिलेली डिजिटल क्रेडिट कार्ड विषयीची संपूर्ण माहिती आवडली असेल तर, नक्की कंमेंट करून आपला अभिप्राय कळवा. तसेच काही सुचना असतील तर त्याही आमच्या पर्यंत पोहचावा. आणखी कोणत्या विषयावर माहित हवी असल्यास कमेंट मध्ये नमूद करा. आम्ही त्याचा विचार करून सुधारण्याचा प्रयत्न करू व नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करू. दिलेली माहिती मित्रांसोबतही सामायिक (Share) करून आमच्या प्रत्नना प्रोत्साहन द्या. धन्यवाद !

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स


Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!