Side effects of Curd | दह्याचे दुष्परिणाम काय ?
Side effects of Curd | दह्याचे दुष्परिणाम काय ?:
नमस्कार मित्रांनो आज जाणून घेणार आहोत दही विषयी. या लेखात आपण दही आपल्या आरोग्यासाठी चांगला की वाईट ते समजून घेणार आहोत. चला तर करूया सुरुवात.
सर्वानाच दही आवडते, ते आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे ते थंड, सुखदायक असते. शिवाय आपल्याकडे ते सहज उपलब्ध होते. दही हे आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारे मुख्य पदार्थ आहे. आपल्या कोणत्याही दैनंदिन जेवणासोबत दही जोडले जाणे नेहमीच चांगले असते, दह्याचा उपयोग, दही पासून बनविल्या जाणाऱ्या पाककृती (रेसिपी) च्या ही पलीकडे असतो.
दही कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन B-2, व्हिटॅमिन B-12, आणि मॅग्नेशियमने समृद्ध आहे. दह्यामध्ये आरोग्य आणि सौंदर्याचे आश्चर्यकारक फायदे आहेत जे आपल्या आहारात दररोज फक्त एक वाटी समाविष्ट करून अगदी सहज मिळवू शकतो.
चला दह्याचे फायदे काय आहेत ते पाहू.
|Related: Poem on Maharashtra in Marathi | जय महाराष्ट्र देशा (Read More….)
अ] दह्याचे आरोग्यदायी फायदे:
१) निरोगी पचन :
दही उत्तम प्रोबायोटिक म्हणून काम करते. दह्यामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया पचनसंस्था साफ करण्यास मदत करतात. शरीरातील आतड्याची क्रिया सुधारते आणि पोटदुखीच्या, अपचन, या सारख्या विकारांवर उत्तम उपचार आहे.
२) उन्हाचा दाह कमी करण्यासाठी :
ताजे आणि मलईदार दही उन्हाळ्यात एक वाटी खाल्लं तरी छान वाटते. उन्हाळ्यात सर्वात सोपा आरामदायी पदार्थ म्हणजे दही. उन्हाळ्यात दह्याचे नियमित सेवन केल्याने पोट थंड राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात दही हा सर्वात प्रभावी पदार्थ आहे. हे आपल्या शरीराला हायड्रेट करण्यास, म्हणजेच पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते. शरीराला थंड ठेवण्यास आणि शरीराची ऊर्जा वाढविण्यास मदत करते.
३) रोगप्रतिकारशक्ती सुधारते:
चांगल्या बॅक्टेरियाची उपस्थिती तुमचे एकंदर आरोग्य सुधारण्यास आणि दैनंदिन पाणी किंवा हवेतून होणाऱ्या रोगांविरूद्ध भक्कम प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करते.
४) हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी:
दही हे कॅल्शियम आणि फॉस्फरस समृद्ध असते, त्यामुळे आपली हाडे, आपले दात आणि नखे मजबूत होण्यास मदत करते.
५) वजन कमी करण्यासाठी :
दही आपल्या शरीरात कॉर्टिसोल जमा होण्यास प्रतिबंध करते, ज्यामुळे शेवटी लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब होतो. दररोज दही खाल्ल्याने काही किलो वजन कमी होण्यास मदत होते. याचा अधिक फायदा मिळण्यासाठी दह्या सोबत काय घ्यावे ते दिलं आहे.
६) दही नियमित सेवन केल्याने आपले स्नायू सुव्यवस्थित काम करत राहतात.
७) दह्या सोबत काही घटकांचे सेवन केल्याने अनेक आजार कमी होतात. दह्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यात लॅक्टोज, लोह आणि फॉस्फरस देखील असतात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी असते.
दही पौष्टिक आहे ते कळले, आता हे दही इतर खाद्यपदार्थां सोबत खाणे किती फायद्याचे ते पाहू.
|Related: Neem Paste on Skin Good/ Bad| कडुलिंबाचा लेप चांगला/ वाईट (Read more…)
आ] इतर खाद्यपदार्थां सोबत दही घालण्याचे फायदे :
१) दही आणि जिरे :
जर तुम्हाला पचनाचा त्रास होत असेल तर दह्यामध्ये थोडी जिरेपूड घालून सेवन करा.
याचे पुढील प्रमाणे फायदे होतात. एक दही अजून चवदार बनते. पचनास मदत करते. पोटदुखी, मळमळ किंवा उलट्या होणे अशा परिस्थितीत दही खाणं फायदेशीर ठरतं. जेवणाच्या वेळी रायता बनविताना जिरे पावडर देखील वापरू शकतो, यामुळे वरील सर्व फायदे आपोआपच तुमच्या शरीराला मिळू शकतात.
२) दही आणि काळी मिरी:
वजन कमी करण्यासाठी दही किती फायदेशीर आहे हे कदाचित खूप कमी जणांना माहीत असेल. बरेचजण वजन कमी करण्यासाठी काय-काय करत असतात. हजारो रुपयांचे डीएटिस्ट फॉलो करतात. महागडी प्रोटिन्स वाले औषध खातात. या सर्वांचा परिणाम काय होतो हे सांगायची आवश्यता नाही. या उलट
कमी वेळात वजन कमी करायचे असेल तर दह्यासोबत काळी मिरी पावडर खावी. कमी पैशात आणि घराच्या घरी अगदी सहज करता येणारा उपाय. करायला काहीच हरकत नाही.
३) दही आणि मध:
दह्यामध्ये मिसळून घ्यावे, मध हे उत्कृष्ट प्रतिजैविक आहे. असे म्हणतात की अल्सरच्या समस्येवर दही आणि मध उत्तम उपाय म्हणून काम करते.
४) दही आणि सुखा मेवा:
सुक्या मेव्यांसोबत (Dry Fruits) दही मिसळून खावे. जर तुमची हाडे कमकुवत असतील आणि तुमचे शरीर दुखत असेल तर तुम्ही दही मिसळून सुका मेवा खावा. यासाठी एक वाटी दही घेऊन त्यात काजू, बदाम, अक्रोड, बेदाणे आणि अंजीर टाकून रोज खावे.
|Related: Beat The Summer Heat | उन्हाशी लढण्यासाठी या गोष्टी करा (Read more…)
इ] दह्याचे सौंदर्य विषयक फायदे:
१) निरोगी आणि तेजस्वी त्वचेसाठी:
व्हिनेगर किंवा लिंबाचा रस सारख्या खाण्यायोग्य अम्लीय पदार्थाचा वापर करून दही बनविले जाते. दह्यामध्ये अम्लीय संयुगे असतात जे त्वचेच्या विविध समस्यांशी लढण्यासाठी अँटीबैक्टीरियल आणि अँटीफंगल म्हणून कार्य करतात. लिंबाच्या रसात दही मिसळा आणि दहा मिनिटे चेहऱ्यावर लावा. नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
२) अकाली सुरकुत्या येण्यास प्रतिबंध :
दह्यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स त्वचेला मऊ करण्यास मदत करतात आणि अकाली सुरकुत्या येण्यापासून बचाव करते.
३) काळे डाग दूर करण्यासाठी :
दही त्वचेला हलक्या पद्धतीने एक्सफोलिएट करण्यास मदत करते. जर तुमच्या त्वचेवर काळे डाग असतील आणि त्यावर नैसर्गिक पद्धतीने उपचार करू इच्छित असाल तर दही हा त्यावरचा उत्तम नैसर्गिक उपाय असू शकतो.
४) केसातील कोंडा दूर करण्यासाठी:
दही मध्ये अँटी-फंगल गुणधर्म असते, दही हा हट्टी कोंडा दूर करण्यासाठी एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे.
रात्री दही खावे की नाही ?:
रात्री दही किंवा ताक खाण्याचा सल्ला दिला जातो, जे पचायला सोपे आहे. परंतु कधीकधी त्यात साधारणतः 1/4 टीस्पून काळी मिरी टाकावी, कारण काळी मिरी उष्णता निर्माण करण्यास मदत करते. दही हे चांगल्या बॅक्टेरियाचा एक उत्कृष्ट स्रोत आहे जे पचनास मदत करते, परंतु रात्री दही खाल्ल्याने ताकाच्या तुलनेत ते पचायला जड असल्यामुळे एखाद्याला त्याचा त्रास होऊ शकतो. अश्या व्यक्तींनी ताक प्यावा. नाक बंद होण्याचा त्रास होत असल्यास किंवा सर्दी असल्यास दहीपासून दूर राहावे.
दह्यात थोडी साखर किंवा गूळ मिसळून गोड करा थोडी मीर पूड घाला आणि मनसोक्त दह्याचा आस्वाद घ्या.
आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
|Related: Why Peeled Orange Sink in Water | संत्रीच्या सलीचे काय? (Read more…)
वेगळी माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड
कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.
I hope you got to all these questions like Is it good to eat curd every day? Health Benefits Of Curd? What are the side effects of curd? curd is good to eat at night? How much curd can I eat daily? Which is the best time to eat curd? side effects of applying curd on hair, side effects of curd on the face, दह्याचे दुष्परिणाम काय आहेत? side effects of eating curd daily, side effects of eating curd, benefits and side effects of curd, side effects of curd on the skin,