Dry Clean Symbol | केअर टॅगवरील लॉन्ड्री चिन्हे :
Dry clean symbol: This is what the laundry symbols on care labels mean. What are care labels or symbols? Know about washing symbols, or laundry symbols. To know about printable laundry symbols. What do the symbols on clothes labels? Mean of dry clean symbols. What are washing symbols, and their instructions? What are washing care symbols, washer symbols, wash care symbols, or labels. Know about symbols for caring, ironing symbols, and hand washes symbols. Do you know what all laundry symbols mean? In this article, we will get answers to all these questions.
या लेखात आपण जाणून घेणार आहोत लॉन्ड्री चिन्हांचा अर्थ काय आहे ते. जेंव्हा आपण नवे, महागडे कपडे घेतो तेंव्हा त्यावर बरेच वेग-वेगळे चिन्ह पाहतो. कपडे धुलाई करताना काय काळजी घ्यायची, कपडे कसे धुवावे हे त्या लेबलवर लिहिलेलं असतं. खरं त्या चिन्हांचा अर्थ काय आहे, हे माहित नसतं किंवा नुसत्या चिन्हांवरून ते कळतही नाही. आज आपण याच साऱ्या चिन्हांची माहिती करून घेणार आहोत. या लॉन्ड्री चिन्हांचा अर्थ काय आहे हे येथे स्पष्ट करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला पुन्हा गोंधळात पडण्याची गरज नाही. चला तर करूया सुरुवात. (Dry clean symbol)
|Related : Keep Coloured Clothes Shine | रंगीत कपडे चमकदार ठेवा (Read More)
Table of Contents :
पूर्व संकल्पना :
पाठीमागील इतिहास पहिला असता, साधारणतः १९५० च्या उत्तरार्धात, कपड्याच्या देखरेख करताना काळजी घेणारे लेबल बनविण्यासाठी एका युरोपियन असोसिएशनची स्थापना करण्यात अली. म्हणूनच युरोप मधील बहुतांश देशात कपडे धुण्याची ही चिन्हे समान किंवा सारख्या स्वरूपाची आहेत. पुढे जागतिकी कारणामुळे हीच चिन्हे संपूर्ण जगभर पसरली, आणि चिन्हे आंतरराष्ट्रीय झाली. त्यामुळेच बहुतेक देशांमधील ही चिन्हे समान किंवा सारख्या स्वरूपाची दिसतात. (dry clean symbol)
अ) वॉशिंग मशीन संबंधित चिन्ह :
नं. | चिन्ह | चिन्हाचा अर्थ |
---|---|---|
१. | या चिन्हाचा अर्थ असा आहे की तुम्ही हे कपडे तुमच्या वॉशिंग मशिनमध्ये धुवू शकता. धुलाई यंत्रात हे कपडे धुण्यास काही हरकत नाही किंवा काही नुकसान नाही. | |
२. | बादलीतील असलेला हात म्हणजे, हे कपडे फक्त हाताने धुवू शकता किंवा तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये अश्या पराचे कार्य असेलेल्या मशीन मधेच हे कपडे धुवू शकता. जर तुमच्या वॉशिंग मशीन मध्ये हात धुण्याची सेटिंग नसेल तर असे चिन्ह असलेले कपडे हातानेच धुवावे. तसे न केल्यास कपडे खराब होण्याची शक्यता जास्त. | |
३. | या चिन्हाचा अर्थ असा आहे की तुम्ही हे कपडे तुमच्या वॉशिंग मशिनमध्ये थंड पाण्यात धुण्यास काही हरकत नाही किंवा काही नुकसान नाही. | |
४. | या चिन्हाचा अर्थ असा आहे की तुम्ही हे कपडे तुमच्या वॉशिंग मशिनमध्ये हलक्या गरम, म्हणजे कोमट पाण्यात धुवू शकता. | |
५. | या चिन्हाचा अर्थ असा आहे की तुम्ही हे कपडे तुमच्या वॉशिंग मशिनमध्ये गरम पाण्यात धुवू शकता. | |
६. | बादलीमध्ये संख्या म्हणजे त्या कपड्याची असेलेली कमाल तापमानाची मर्यादा. बादलीत धाखवलेल्या संख्येपेक्षा जास्त गरम पाण्यात हे कपडे धुवू नयेत. कदाचित त्यांचे रंग खराब होऊ शकतात, ते कपडे आक्रसू शकतात किंवा कपडे पूर्ण खराब होऊ शकतात. त्यामुळे हॉट वॉटर मोड मध्ये कपडे धुवणाऱ्यानी या चिन्हाची दक्षता घ्याची. | |
७. | बादलीखालील रेषा म्हणजे हे कपडे वॉशिंग मशीन मध्ये धुताना “स्लो स्पिन सायकल” ठेवावे. हे कपडे कदाचित अधिक नाजूक असल्यामुळे जलद स्पिन सायकलचा सामना करू शकत नसावेत. म्हणून असे चिन्ह असणाऱ्या कपड्याची काळजी घ्यावी. | |
८. | जर बादलीवर फुली (क्रॉस) असे चिन्ह म्हणजे, हे कपडे तुम्ही घरच्या-घरी धुवू शकत नाहीत. ते स्वच्छ करण्यासाठी व्यावसायिक ड्राय क्लीनरकडे, ड्रायक्लीनिंग साठी किंवा वाफवण्यासाठी द्यावे. |
आ) वॉशिंग मशीनच्या ड्रायर संबंधित चिन्ह :
नं. | चिन्ह | चिन्हाचा अर्थ |
---|---|---|
१. | वर्तुळावर फुली (क्रॉस) असे चिन्ह म्हणजे, हे कपडे ड्रायरमध्ये ठेवू नयेत. कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवून झाल्यानंतर ते स्पिनिंग किंवा ड्रायिंग साठी ठेवू नये. असे कापले कोरड्या रॅकवर किंवा कपड्यांच्या ओळीवर कोरडे होऊ द्यावेत. | |
२. | चौकोनात फक्त एक बिंदू या चिन्हाचा अर्थ असा की, हे कपडे आपण ड्रायरमध्ये ठेवू शकतो. परंतु वॉशिंग मशीनचा प्रोग्रॅम कालावधी कमी असावा आणि त्याचे तापमानही कमी असावे, हे खात्री करून घ्यावे मगच हे कपडे ड्रायर मध्ये ठेवावे. | |
३. | चौकोनात दोन बिंदू या चिन्हाचा अर्थ असा की, हे कपडे आपण ड्रायरमध्ये ठेवू शकतो. हे चिन्ह असलेल्या कपड्यांना वॉशिंग मशीनच्या प्रोग्रॅम कालावधी आणि त्याचे तापमानही यावर कोणतेही बंधन राहत नाही. हे कपडे सामान्य स्पिनिंग सायकलवर ड्रायरमध्ये सहज सुकवू शकता. |
इ) ब्लिच करण्या संबंधित चिन्ह :
नं. | चिन्ह | चिन्हाचा अर्थ |
---|---|---|
१. | त्रिकोणात ‘CI’ किंवा ‘CL’ ही अक्षरे असलेले चिन्ह म्हणजे, हे कपडे तुम्ही क्लोरीनने ब्लीच करू शकता. | |
२. | त्रिकोणात ‘मारलेल्या दोन रेषांचे चिन्ह म्हणजे, हे कपडे तुम्ही क्लोरीन शिवाय ब्लीच करू शकता, लक्षात ठेवा क्लोरीन न वापरता. | |
३. | त्रिकोणावर मारलेली फुली (क्रॉस) असे चिन्ह म्हणजे, हे कपडे तुम्ही ब्लीच करू शकत नाही. |
ई) इस्त्री करण्या संबंधित चिन्ह :
नं. | चिन्ह | चिन्हाचा अर्थ |
---|---|---|
१. | इस्त्रीमध्ये एक बिंदू असे चिन्ह म्हणजे, आपण अश्या कपड्यांना इस्त्री करू शकता. एक काळजी घ्यावी की, इस्त्रीचे तापमान ११०°C (अंश सेल्सिअस) पेक्षा जास्त उबदार असू नये. | |
२. | इस्त्रीमध्ये दोन बिंदू असे चिन्ह म्हणजे, आपण अश्या कपड्यांनाही इस्त्री करू शकतो. या काड्यांना इस्त्री करताना एक काळजी घ्यावी की, इस्त्रीचे तापमान १५०°C (अंश सेल्सिअस) पेक्षा जास्त उबदार असू नये. | |
३. | इस्त्रीमध्ये तीन बिंदू असे चिन्ह म्हणजे, आपण या कपड्यांनाही इस्त्री करू शकतो. असे चिन्ह असलेल्या काड्यांना इस्त्री करताना इस्त्रीचे तापमान २००°C (अंश सेल्सिअस) पेक्षा जास्त उबदार जाऊ नये याची काळजी घ्यावी. | |
४. | इस्त्रीवर मारलेली फुली (क्रॉस) असे चिन्ह म्हणजे, हे कपडे तुम्ही इस्त्री करू शकत नाही. याचा अर्थ ह्या कपड्यांना इस्त्री करणे योग्य नाही. |
उ) कपडे सुकविण्या संबंधिचे चिन्ह :
नं. | चिन्ह | चिन्हाचा अर्थ |
---|---|---|
१. | या चिन्हाचा अर्थ असा आहे की तुम्ही हे कपडे तुमच्या घराच्या ओळीने सुकवांच्या पद्धतीने सुकवू शकता. | |
२. | या चिन्हाचा अर्थ असा आहे की तुम्ही हे कपडे पाणी न काढता, पाणी ठिबकत असतानाच सुकविण्यासाठी ठेवावे. | |
३. | या चिन्हाचा अर्थ असा आहे की तुम्ही हे कपडे सपाट पद्धतीने सुकविण्यासाठी ठेवावे. | |
४. | या चिन्हाचा अर्थ असा आहे की तुम्ही हे कपडे सावलीत सुकविण्यासाठी ठेवावे. | |
५. | या चिन्हाचा अर्थ असा आहे की तुम्ही ह्या कपड्यातील पाणी काढून टाकण्यासाठी आणि लवकर सुकविण्यासाठी कपडे पिळू नये, किंवा मुरगाळून ठेवू नये. |
|Related : Try This To Keep White Clothes White | पांढरे कपडे पांढरे ठेवा. (Read More)
तर हे आहेत कपड्यांची काळजी घेणारे चिन्हे (dry clean symbol). अजूनही काही आहेत, पण जितके आपण जास्तीत जास्त पाहतो, आणि जे आपण आपल्या घरातील कपड्यांवर पाहतो ते सर्वच्या सर्व दिन्याचा प्रयत्न केला आहे.
आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. जर आपणास या साईट वरील लेख आवडत असतील तर आम्हाला कमेंट करुन सांगा आणि आपल्याला कशाबद्दल जाणून घ्यायचे आहे ते देखील सांगा. कृपया ही माहिती आवश्यक व्यक्तींना सामायिक (Share) करुन आमच्या प्रयत्नांना दाद द्यावी, इतकीच अपेक्षा आहे. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
अधिक माहिती :
१) विमा म्हणजे काय
२) कार विमा म्हणजे काय
३) डिजिटल क्रेडिट कार्डची माहिती
४) फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड – माहिती
५) HSBC Platinum Credit Card | HSBC प्लॅटिनम क्रेडिट कार्ड
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.