Independence Day of India in Marathi| भारताचा स्वातंत्र्य दिवस

Independence Day of India in Marathi| स्वातंत्र्य दिनच्या खूप खूप शुभेच्छा : Independence Day 2021

नमस्कार मित्रानो, सर्व प्रथम स्वातंत्र्य दिनच्या खूप खूप शुभेच्छा – 2021:

आज १५ ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. भारत आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. It is national day of india,
Independence Day 2021 Quotes : Independence Day of India, 15 August 2021: History देशभक्तीच्या भावनेने भारावून टाकतील असे प्रेरणादायी विचार तुम्हाला या लेखात वाचायला मिळतील. जाणून घेऊया स्वातंत्र्यदिनाचे प्रसिद्ध कोट्स विचार.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. तेंव्हा पासून दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्सहात साजरा करतो. देशातील सर्वच शैक्षणिक ठिकाणी, सरकारी कार्यालये, तसेच देशातील बऱ्याच ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. संबंध देशात मोठ्या उत्साहाचे वातावरण असते. विद्यार्थी, समाजसेवक, राजकारणी, देशप्रेमी या सर्वांच्या आनंदाला उधाण येते. ते वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून हा उत्सव साजरा करतात. हा एक उत्सवच आहे, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राज्याचा, सर्वात मोठा स्वातंत्र्य उत्सव, सर्वात मोठा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव.

स्वातंत्र्य दिवस का साजरा करतो ?

पण एक प्रश्न मनात येत असेल की, आपण हा दिवस का साजरा करतो ? Celebration of Independence Day of India.

राणी लक्षमीबाई, मंगल पांडे, शहीद भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, लोकमान्य टिळक, विनायक सावरकर, गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह लाखों स्वातंत्र्य सैनिकांनी भारताला ब्रिटिशांपासून मुक्त करण्यासाठी प्राणाचे बलिदान दिले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताने अखेर कठोर संघर्ष करून, ब्रिटीशांना स्वातंत्र्य देण्यास भाग पाडले. तेव्हापासून हा दिवस जगभरात भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून ओळखला जाऊ लागला. १९४७ मध्ये, ब्रिटिश संसदेने भारतीय स्वातंत्र्य दिन कायदा पारित केला. आणि त्याची संमती मंजूर करून वैधानिक सार्वभौमत्व संविधान सभे कडे देण्यात आले. १४ ऑगस्ट ला ब्रिटीश राजवटीच्या अंत झाला आणि ती सुंदर पाहट घेऊन एका नव्या तेजस्वी, स्वतंत्र किरणे घेऊन दिव्य सूर्याचा उदय झाला. Independence Day Celebration 2021.


प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची ज्योत सतत तेवत राहावी, नव्या पिढीला देश स्वातंत्र्याचे महत्व समजावे. देश प्रेमासाठी साऱ्यांनी एकजुट व्हावे. देशाचे स्वातंत्र्य चिरकाल राहण्यासाठी शपथ बद्ध व्हावे. साऱ्या देशवासीयांचा उत्साह, प्रेम आणि देशभक्ती पाहून सैनिकाचे मनोबल वाढावे. संबंध जगाला स्वतंत्र भारत, ऐक्य भारत, बलवान भारत, सुरक्षित भारत तरीही शांतीप्रिय भारताचा संदेश देता यावा. सर्वात शेवटी पण खूप महत्वाचे म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या सैनिकांची आठवण करावी, त्यांच्या कठीण परिश्रमाला, त्यागाला एक मनाचा मुजरा म्हणून हा दिवस नव्हे हा उत्सव साजरा केला जातो.

Flipkart Axis Credit Card | फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड … Read more

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांचा आढावा । स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा 2021:

Best wishes of Independence Day of India and overiew of Independence day of India :

१५ ऑगस्ट १९४७ रोजी, भारतीय पंतप्रधान याच्या हस्ते लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवला जातो. २१ तोफांची सलामी दिली जाते. तिरंग्याला सलाम करून ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत गायले जाते. हे राष्ट्रगीत गाताना आणि जय हिंद! म्हणताना अभिमानाने उर भरून येतो, देश भावना दाटून येतात आणि मग जो काही आवाज लागतो… शब्दात वर्णन करणे केवळ कठीण. आता लिहिताना माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आले आहेत, कदाचित वाचताना तुमचंही तसंच झाले असेल. या ऐतिहासिक दिवशी पंतप्रधान याच्या हस्ते ध्वजारोहण करणे आणि त्यांनी राष्ट्राला संबोधित करणे ही आपली गेल्या ७४ वर्षाची परंपरा बनली आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राष्ट्राला संबोधित करतात.

➥ १५ ऑगस्टला माननीय पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करून भाषण करतात. या भाषणात जे गेल्या वर्षात भारत सरकारच्या प्रमुख यशावर प्रकाश टाकतात. ➦ भविष्यातील आव्हाने काय आहेत, उद्दिष्टे काय आहेत त्यावर सरकारचे धोरण काय असणार ते सांगतात.
➥ भारतीय सैन्य शक्तीचे प्रदर्शन होते. जगाला आपल्या सामर्थ्याची प्रचिती येते. यातूनच भारताची होत असलेली प्रगतीची रूपरेषा दिसते.
➦ इतर देशातील मान्यवर व प्रमुख व्यक्तींना आमंत्रित केले जाते.
➥ देशातील विविध कला, संस्कृती आणि परंपरेचे दर्शन देणारे नृत्य, कला चित्र सादर केले जातात.
➦ पतंग उडवणे ही स्वातंत्र्य दिन साजरा कारण्याची परंपरा बनली आहे. विविध आकाराचे, विविध रंगांचे पतंग आकाश भरतात
➥ शासकीय कार्यालये दिवसभर सुशोभित केली जातात, प्रज्वलित केली जातात.
संपूर्ण दिवस देशभरात आनंदाचे वातावरण राहते.

Amazon Pay ICICI Bank Credit Card |ऍमेझॉन पे ICICI कार्ड. Read More…

राष्ट्रध्वज फडकविण्याचे नियम :

Rules of hosting of the Indian flag on the occassion of Independence day of India :

राष्ट्रध्वज म्हणजेच हा तिरंगा, राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्रध्वजाला फडकाविण्याचे काही नियम करण्यात आले आहेत. भारतीय संविधानाने, भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार केली आहे, जी ध्वजा संबधी नियम पाळण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करते.

१) संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी ध्वज नेहमी सन्मानपूर्वक फडकविला जावा.
२) राष्ट्रध्वजाचे स्थान हे उच्च असावे, जेणे करून तो सर्वांना दिसला जाईल.
३) शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकलाच पाहिजे. सर्वच्या सर्व दिवस, मग रविवार व अन्य सुटीचा दिवस असो कि कितीही प्रतिकूल हवामानातही, सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवणे आवश्यक असते.
४) राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने व आदरपूर्वक फडकविला वा उतरविला जावा.
५) ध्वज फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा नेहमी वरच्या बाजूलाच असावा.
६) राष्ट्रीयध्वज एखाद्या मिरवणूकीत किंवा परेड मध्ये व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर राष्ट्रध्वज त्यांच्या मध्यभागी असावा.
७) राष्ट्रध्वज फडकविताना तो फाटलेला किंवा मळलेला नसावा.
८) कोणत्याही व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये.
९) राष्ट्रध्वज इतर कोणत्याही ध्वज पताकां पेक्षा उंच असावा.
१०) राष्ट्रध्वजाच अवमान होईल, अशा कोणत्याही कारणासाठी त्याचा वापर करू नये. जसे सजविण्यासाठी, घराच्या पडद्यासाठी, पेहरावासाठी, गादी, रुमाल करण्यासाठी वापरला जाऊ नये.

११) राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जाऊ नये.
१२) केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो.
१३) राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीतच असले पाहिजेत.
१४) सरकारी अधिकारी व्यक्तीच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे.

मी तर म्हणेन प्रत्येक व्यक्तीने, त्याच्या जवळून ध्वज जात असताना ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना हि दिलीच पाहिजे. एक भारतीय नागरिकआणि जबाबदार भारतीय म्हणून हे त्याचे प्रथम कर्तव्य आहे.

Buy car insurance online | कार विमा म्हणजे काय ? —– Read more.

राष्ट्रध्वजाची रचना व महत्व : (Structure of Indian Flag)

हा डौलाने फडकणारा तिरंगा म्हणजे ब्रिटिश राजवटीचा अंत आणि स्वतंत्र भारत राष्ट्राच्या स्थापनेचा एक प्रतीक आहे. राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा मान हा राखलाच पाहिजे, कारण राष्ट्रध्वज हा त्या देशाचे प्रतिनिधित्व करतो. भारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज, म्हणजे हा तिरंगा. जाणून घेऊया यात वापर केलेल्या रंगांचे महत्व आणि त्याची रचना.

भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत ‘तिरंगी ध्वज’ भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्य करण्यात आला. एका-खाली-एक अशा आडव्या सम-प्रमाणाच्या तीन पट्ट्या आहेत.
➦ सर्वात वर गडद केशरी – जो क्रांती आणि प्रगतीचे प्रतिनिधित्व करतो.
➥ मध्यभागी पांढरा – जो सत्य, त्याग, शांती आणि पावित्र्याचे प्रतिनिधित्व करतो.
➦ खालच्या बाजूला गडद हिरवा – जो , निसर्गाशी व भूमी म्हणजे हरित क्रांतीचे, निष्ठा व समृद्धीचे प्रतिनिधित्व करतो. अशा क्रमाने हे तीन रंग आहेत.
➥ मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे. जो सागराप्रमाणे अथांगता, शांतता, गतिमान व कालानुरूप बदलणाऱ्या जगाचे प्रतिनिधित्व करतो.

हे अशोकचक्र सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोक चक्राचे प्रतीक आहे. या चक्राला २४ रेषा आहेत.
तिरंगी राष्ट्रध्वजाची रचना पिंगली वेंकय्या ह्यांनी केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाणही ठरलेले आहे. ते नेहमी २:३ असे आहे.

स्वातंत्र्यदिना निमित्त काही प्रेरणादायी विचार (कोटस )

Some Independence Day Quotes :

१ . “तुम मुझे खून दो, मै तुम्हे आज़ादी दूंगा !” – नेताजी सुभाषचंद्र बोस
२. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.” – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
३. “जे इतरांना स्वातंत्र्य देत नाहीत, त्यांना स्वतःचा अधिकार नाही.” – अब्राहम लिंकन
४) “स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. मला तो मिळालाच पाहिजे.” – बाळ गंगाधर टिळक
५) “आपल्याला स्वातंत्र्य तेव्हाच मिळते जेव्हा आपण आपल्या जगण्याची संपूर्ण किंमत मोजू.”- रवींद्रनाथ टागोर
६) “समस्या हा संसाधनांचा अभाव नाही तर इच्छाशक्तीचा अभाव आहे.” – बाळ गंगाधर टिळक
७) “स्वातंत्र्य केवळ जन्मसिद्ध अधिकार नाही, तो कृती करण्याचा अधिकार आहे.”- विनोवा भावे
८) “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिलमें हैं .” – रामप्रसाद बिस्मिल
९) “ओ व्यक्तियोंको मार सकते हैं, उनकी कल्पनाओं को नहीं |” – शहीद भगतसिंग
१०) “देशभक्तीचा सोंग आणणाऱ्यां पासून सावध रहा.” -जॉर्ज वॉशिंग्टन

स्वातंत्र्यदिनाची शायरी

Independance day Shayari :

ही नशा तिरंग्याच्या आनंदाची आहे.
ही नशा मातृभूमीच्या मानाची आहे.
सर्वदूर बस तिरंगा च फडकवू
हि नशा भारताच्या अभिमानाची आहे.

डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती …. Read More.

सांगता :

संपूर्ण माहिती शोधण्यासाठी आणि त्यास योग्य पद्धतीने आपल्या भाषेत रूपांतरित करण्यासाठी बरीच परिश्रमांची आवश्यकता लागते. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे.
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला दिलेली स्वातंत्र्यदिना विषयीची माहिती, Share Market Information in Marathi आवडली असेल. जर आपण या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील कमेंटमध्ये सांगा. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ! .

स्वातंत्र्यदिनाची शायरी, स्वातंत्र्यदिनाचे कोट, स्वातंत्र्यदिनाच्या प्रतिमा, स्वातंत्र्यदिनाचे फोटो, स्वातंत्र्यदिनाचे वॉलपेपर, स्वातंत्र्यदिनाचे वॉट्सअप स्टेटस, स्वातंत्र्यदिनाचे काव्य, स्वातंत्र्यदिनाचे व्हिडिओ स्टेटस, १५ ऑगस्टचे कोट (विचार), १५ ऑगस्टची शायरी असे बऱ्याच गोष्टी तुम्हाला या येथ मिळतील. You will find Indian Army Quotes Slogan, 15 August Quotes, Whatsapp Status, Patriotic Shayari, Songs Images, Independence Day Poster and many more. Because India is selebrating .

अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

Marathi rang
संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

संतोष भरणुके

नमस्कार, मी संतोष शांताराम भरणुके, महाराष्ट्र, मोहा. एक मराठी वाचक आणि एक ब्लॉगर. मराठीत लिहिण्याची आवड असल्यामुळे, कविता आणि लेख लिहून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न, मी या संकेतस्थळा वरून करत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x